Sunday, May 12, 2019

स्वातंत्र्याची चळवळ

लाला लजपत राय
बिपिनचंद्रपाल
 1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ........... या साली झाली.
2. आर्थिक निःसारणाचा सिद्धांत ........... यांनी मांडला.
3. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही घोषणा ........... यांनी केली.
4. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी भाषेमध्ये ........... हे वृत्तपत्र सुरु केले.
5. ‘अभिनव भारत’ नावाची गुप्त संघटना ........... येथे कार्यरत होती
उत्तरे : 1. इ.स. 1885 2. दादाभाई नौरोजी 3. बाळ गंगाधर टिळक  4. केसरी  5. भारत

2. खालील पैकी योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक
अ) महात्मा गांधी  ब) ए.ओ. ह्यूम
क) बाळ गंगाधर टिळक ड) गोपाळ कृष्ण गोखले
2. ‘मराठा’ हे वृत्तपत्र यांनी सुरु केले
अ) जवाहरलाल नेहरू ब) रासबिहारी बोस
क) बाळ गंगाधर टिळक ड) व्ही. डी. सावरकर
3. मुस्लीम लीगची स्थापना या साली झाली.
अ) 1924 ब) 1922
क) 1929 ड) 1906
4. बंगालची फाळणी या व्हॉईसरॉयने केली.
अ) लॉर्ड कॉर्नवॉलिस ब) डलहौसी
क) लॉर्ड कर्झन ड) रॉबर्ट क्लाईव्ह
उत्तरे : 1. ब) ए.ओ. ह्यूम  2. क) बाळ गंगाधर टिळक  3. ड) 1906  4.क) लॉर्ड कर्झन

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



3.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोणकोणत्या संघटना अस्तित्वात होत्या?
उत्तर : द हिंदू मेळा, द ईस्ट इंडियन असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा व द इंडियन असोसिएशन इ. संघटना होत्या.

2. मवाळ मतवाद्यांनी ब्रिटीशांसमोर कोणकोणत्या मागण्या मांडल्या?
उत्तर : उद्योगधंद्यांची वाढ करणे, संरक्षण खात्यावरील खर्च कमी करणे,  शैक्षणिक क्षेत्रात विकास साधणे अशा अनेक मागण्या  सरकारपुढे मांडून देशातील दारिद्र्यरेषेचा अंदाज घेण्यास त्यांना भाग पाडले.
प्रथमच मवाळांनी भारतातील ब्रिटीशांच्या गैरराज्यकारभाराविषयी विश्लेषण केले. भारतातील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे चाललेला आहे ही आकडेवारी आणि वस्तुस्थिती लोकांच्यासमोर मांडली.

3. आर्थिक निःसारणाचा सिद्धांत  स्पष्ट करा.


दादाभाई नौरोजीं



उत्तर :दादाभाई नौरोजींनी भारतीय संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे चालला आहे हे  सांगितले. यालाच आर्थिक ‘निःसारणाचा सिद्धांत’  म्हणतात. निर्यात कमी  होऊन आयात वाढल्यामुळे प्रतिकूल रक्कमेच्या शिल्लकीत वाढ झाली आणि भारतातील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे जाऊ लागला. हे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या खजिन्यातून दिला जाणारा पगार, निवृत्ती वेतन, ब्रिटीश अधिकाèयांचे शासकीय खर्च या मार्गाने भरपूर संपत्तीचा प्रवाह इंग्लंडला गेला.





4. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतीकारकांची नावे लिहा.


अरविंद घोष
विनायक दामोदर सावरकर


चंद्रशेखर आझाद
भगतसिंग

 उत्तर : विनायक दामोदर सावरकर, अरविंद घोष, अश्विनी कुमार दत्त, राजनारायण बोस, राजगुरु, चाफेकर बंधू, शामाजी कृष्णवर्मा, रासबिहारी बोस, मादाम कामा, खुदिराम बोस, रामप्रसाद बिस्मिल, अशपाक उल्लाखान, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, जतीनदास हे प्रमुख क्रांतीकारक होते.


5. स्वातंत्र्य चळवळी मध्ये बाळ गंगाधर टिळक यांचे योगदान कोणते? 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

उत्तर : 1) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे काँग्रेसमधील जहालमतवादी नेते होते. 2) अर्ज व विनंत्या करून ब्रिटिश सरकार भारताला स्वातंत्र्य देणार नाही या गोष्टीवर टिळकांचा विश्वास होता. 3) स्वातंत्र्याच्याऐवजी उत्तम प्रशासन हा पर्याय होऊच शकत नाही याचे समर्थन टिळकांनी केले.  4)  स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून टिळकांनी स्वतंत्र भारत हे लक्ष्य ठेवले. 5) सामान्य लोकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी तयार करून सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सवातून लोकांना एकतेची व राष्ट्रीयत्वाची प्रेरणा निर्माण केली.  6) तुरूंगातील वेळेचा सदुपयोग करून टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून स्वातंत्र्य चळवळीस आक्रमक रूप दिले. 7)  टिळकांनी मराठी भाषेत ‘केसरी’ व इंग्रजीत ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटीशांविरुद्ध चळवळीचे अस्त्र म्हणून त्यांचा वापर केला.  8) सर्वसामान्य माणसांना ब्रिटीशांविरुद्ध लढा देण्यास प्रेरित केले. 9) स्वराज्य, स्वदेशी, विदेशी मालावर बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचा वापर टिळकांनी प्रभावीपणे केला.10) लाल-बाल-पाल म्हणजेच लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल यांनी बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला. 11) लोकांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी आणि त्यांचा सहभाग  वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



 6. बंगालची फाळणी रद्द होण्याची कारणे कोणती?
उत्तर : ब्रिटीशांचे ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणानुसार बंगालची फाळणी झाली. त्याला भारतीय राष्ट्रीय कांगे्रेसने विरोध केला. परंतु बंगालीभाषेच्या मुस्लीम व हिंदू समुदायांना एकत्र आणण्याचे काम भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने केले. हिंदू व मुस्लीम समुदायात एकात्मता निर्माण करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. बंगालच्या फाळणी विरुद्ध संपूर्ण देशभरात जोरदार विरोध झाला. यामध्ये स्वदेशी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची होती. जहाल मतवांद्यांनी ही चळवळ सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले स्वदेशी चळवळीने विदेशी वस्तू व त्याची आयात करणाèया संघटनांवर बहिष्कार घातला. स्वदेशी वस्तू वापराव्यात यासाठी भारतीयांना प्रेरित केले. या स्फोटक परिस्थितीमुळे 1911 मध्ये ब्रिटीश सरकाने बंगालची फाळणी रद्द केली.

7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये निर्माण झालेले दोन गट कोणते ?
उत्तर :    मवाळ व जहाल असे दोन गट निर्माण झाले.

8. कोणता काळ मवाळयुग म्हणून ओळखला जातो ?
उत्तर : काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिला वीस वर्षाचा काळ रूढपणे ‘मवाळयुग’ म्हणून ओळखला जातो.

9. ‘मवाळ मतवाद्यांचा काळ’ कोणता ?
उत्तर :  1885 ते 1905 या कालावधीला ‘मवाळ मतवाद्यांचा काळ’ असे इतिहासकार मानतात.

10. मवाळमतवादी नेत्यांची नावे लिहा. 


दादाभाई नौरोजी
गोपाळकृष्ण गोखले


उत्तर :   मवाळ नेत्यांमध्ये म.गो. रानडे, व्योेमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी आणि गोपाळकृष्ण गोखले हे प्रमुख होते

11. स्वदेशी चळवळीने काय केले ?
उत्तर : स्वदेशी चळवळीने विदेशी वस्तू व त्याची आयात करणाèया संघटनांवर बहिष्कार घातला. स्वदेशी वस्तू वापराव्यात यासाठी भारतीयांना प्रेरित केले. या स्फोटक परिस्थितीमुळे 1911 मध्ये ब्रिटीश सरकाने बंगालची फाळणी रद्द केली. 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024