झांशीची राणी लक्ष्मीबाई |
तात्या टोपे |
या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्र.1 खालील गाळलेल्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. युरोपियन इतिहासकारांनी 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाला .............. असे म्हटले आहे.2. डलहौसीनी .............. हे धोरण अंमलात आणले.
3. 1857 च्या बंडात .............. ने ब्रिटिश अधिकाèयाला ठार केले.
4. झांशीच्या राणीने इंग्रजाविरुद्धच्या युद्धात .............. हे ताब्यात घेतले.
उत्तरे : 1. शिपायांचे बंड 2. दत्तक वारसा नामंजूर 3. मंगल पांडे 4. ग्वाल्हेर
प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. दत्तक वारस नामंजूर या तत्त्वाचे परिणाम काय झाले सांगा.उत्तर : ज्या स्थानिक राजांच्या गादीला वारस नाही अशी राज्ये खालसा करून इंग्रजी राज्यात सामील करण्यासाठी लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर (खालसा तत्त्व/डॉक्टरीन ऑफ लॅप्स) धोरण अंमलात आणले.या धोरणानुसार सातारा, झांशी, जयपूर, उदयपूर अशी विविध संस्थाने इंग्रजांच्या आधिपत्याखाली आणली. यामुळे अनेक राजांना सत्तेवरून काढून टाकले. त्यामुळे या राजांवर अवलंबून असलेले लक्षावधी सैनिक बेकार झाले. 1857 च्या युद्धाला हे एक प्रमुख कारण ठरले.
2. 1857 च्या युद्धाची आर्थिक कारणे कोणती होती.
उत्तर : 1857 च्या युद्धाची आर्थिक कारणे : 1) इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय कुटीरोद्योगांचा नाश झाला. 2) यामुळे लाखो कारागीर व विणकर बेकार झाले.3) या क्रांतीमुळे ते केवळ व्यापारी राष्ट्र न राहता त्याचे औद्योगिक कार्यशाळेत रूपांतर झाले. 3) भारतातील सुतीवस्त्रे आणि लोकरी वस्तूंची पीछेहाट झाली. 4) भारतातून इंग्लंडमध्ये आयात होणाèया सुतीवस्त्रांवर मोठ्या प्रमाणात आयात कर (जकात) लादण्यात आला. परिणामी सुतीवस्त्रे उद्योगांचा èहास झाला. 5) जमीनदारी पद्धतीत जमीनदारांनी गरीब शेतकèयांची आर्थिक पिळवणूक केली. 6) इंग्रजांनी तालुकदार, जहागीरदार ही पदे काढून टाकली. पर्यायाने जमीनदार करवसुली करणारे इंग्रजांचे हस्तक बनले. 6) जमीनदारांना मिळालेल्या करमुक्त जमिनी इंग्रजांनी इनाम कमिशन नेमून जप्त केल्या. यामुळे शेतकरी अपमानित व हवालदिल झाले. सरकारविरुद्ध बंड करण्यास जमीनदारांना हे कारण पुरेसे होते.
3. 1857 च्या युद्धात शिपायांच्या धार्मिक भावना कशा दुखविल्या गेल्या.
उत्तर : 1) भारतीय शिपायांना समुद्र ओलांडून जाण्याची सक्ती करण्यात आली होती. समुद्र ओलांडून जाणे हे हिंदू धर्मात निषिद्ध मानले जाई. ही सक्ती आपणास जातीभ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे अशी सैनिकांची भावना झाली. 2) त्यावेळी कंपनी सरकारने सैनिकांना ‘एन्फिल्ड’ या नवीन बंदुका वापरण्यास दिल्या होत्या. त्या बंदुकीच्या काडतुसांना गाईची किंवा डुकराची चरबी लावली आहे अशी अफवा सैन्यात पसरली. हिंदूंना गाईची तर मुस्लिमांना डुकराची चरबी ही अधार्मिक बाब होती. यामुळे शिपायांच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या.
4. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाला कारणीभूत असलेली तत्कालीन कारणे कोणती?
उत्तर : कंपनी सरकारने सैनिकांना ‘एन्फिल्ड’ या नवीन बंदुका वापरण्यास दिल्या होत्या. त्या बंदुकीच्या काडतुसांना गाईची किंवा डुकराची चरबी लावली आहे अशी अफवा सैन्यात पसरली. हिंदूंना गाईची तर मुस्लिमांना डुकराची चरबी ही अधार्मिक बाब होती. ही काडतुसे ब्रिटिश अधिकाèयांनी शिपायांना दातांनी सोलण्यास भाग पाडले यामुळे शिपायांच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या. हेच 1857 च्या बंडाचे तत्कालीन कारण होय.
5. बंडाच्या अपयशाची कारणे नमूद करा.
उत्तर : बंडाच्या अपयशाची कारणे : 1) ही स्वातंत्र्यसंग्रामाची चळवळ संपूर्ण भारतात पसरली नाही. 2) स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा ही चळवळ काही लोकांच्या हितापुरतीच मर्यादित होती. 3) उठाव एकत्रितपणे होण्याऐवजी काही अनपेक्षित कारणांचा तो स्फोट होता. 4) इंग्रज सैन्यामध्ये एकी होती तर भारतीय सैन्यात असंघटितपणा होता. 5) बंडखोरांना योग्य नेतृत्व आणि दिशा लाभली नाही. 6) अयोग्य युद्ध नीती, अकुशलता, नेतृत्वाचा अभाव, बेशिस्तपणा व दिशाहीनता ही कारणेही असफलतेमागे होती. 7) अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला नाही. 8) बंडखोरांनी लूट, दरोडे घातल्यामुळे त्यांनी जनसामान्यांचा विश्वास गमावला.
6. 1858 मध्ये राणीने जाहीर केलेली आश्वासने कोणती?
उत्तर : राणीने जाहीर केलेली आश्वासने : 1) 1 नोव्हेंबर 1858 रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीयांना स्थिर सरकार देण्याचे आश्वासन दिले. 2) ईस्ट इंडिया कंपनीने संस्थानिकांशी केलेला करार स्वीकारण्यात आला. 3) महत्त्वाकांक्षी याजनांना आळा बसला. 4) कायद्यामध्ये समानता ठेवली गेली. 5) धार्मिक असहिष्णूता असेल. भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाणार नाही हे आश्वासन दिले.
7.1857 च्या उठावाची राजकीय कारणे कोणती?
उत्तर : 1) लॉर्ड डलहौसीने डॉक्टरीन ऑफ लॅप्स या धोरणाचा अवलंब करून अनेक संस्थाने खालसा केली व इंग्रजी राज्यास जोडली. उदा. सातारा, झांशी, उदयपूर, संबळपूर, जयपूर इ. 2) डलहौसीने तंजावरचा नवाब, कर्नाटकचा नवाब यांची राज्यपदे काढून घेतली. 3) दिल्लीचा मोंगल बादशहा, अवधचा नवाब व इतर अनेक राजांना सत्तेवरून काढून टाकले. 4) त्यामुळे वरील सर्व संस्थानिकांच्या पदरी असणारे लाखो सैनिक बेकार झाले.
8. 1857 च्या उठावाची शासकीय कारणे सांगा.
उत्तर : 1) ब्रिटिशांनी भारतात दिवाणी व फौजदारी न्यायालये स्थापन केली. ती फक्त भारतीयांसाठीच होती. 2) या न्यायालयाची भाषा इंग्रजी होती. 3) या न्यायालयात बहुतेक करून इंग्रजांच्या बाजुनेच न्याय दिला जात असे. 4) ब्रिटिशांचे कायदे इंग्रजी भाषेत असल्यामुळे सामान्य भारतीयांच्या आकलनाबाहेरचे होते. 5)न्यायालयीन व्यवस्था खूप खर्चिक होती.
9. 1857 च्या उठावाची लष्करी कारणे सांगा.
उत्तर : 1) इंग्रजी सैन्यामध्ये भारतीय शिपायांची अवस्था अत्यंत हलाखीची होती. 2) सैन्यातील अधिकाराच्या जागा, दाम दुप्पट पगार आणि संधी फक्त इंग्रजांना होत्या. 3) भारतीय सैनिकांना योग्यता असूनही या संधी नाकारल्या गेल्या. 4) भारतीय शिपायांना समुद्र ओलांडून जाण्याची केलेली सक्ती ही आपणास जातीभ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे अशी सैनिकांची भावना झाली. 5) ब्रिटिश सैन्यामध्ये भारतीयांचे सैन्यबल जास्त होते.त्यामुळे एकजुटीने लढा दिल्यास आपण इंग्रजांना हाकलून लावू हा विश्वास भारतीय सैन्यात निर्माण झाला. 6) काडतुसे तोंडाने सोलण्याची केलेली सक्ती.
No comments:
Post a Comment