1. खालील रिकाम्या जागा योग्य पदांनी भरा.
1. आर्थिक विकास ही एक निरंतर चालणारी ........... आहे.2. ........... उत्पन्न वाढल्यास राष्ट्रीय विकास वाढतो.
3. ........... ही संस्था जागतिक मानव विकास अहवाल सादर करते.
4. मानवी विकास म्हणजे ........... वृद्धिंगत करणे.
5. अविकसित राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने ........... कमी असते.
6. 2014 मध्ये भारत मानव विकास सूचीमध्ये ........... स्थानावर होता.
7. 2011 मध्ये भारताचे लिंग गुणोत्तर ........... इतके होते.
उत्तरे : 1. एक प्रक्रिया 2. राष्ट्रीय 3. जागतिक बँक 4.मानवाच्या क्षमता 5. दरडोई उत्पन्न 6. 135 7. 945
2. खालील प्रश्नांची उत्तरे 5 ते 6 वाक्यात लिहा.
1. विकासाची व्याख्या लिहून विकास प्रक्रिया स्पष्ट करा.उत्तर : एखाद्या व्यक्तिच्या किंवा देशाच्या सर्व आशाआकांक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याची क्षमता वाढविण्याच्या प्रक्रियेस ‘विकास’ असे म्हणतात. प्रा. मेअर आणि बाल्डविन यांच्या मते ‘‘एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दीर्घकाळपर्यंत निरंतर वाढ होण्याच्या प्रक्रियेला ‘आर्थिक विकास’ म्हणतात. ही व्याख्या आर्थिक विकासाच्या तीन मुद्यांवर प्रकाश टाकते. ते मुद्दे म्हणजे. अ) एक प्रक्रिया ब) प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नात वाढ क) दीर्घकाळ होणारी वाढ
अ) एक प्रक्रिया : ‘प्रक्रिया’ हा शब्द उत्पादनाची मागणी व पुरवठा या दोन्हीच्या संरचनेतील बदल सुचवितो. हा बदल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दीर्घकालीन वाढीला पूरक असतो. ब) प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न : एक वर्षाच्या मुदतीत त्या देशात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवांची एकूण किंमत म्हणजेच ‘प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न’ होय. हे एक आर्थिक विकास मोजण्याचे प्रमुख साधन आहे. राष्ट्रीय उत्पन्न जितके अधिक तितकाच राष्ट्रीय विकास अधिक. या उलट राष्ट्रीय उत्पन्न जितके कमी तितकाच राष्ट्रीय विकास कमी असतो. क) दीर्घकाळ होणारी वाढ़ : प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही दहा वर्षांपेक्षा अधिक काळ स्थिर राहिली पाहिजे. अल्पमुदतीच्या वाढीला विकास म्हणता येत नाही. वस्तू व सेवा यांच्या मागणी आणि पुरवठ्यामधील परस्परबदलाची प्रक्रिया निरंतर सुरु राहिली तरच दीर्घकालीन विकास होऊ शकतो.
2. अविकसितता म्हणजे काय? त्याची कारणे कोणती?
उत्तर : ‘अविकसितता’ हा शब्द मागासलेली, विकसित न झालेली स्थिती दर्शवितो. येथे दरडोई उत्पन्न अत्यंत कमी असून, उत्पादनसुद्धा कमी असते तसेच लोकसंख्यावाढीचा दरही जास्त असतो.
कारणे : दरडोई उत्पन्न कमी असते 2. उत्पादनही कमी असते. 3. लोकसंख्यावाढीचा दर जास्त असतो. 4. गरिबी 5. बेकारी 6. असमानता 7. निरक्षरता 8. अंधश्रद्धा 9.कुपोषण 10. आरोग्य सुविधांचा अभाव
3. मानव विकास म्हणजे काय? त्याचे मोजमाप कसे करतात?
उत्तर : ‘मानवी विकास म्हणजे मानवाच्या क्षमता वृद्धिंगत करणे होय’ या क्षमता म्हणजेच आरोग्य, शिक्षण आणि खरेदी करण्याची ऐपत होय. त्याचे मोजमाप 1. व्यक्तीची अपेक्षित आयुमर्यादा 2. साक्षरतेचे प्रमाण 3. दरडोई उत्पन्नाच्या आधारे करतात.(या तीन सूचकांच्या सरासरीला मानवी विकास सूची असे म्हणतात.)
4. भारतामध्ये मानव विकास सूचक कमी असण्याची कारणे कोणती ?
उत्तर : कारणे : 1. पौष्टिक आहाराची कमतरता 2. निवाèयाचा अभाव 3. वस्त्रांची कमतरता 4. उत्तम आरोग्य सुविधांचा अभाव 5. अस्वच्छ परिसर 6. शिक्षणाच्या सोयी सुविधांचा अभाव 7. सामाजिक सुरक्षेची कमतरता 8. शुद्ध पाण्याची कमी 9. अशुद्ध हवा 10. प्रदूषित पर्यावरण
5. लिंग समानता कशी साध्य केली जाते?
उत्तर : 1. घटनेने दिलेल्या स्वातंत्र्य, समता व संधी महिलांना उपलब्ध करून देणे. 2.विकासाच्या सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी मिळवून देणे. 3.महिलांना पुरेशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. 4.महिलांचे होणारे कुपोषण रोखणे 5. स्त्री भ्रूण हत्येसारख्या अनिष्ट प्रथा रोखणे. 6. राजकीय क्षेत्रातील महिलांना विशेष आरक्षण मिळवून देणे.7 .‘महिलांचे सबलीकरण’ करणे. 8. घरामध्ये व कामाच्या
ठिकाणी महिलांवरील हिंसा रोखण्यासाठी कायदे करणे. 9. त्यांना समान वेतन देणे या सर्व उपक्रमातून लिंग समानता साध्य केली जाईल.
6. महिला स्वसहाय संघामुळे महिला सक्षम होत आहेत याचे समर्थन करा.
उत्तर : आर्थिक विकासामध्ये महिलांना सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून स्वसहाय्य संघाची स्थापना खेड्यापासून शहरापर्यंत केली जात आहे. त्यामध्ये 20 एकमत असणाèया महिलांचा संघ असतो. आपल्या जवळील अल्पभांडवल एकत्र करून, बाह्यमदत घेऊन त्या स्वतःचा व्यवसाय सुरु करतात आणि उत्पन्न वाढविण्यास प्रयत्न करतात.
हिशेब ठेवणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे व उत्पन्न वाढविणे यासंबंधीचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. स्वसहाय्य संघांमुळे महिलांना उत्पन्न मिळविणे, बचत करणे व आपल्या इच्छेनुसार पैसा खर्च करण्याची मुभा मिळते. त्यामुळे महिलांची समाजातील प्रतिष्ठा वाढते व त्यांना स्वायत्तताही प्राप्त होते.
7. प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ?
उत्तर : एका वर्षाच्या मुदतीत त्या देशात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवांची एकूण किंमत म्हणजेच ‘प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न’ होय.
8.‘प्रत्यक्ष उत्पन्न’ म्हणजे काय?
उत्तर : आपल्या उत्पन्नाची किंमतीच्या बदलाशी तुलना केल्यास प्रत्यक्ष उत्पन्न मिळते. उदा. आज 100 रू मध्ये दरवाढीमुळे गतवर्षीपेक्षा कमी वस्तू मिळतात. अशारीतीने जेव्हा पैशाची तुलना दरवाढीशी केली जाते तेव्हा आम्हाला प्रत्यक्ष उत्पन्न मिळते.
9. आर्थिक विकास मोजण्याचे प्रमुख साधन कोणते ?
उत्तर : प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न
10. ‘सर्वसमावेशक विकास’ म्हणजे काय ?
उत्तर : प्रत्येक व्यक्तिचा विकास प्रक्रियेमध्ये समावेश असणे म्हणजेच ‘सर्वसमावेशक विकास’ होय.
11. दीर्घकालीन विकास म्हणजे काय ?
उत्तर : पुढील पिढीसाठी नैसर्गिक साधन संपत्ती व परिसराचे संवर्धन करणे म्हणजे दीर्घकालीन विकास होय.
12. विकासाची उद्दिष्टे कोणती आहेत ?
उत्तर : उत्पन्नात वाढ, दारिद्रयनिर्मूलन सर्वसमानता, परिसरसंवर्धन, बेकारी व विषमता कमी करणे, सर्व जनतेचे कल्याण करणे हीच विकासाची उद्दिष्टे आहेत.
13. जगातील विकसित राष्ट्रांची उदाहरणे द्या ?
उत्तर : अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पश्चिम युरोपियनदेश, सिंगापूर, हॉगकाँग, मलेशिया व चीन इ.
No comments:
Post a Comment