1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूंच्या बदल्यात .......... देतात.2. भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ...........मध्ये झाली.
3. ........... हे जपान देशातील चलन आहे.
4. ........... मध्ये भारत सरकारने 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
5. किरकोळ रक्कमेमध्ये ......... व ......... चा समावेश असतो.
6. जेव्हा पैशाचा पुरवठा देशातील उपलब्ध सेवा व वस्तूंपेक्षा जास्त असतो तेव्हा ........... निर्माण होतो.
7. चेक्स म्हणजे ........... चा पैसा आहे.
उत्तरे : 1. वस्तू 2. 1 एप्रिल 1935 3. येन 4. 1969 5. एम. 1 व एम. 2 6. चलन फुगवटा 7. बँकेचा
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. ‘वस्तू विनिमय पद्धत’ म्हणजे काय?उत्तर : प्राचीन काळात लोक पैशाचा वापर करीत नसत तर वस्तूंच्या बदल्यात वस्तू देत व घेत याला वस्तू विनिमय पद्धत असे म्हणतात.
2. पैशाचा अर्थ व त्याची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर : पैशामुळे वस्तू व सेवांची खरेदी करू शकतो. तो मोजता येतो आणि आपण त्याचा संग‘ह करू शकतो. रॉबर्टसन् यांच्यामते ‘वस्तूसाठी द्यावी लागणारी अथवा इतर व्यावहारिक कर्ज फेडण्यासाठी व्यापक प्रमाणात स्वीकारली जाणारी वस्तू म्हणजे पैसा’.
पैशाच्या कार्याचे प्रकार दोन आहेत. 1. प्राथमिक किंवा मु‘य कार्य 2. दुय्यम कार्य
1. प्राथमिक किंवा मु‘य कार्य - अ) विनिमयाचे माध्यम किंवा आदान प्रदानाचे साधन. ब) मूल्यमापन.
2. दुय्यम कार्य - अ) कालांतराने पैशाची रक्कम फेड करणे. ब) संग‘ह मूल्य क) स्थानांतर मूल्य.
3. भारतीय रिझर्व बँकेची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर : रिझर्व बँकेची कार्ये : 1. चलनी नोटा छापण्याचा एकाधिकार 2. सरकारची बँक म्हणून कार्य करणे 3. बँकांची बँक म्हणून कार्य करणे 4. राष्ट्रीय समाशोधन केंद्र (नॅशनल क्लिअररिंग हाऊस) 5. कर्जाच्या प्रमाणावर नियंत्रण 6. विदेशी विनिमय संग‘हाचे पर्यवेक्षण (र्डीर्शिीींळीळेप) 7. बँकेची सवय लावणे 8. चलनी नोटांच्या वितरणावर नियंत्रण ठेवणे. 9. आर्थिक स्थैर्य टिकविणे. 10.देशाला हितावह अशी पैसा व कर्जाची व्यवस्था करणे.
परिणामकारी संशोधन करणे, आकडेवारी गोळा करणे, बँकिंग संबंधीचे ज्ञान लोकांपर्यंत पोहचविणे या समृद्ध पंरपरा तिने जोपसल्या आहेत. आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेचे (ठइख) उपक‘म अत्यंत उपयुक्त आहेत. अनेकविध उपक‘मांद्वारे पैशांचा पुरवठा आणि भाववाढीवर होणाèया परिणामावर नियंत्रण ठेवून विकासाची गती वाढवते.
4. भारतातील पैसा पुरवठा करण्याच्या पद्धती कोणत्या?
उत्तर : भारतात पैशाच्या पुरवठ्यासंबंधी चार पद्धती आहेत
M1, M2, M3 व M4.
M1 = चलनी नोटा व नाणी + वाणिज्य बँकामधील ठेवी
M2, = M1 + पोस्ट आँफिसमधील बचत ठेवी
M3 = M1 + वाणिज्य बँकामधील मुदत ठेवी
M4 = M3 +पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी
5. भारतीय रिझर्व बँकेने योजिलेले कर्ज नियंत्रणाचे उपाय कोणते?
उत्तर : कर्जावरील नियंत्रणाचे उपाय
याचे दोन प्रमुख विभाग आहेत अ) सं‘यात्मक ब) गुणात्मक
अ) सं‘यात्मक कर्जनियंत्रणाचे उपाय : यामुळे व्यवसाय व लोकांना उपलब्ध होणाèया रक्कमेची माहिती मिळते. त्याची तीन घटकात विभागणी केली जाते (1) बँकदर (2) खुल्या बाजारपेठांचे कार्य (3) राखीव गंगाजळीची आवश्यकता
ब) गुणात्मक कर्ज नियंत्रणाचे उपाय : कर्ज घेण्याचा उद्देश व कर्जाचा विनियोग यावर गुणात्मक कर्ज नियंत्रणाचा परिणाम होतो. गुणात्मक कर्जनियंत्रणाचे उपाय खालील प्रमाणे आहेत.
1) कर्जाच्या मार्जिन प्रमाणातील बदल 2) कर्जाची कमाल मर्यादा किंवा कर्जाचे वाटप 3) नैतिक दबाव 4) थेट कारवाई
6. रॉबर्टसनची पैशाची व्या‘या सांगा.
उत्तर : रॉबर्टसन् यांच्यामते ‘वस्तूसाठी द्यावी लागणारी अथवा इतर व्यावहारिक कर्ज फेडण्यासाठी व्यापक प्रमाणात स्वीकारली जाणारी वस्तू म्हणजे पैसा’.
7. वस्तु विनिमय पद्धतीतील समस्या कोणत्या ?
उत्तर : 1. मोजमापाचे सार्वत्रिक मूल्य 2. वस्तु वाटपातील अडचणी 3. परस्परांच्या गरजांमधील भिन्नता 4. संग‘हित करण्याच्या समस्या.
8. सांकेतिक पैसा म्हणजे काय ?
उत्तर : व्यापारी व सावकार लिखित हुंडीचा वापर करत ही हुंडी म्हणजे प्रत्यक्षात पैसे नव्हते परंतु मागणी व खरेदी शक्य होऊ लागल्यामुळे सांकेतिक पैसा म्हणून त्याचा स्वीकार होऊ लागला
9. भारताच्या चलनाचे नाव काय ?
उत्तर : रुपया
10. अमेरिकेच्या चलनाचे नाव काय ?
उत्तर : डॉलर
11. इंग्लंडच्या चलनाचे नाव काय ?
उत्तर : पौंड
12. जपानच्या चलनाचे नाव काय ?
उत्तर : येन
13. चीनच्या चलनाचे नाव काय ?
उत्तर : येन
14. बँकेचा पैसा कोणता ?
उत्तर : चेक्स, ड्राफ्टस
15. प्लॅस्टिकचा पैसा कोणता ?
उत्तर : क‘ेडिट कार्ड व डेबिट कार्ड
16. बँकिंग म्हणजे काय ?
उत्तर : बँकिंग म्हणजे कर्ज देणारी, भांडवल गोळा करण्यासाठी लोकांकडून ठेवी स्वीकारणारी, मागणीच्या आधारावर पैसे प्रदान करणारी या शिवाय चेक्स, ड्राफ्टस्, ऑर्डर इ. द्वारा पैशांचे आदान प्रदान करणाèया प्रकि‘येला ‘बँकिंग’ असे म्हणतात.
17. बँकेचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर : 1.आर्थिक विकासात बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. 2. लोकांकडून पैसा संग‘हित करून गुंतवणूकदारांना कर्जरूपाने पुरवठा करतात. 3. भांडवल संग‘ह व बचतीमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. 4. विविध प्रकारच्या खात्याद्वारे व आकर्षक योजनांद्वारे ग‘ाहकांकडून पैसे स्वीकारतात. 5. वाणिज्य व व्यवसायासाठी चालू कर्जदराने कर्जपुरवठा करून शेती, उद्योगधंदे व सेवाक्षेत्र यांच्या विकासात सहाय्यक ठरतात. 6. बँका ड्राफ्टस् वटवितात. क‘ेडिट कार्डस् डेबिट कार्डस् देऊन व्यवहार सोपे करतात. 7. शेअर्स मध्येही पैसा गुंतवतात.
Nice 👍
ReplyDelete