Sunday, May 12, 2019

सामाजिक चळवळी


1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. पर्यावरणविषयक (परिसर) चळवळी म्हणजे ........... होय
2. ‘नर्मदा बचाओ’ ही चळवळ ........... यांच्या नेतृत्वाखाली पार पडली
3. डॉ. शिवराम कारंथ यांनी ........... येथे अणुशक्ती केंद्र उभारण्यास विरोध केला.
4. महिला चळवळ म्हणजे ...........
उत्तरे : 1. 2.मेधा पाटकर व बाबा आमटे  3. कैगा  4.महिलांच्या हक्कांचे प्रतिपादन करणे


2.  खालील प्रश्रांची उत्तरे लिहा 

1. महिला चळवळ म्हणजे काय? उदाहरण द्या.
उत्तर : पुरुषप्रधान संस्कृतीमुळे निर्माण झालेली स्त्री-पुरुष असमानता, अत्याचार, शोषण इत्यादि विरुद्ध महिलांनी केलेला विरोध (प्रतिकार) म्हणजेच ‘महिला चळवळ’ होय. उदा. मद्यपान प्रतिबंधक चळवळ, हुंडा बंदी चळवळ.

2. जमावाच्या स्वरूपाचे वर्णन करा.
उत्तर : तात्पुरत्या काळासाठी एकत्र जमलेले लोक म्हणजे जमाव. जमावात लोक एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात. परस्पर भावना, क्रिया, मत यांचा जमावातील सदस्यांवर सहज प्रभाव पडतो जमावात अभिप्राय किंवा दबल्या गेलेल्या भावनांचे प्रदर्शन होत असते. कांहीवेळा याच भावनांचा उद्रेक होवून त्याला हिंसक वळणसुद्धा लागू शकते.

3. पर्यावरणविषयक चळवळी, त्याचा अर्थ व स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती लिहा.
उत्तर : या चळवळी शास्त्रीय असुन सजीव सृष्टीचे संवर्धन करणे हे यांचे उद्दिष्ट असते. भूमी, हवा, पाणी इ. गोष्टींचे प्रदूषण रोखणे हे ही या शास्त्रीय चळवळींचे ध्येय असते. या प्रदूषणांचे परिणाम त्वरीत दिसून येत नाहीत. वर्षानुवर्षे निसर्गाद्वारे व आदिवासी लोकांद्वारे होणाèया शोषणाचा तो परिणाम असतो. उदा 1930 चा झारखंड मुक्ती मोर्चा. परंतू या संघटनेच्या स्थापनेपूर्वी कितीतरी वर्षे झारखंडचे आदिवासी लोक औद्योगिक कंपन्यांना विरोध करीतच होते. खाणींच्या उत्खननामुळे हजारो आदिवासींना स्थानभ्रष्ट व्हावे लागले. झारखंड मुक्ती मोर्चा ही अशाच चळवळीचा एक परिणाम आहे.
यानंतर 1978 - 79 मध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने जंगलतोडीविरुद्ध आणखी एक चळवळ सुरु झाली. तिला ‘जंगल हटाव चळवळ’ असे म्हणतात. जागतिक तापमानवाढ, पाण्याच्या
स्त्रोतांचे शोषण इत्यादि विरोधी सर्व चळवळी पर्यावरणीय चळवळीमध्ये मोडतात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अनेक विद्वान लोक व संस्था सामान्य लोकांध्ये मिसळून चळवळीमध्ये सहभागी होतात.  अशा  काही पर्यावरणीय चळवळींची उदा. म्हणजे चिपको चळवळ, अप्पिको चळवळ, नर्मदा बचाव आंदोलन, सायलेंट व्हॅली आंदोलन, कैगा अणुभट्टी विरोधी चळवळ इ.

प्र. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. सामाजिक चळवळ म्हणजे काय ?
उत्तर : सामाजिक चळवळ म्हणजे मानवी समाजातील बदल, चलन आणि रूपांतराशी संबंधित एक व्यवस्थित, नियोजनबद्ध, स्वाभाविक प्रतिकाराची सामाजिक प्रतिक्रिया होय. सामाजिक चळवळ म्हणजे लोकांनी सामुहिकपणे केलली प्रतिक्रिया होय.

2. चळवळीला इंग्लीशमध्ये कोणता शब्द वापरला आहे ?
उत्तर : इंग्लीशमध्ये Movement (मुव्हमेंट) हा शब्द वापरतात.

3.  कोणताही सामान्य जीव स्वतःच्या अस्तित्वाला धक्का पोहचल्यावर त्याविरुद्ध स्वाभाविकपणे प्रतिकार करतो यालाच आपण  .......... असे संबोधतो.
उत्तर : ‘प्रतिक्रिया’

4. ..............  चळवळ हे जनसमुदायाच्या मागण्या आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध असणारे एक व्यासपीठ होय.
उत्तर :  सामाजिक

5. ‘परमेश्वर हेच सत्य’ विधान बदलून महात्मा गांधीनी नंतर त्यांनी ते कसे केले ?
उत्तर : ‘सत्य हेच परमेश्वर’

6. भारतात जातीयवादाविरुद्ध कोणी चळवळी करून प्रचंड बदल घडवून आणला ?
उत्तर : बुद्ध, महावीर, बसवेश्वर, आंबेडकर यासाख्या महात्म्यांनी जातीयवादाविरुद्ध चळवळी करुन प्रचंड बदल घडवून आणला.

7. जातीयवादाविरुद्ध  चळवळ केल्यामुळे काय बदल झाला ? 
उत्तर : यामुळे खालच्या वर्गाला वरच्या वर्गाकडे जाण्याची संधी मिळाली.

8. ‘हिंसक कृती’ म्हणजे काय ?
उत्तर : जेव्हा जमावाची  वर्तणूक तीव्र होते तेव्हा त्याला ‘हिंसक कृती’ असे म्हणतात.

9. जमावाच्या ‘हिंसक कृती’ची उदाहरणे द्या.
उत्तर :  जातीय दंगली, वर्णीय दंगली, राजकीय दंगली इ. जमावाद्वारे घडणाèया हिंसक कृतींची उदाहरणे आहेत.

10. हिंसक कृतींचे दुष्परिणाम काय होतात ?

उत्तर : 1. सार्वजनिक संपत्तीची तोडफोड करून हिंसाचार केला जातो.. 2. समाजात गोंधळ निर्माण करून गोंधळातूनच हिंसाचार भडकतो. 3. निष्पाप व निरपराध लोकांचे प्राणही जातात. 4. कायदा व सुव्यवस्था बिघडते. 5. जमावात भेदभाव निर्माण करतात.

11. कोणत्या गोष्टी समाजात दंगलींना चेतावणी देतात ?
उत्तर : जात, जमीनजुला, धर्म इ. गोष्टी हिंसक दंगलीना चेतावणी देतात.

12 . चिपकोळ चळवळीचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर : सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट्ट. ( इ.स. 1973 साली.)

13. अप्पिको चळवळ कोठे सुरू झाली ?
उत्तर : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील सल्यानी गावात (इ.स. 1983 साली)

14. नर्मदा बचाव आंदोलन चळवळीचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर : मेधा पाटकर व बाबा आमटेनी.

15. सायलेंट व्हॅली आंदोलन कोठे सुरू झाले ?
उत्तर : पालघाट तालुका, केरळ राज्य.

16.  कर्नाटकातील .......... येथे एम.आर.पी.एल. कंपनी विरोधात आंदोलन झाले ?
उत्तर : मंगळूर. 

17. कैगा प्रकल्पाविरोधात कोणी आंदोलन केले ?
उत्तर : डॉ. शिवराम कारंथ.     

17. डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या अमानवी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोणी प्रयत्न केले ?
उत्तर : तत्कालीन मंत्री श्री बसवलिंगप्पा यांनी. 

18.पहिली आंतरराष्ट्रीय कामगारसंघटना कोणती ?
उत्तर : ‘इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन’  ही पहिली आंतरराष्ट्रीय कामगारसंघटना होय.

19. 1923 मध्ये  सरकारने कोणता कायदा लागू केला ?
उत्तर : ‘कामगार सामाजिक सुरक्षा कायदा’ लागू केला.

20. अस्पृश्यताविरोधी चळवळीचा आरंभ 19 व्या शतकात कोणी केला ?
उत्तर : महात्मा जोतिराव फुले.

21. दलिताच्या हक्कांसाठी कोणी निरंतर प्रयत्न केले ? 
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.  

1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024