Sunday, May 12, 2019

भारतातील खनिजे व शक्तीसाधने(उर्जासाधने)

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




 

1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

1. ........... हा अत्यंत महत्त्वाचा मिश्रधातू आहे.
2. ........... हा अ‍ॅल्युमिनियमचा कच्चा धातू आहे.
3. ........... हे भारतातील महत्त्वाचे अधातू खनिज आहे.
4. ........... हे वनस्पतिज पदार्थांपासून बनलेले खनिज आहे.
5. शिवनसमुद्र जलविद्युतकेंद्र ........... या राज्यात आहे.
 उत्तरे : 1. मँगनीज 2. बॉक्साईट  3. अभ्रक  4. कोळसा  5. कर्नाटक

2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. खनिज व खाणकाम यांची व्याख्या सांगा.
उत्तर : निसर्गात स्वाभाविकपणे मिळणाèया ठराविक रासायनिक संयुगाने सामावलेल्या मिश्रणाला ‘खनिजे’ असे म्हणतात खनिजे ही अजैविक नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत. उदा. लोहयुक्त खनिज, मँगनीज, बॉक्साईट इ.
जमिनीतून खनिजे बाहेर काढण्याच्या क्रियेला ‘खाणकाम’ असे म्हणतात.
2. मँगनीजचे प्रमुख उपयोग कोणते?
उत्तर : हा एक मिश्र धातू असून फार महत्त्वाचा आहे. पोलाद तयार करण्यासाठी मँगनीजचा वापर करतात. बॅटरी, रंग, काच, मातीची भांडी व कॅलिको प्रिंटींगसाठी पण मँगनीजचा वापरतात.
3. भारतात बॉक्साईटचे उत्पादन करणाèया प्रमुख राज्यांची नावे लिहा.
उत्तर :  भारतात बॉक्साईटचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये - ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र,   झारखंड, गुजराथ, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक
4. उर्जासाधने म्हणजे काय? भारतात शक्तीसाधनांचे महत्त्व कोणते ? त्याचे विवरण करा.
उत्तर : विद्युत्शक्तीच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाèया साधनसंपत्तीला ‘उर्जासाधने’ असे म्हणतात.
एका देशाच्या आर्थिक विकासासाठी लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी उर्जासाधने अतिशय महत्त्वाची ठरतात. उद्योगधंदे, शेती, व्यापार, दळणवळण व वाहतूक या क्षेत्रातील प्रगतीमध्ये उर्जा साधने महत्त्वाची भूमिका बजावतात.
उर्जा साधनांच्या स्वरूपावरून त्यांची पारंपरिक व अपांरपरिक अशी विभागणी केली जाते. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू हे पारंपारिक (अपुनर्भव) उर्जासाधने आहेत. ही उर्जासाधने केव्हातरी संपणार आहेत. अपारंपरिक (पुनर्भव) उर्जासाधनांध्ये सौरउर्जा, पवनउर्जा, लाटांची उर्जा, भूऔष्णिक उर्जा, जैविक उर्जा इत्यादींचा समावेश होतो. भारतात विद्युतशक्तीचा अभाव असल्यामुळे अपारंपरिक (न संपणारी) उर्जा साधनांचा उपयोग करून त्यांचा विकास करणे महत्त्वाचे ठरले आहे.
5. भारत देशात पेट्रोलियमची विभागणी कशी झाली आहे? सविस्तर लिहा.

उत्तर : भारतात बाँबे हाय, गुजराथ, आसाम, आंध्रप्रदेश व तामिळनाडू
राज्यात पेट्रोलियमच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.
बाँबे हाय या तेल उत्पादक प्रदेशात अमाप अशा तेलाच्या खाणी आहेत.त्यामुळे कच्चा तेल उत्पादनाचे ते प्रमुख केंद्र बनले आहे. त्यानंतर गुजराथचा दुसरा क्रमांक लागतो. गुजराथमधील अंकलेेशर, कँबे, कलोल, नवगाव, मेहसाणा येथे पेट्रोलियमच्या खाणी आहेत. भारतातील आसाममधील ‘माकुम’ येथे प्रथमच पेट्रोलियमच्या खाणींचा शोध लावण्यात आला. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनात आसाम पहिल्या क्रमांकावर होता. आज तृतीय क्रमांकावर आहे. दिग्बोई, नहरकटिया मोरान, हुग्रीजन, सिबसागर व रुद्रसागर हे आसाम मधील प्रमुख तेल उत्पादक प्रदेश आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी नदीखोèयातील व नदीमुखाजवळील भागात तेलविहिरी आढळून येतात.
भारतात पेट्रोलियमचे उत्पादन पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे आपल्या अमर्यादित गरजा भागविण्यासाठी पेट्रोलियमची जास्तीत जास्त आयात करावी लागत आहे.
6. भारतातील अणुउर्जा निर्मिती केंद्रांची नावे लिहा.
उत्तर :  भारतात एकूण 7 अणुउर्जा केंद्रे आहेत.  1)  तारापूर (महाराष्ट्र) 2) राणाप्रतापसागर (राजस्थान) 3)  कल्पक्कम  (तामिळनाडू) 4) नरोरा (उत्तरप्रदेश) 5) काक्रापार (गुजराथ), 6)   कैगा (कर्नाटक) 7) कुंदनकुलम (तामिळनाडू)
7. तामिळनाडू राज्यातील प्रमुख जलविद्युत केंद्र कोणती?
उत्तर : तामिळनाडूतील प्रमुख जलविद्युत केंद्रे : मत्तूर, पैकारा, पापनासम्, पेरियार, मोयार, कुंदहा, शोलयार व कोडयार
8.‘विसाव्या शतकातील अदभुत खनिज’ असे कोणत्या खनिजाला म्हणतात ? 
उत्तर : अ‍ॅल्युमिनियम 
9.  ............ हे एक प्रमुख अधातू खनिज आहे.
उत्तर : . अभ्रक
10. अभ्रकाचे उपयोग सांगा ?
उत्तर : अभ्रक हे पारदर्शक असून उष्णता रोधक आहे. विद्युत उपकरणे, टेलिफोन, विमान निर्मिती, स्वयंचलित वाहन निर्मिती, बिनतारी संदेश यंत्रणा इत्यादि संपर्क साधनात याचा वापर केला जातो
11. पारंपरिक (अपुनर्भव) उर्जासाधनांची उदाहरणे द्या.
उत्तर : कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू हे पारंपारिक (अपुनर्भव) उर्जासाधने आहेत.
12. अपारंपरिक (पुनर्भव) उर्जासाधनांची उदाहरणे द्या.
उत्तर : अपारंपरिक (पुनर्भव) उर्जासाधनांध्ये सौरउर्जा, पवनउर्जा, लाटांची उर्जा, भूऔष्णिक उर्जा, जैविक उर्जा इत्यादींचा समावेश होतो.
13. भारतात  पेट्रोलियमची आयात का करावी लागते ? 
उत्तर : भारतात पेट्रोलियमचे  उत्पादन पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे आपल्या अमर्यादित गरजा भागविण्यासाठी पेट्रोलियमची जास्तीत जास्त आयात करावी लागत आहे.
14.‘अणुउर्जा’ म्हणजे काय ?
उत्तर : अणुखनिजांपासून तयार होणाèया विद्युतशक्तीला ‘अणुउर्जा’ असे म्हणतात.
15. भारताने अणुउर्जेचे उत्पादन करण्याची योजना आखली आहे. का ?
उत्तर : भारतात विद्युतशक्तीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या मागणी एवढे विद्युतशक्तीचे उत्पादन केले जात नाही. यासाठी भारताने अणुउर्जेचे उत्पादन करण्याची योजना आखली आहे.
16. कर्नाटकातील  मँगनीज  उत्पादन करणारी मुख्य ठिकाणे  कोणती ?
उत्तर : कर्नाटकात उत्तर कन्नड, शिमोगा, बळ्ळारी, चित्रदुर्ग व तुमकूर
जिल्हे  मँगनीज उत्पादन करणारी मुख्य ठिकाणे आहेत.
17. बॉक्साईट  हा शब्द  कोणत्या शब्दापासून बनला आहे ?
उत्तर : लेसबॉक्स
18. पहिल्यांदा कच्चे बॉक्साईट .......... या ठिकाणी सापडले.
उत्तर : लेसबॉक्स (फ्रान्स)

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024