1. खालील रिकाम्या जागा योग्य पदांनी भरा.
1. ‘खेड्यांचा विकास म्हणजेच भारताचा विकास आहे’ असे ........... यांनी म्हटले आहे.
2. घटनेच्या 73 व्या दुरुस्तीनुसार भारत देशात पंचायत संस्थेचे ........... टप्पे आहेत.
3. पंचायत संस्था ........... तत्त्वाप्रमाणे कार्य करतात.
4. ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ........... अस्तित्वात आले आहेत.
उत्तरे : 1. महात्मा गांधी 2. तीन 3.विकेंद्रीकरण 4. महिला स्वसहाय्य संघ
2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. ग्रामीण विकासाचा अर्थ सांगा.उत्तर : ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी तयार केलेली ‘कृती योजना’ होय. ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान उंचावणे म्हणजे ग्रामीण विकास.
2. विकेंद्रीकरण म्हणजे काय?
उत्तर : प्रत्येक खेड्याच्या प्रशासनाचे अधिकार आणि विकासाची जबाबदारी खेड्यातील लोकांवरच सोपविणे म्हणजेच विकेंद्रीकरण होय.
3. पंचायत संस्थेचे तीन टप्पे कोणते?
उत्तर : पंचायत संस्थेचे तीन टप्पे - 1. ग्रामपंचायत 2. तालुकापंचायत 3. जिल्हा पंचायत.
4. कोणत्याही दोन निवास योजनांची नावे लिहा.
उत्तर : प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना, आंबेडकर वाल्मिकी निवास योजना, आश्रय योजना इ.
2. खालील प्रश्नांची उत्तरे 5 ते 6 वाक्यात लिहा
1. भारत देशात ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती कशी आहे?
उत्तर : 1. स्वातंत्र्यानंतर आधुनिक उद्योगधंद्यांच्या स्पर्धेत ग्रामीण व्यवसाय मोठ्या प्रमाणात लयास गेले. 2. शेती व्यवसायापासून नियमित रोजगार मिळत नाही व वेळेवर वेतनही मिळू शकत नाही. यासाठी ग्रामीण भागातील लोक शहरात स्थलांतर करू लागले. 3. शेती व्यवसायावर अवलंबून असणाèया ग्रामीणभागातील लोकांमध्ये दारिद्रयाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातील 33 टक्के जनता दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहे. 4. अत्याधुनिकतेच्या लाटेमध्ये ग्रामीण भागातील कुटिरोद्योग व लघुउद्योग लोप पावत आहेत. 5. 60 टक्के जनता प्राथमिक क्षेत्रामध्ये राबत असूनसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात यांचे योगदान नगण्य आहे. 6. खेडी व शहरे यांच्यातील अंतर वाढत आहे.
2. ग्रामीण विकासाचे महत्त्व थोडक्यात लिहा.उत्तर : ग्रामीण विकासाचे महत्त्व : 1. ग्रामीण विकास हा फक्त शेती व शेती पूरक व्यवसायाशी निगडीत नसून देशाच्या सर्वांगीण विकासामध्येही याचे योगदान आहे. त्यामुळे एकूणच राष्ट्रीय विकास होतो. 2. शेतीच्या अधिक उत्पन्नामुळे उद्योगधंद्यासाठी लागणाèया कच्या मालाची मागणी वाढते व अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. 3. उत्तम शिक्षणामुळे उत्पादन क्षमता व कौशल्य वाढते. 4. उत्तम आरोग्यामुळे लोकांच्या कामाचा वेग वाढतो व राष्ट्रीय उत्पन्नही वाढते. 5. शेती प्रक्रिया, लघुद्योग यात वाढ होऊन एकूणच ग्रामीण विकासाची नांदी होते. शहराकडे होणारे स्थलांतर थांबते. 6.या साèयामुळे दारिद्र्य कमी होण्यास मदतही होते
3. गांधीजींच्या ‘ग्रामस्वराज्य’ कल्पना विकेंद्रीकरणाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर : 1. प्रत्येक खेड्याच्या प्रशासनाचे अधिकार आणि विकासाची जबाबदारी खेड्यातील लोकांवरच सोपविणे म्हणजेच विकेंद्रीकरण होय. 2. यामुळे अधिकारांची विभागणी होऊन निर्णय घेण्यामध्ये लोकही सहभागी होतात. 3. खालच्या स्तरापासून सुरू होणारी योजनेची व विकासाची ही प्रक्रिया आहे. यालाच गांधीजींनी ‘ग्रामस्वराज्य’ असे म्हटले होते. 4. विकेंद्रीकरणामुळे सर्व प्रकारचे शोषण थांबवून मानवी स्वातंत्र्य व प्रतिष्ठा उंचावली जाते. 5. यामुळे सहानुभूती, सहकार ही मानवी मूल्ये वृद्धिंगत होतात.
4. ग्रामीण विकासात पंचायत राज संस्थेची भूमिका कोणती?
उत्तर : 1. ग्रामीण विकासात खेड्यातील लोकांना सहभागी करून घेण्यात पंचायत राज संस्थेची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. 2. दारिद्र्य निर्मूलन, जीवनाची सुरक्षा, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेमध्ये या संस्थेची जबाबदारी महत्त्वाची आहे. 3. रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, पथदीप, शौचालय, शाळा, दवाखाने, बाजारपेठा इ. ग्रामीण भागातील लोकांना उपयोगी पडणाèया मूलभूत सुविधांचा पुरवठा करतात. 4. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देतात. 5. आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधांची वाढ करून मानवी साधन संपत्तीचा विकास करण्याचे कार्य पंचायत राज करते. 6. उद्योग निर्मिती व दारिद्रय निर्मूलनाच्या योजना पंचायत राज संस्थेकडून परिणामकारकरित्या राबविल्या जातात. त्यामुळे गरिबी व बेकारी दूर होण्यास मदत होते. 7. वेगवेगळ्या आवास योजना अंमलात आणून बेघर लोकांना घरांची निर्मिती करून दिली जाते. 8. सुवर्ण ग्रामोदय योजनेद्वारे मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात मिळतात. 9. गावात धान्यवाटप व्यवस्था मजबूत करून गरीब व लाभार्थीना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. 10. गावातील ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा, मनोरुग्ण यांना सरकारकडून मिळणाèया सुविधा उपलब्ध करून देऊन समाजसेवा केली जाते. 11. महिला स्वसहाय्य संघाची स्थापना करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देऊन देशाच्या विकासात सक्रिय सहभागी होण्यास मदत केली जाते. 12. यात्रा, सण या दिवशी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देते; त्यामुळे ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ मिळते त्यातून ग्रामीण संस्कृती जोपासली जाते. 13. खेड्यातील उत्पादक उपक्रमाद्वारे लोकांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. 14. तलाव निर्मिती, तलावातील गाळ काढणे, लघुपाटबंधारे योजना व कुटिरोद्योग यांचा विकास करता येतो. वरील सर्व उपक्रमात पंचायत राज प्रमुख भूमिका निभावते व खेड्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देते.
No comments:
Post a Comment