प्र.1 रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. मानवी हक्क दिवस .............. या दिवशी साजरा केला जातो.2. भारताने निरंतरपणे .............. मानवी हक्कांचा पुनरुच्चार केला आहे.
3. आफ्रिकेतील वर्णभेदाच्या विरोधात .............. यांनी लढा दिला.
4. मानवी हक्क म्हणजे .............. रहित समानता.
उत्तरे : 1. 10 डिसेंबर 2. सार्वत्रिक/जागतिक 3. नेल्सन मंडेला 4. वर्णभेद
प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. दुसèया जागतिक महायुद्धानंतर जगाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?उत्तर : 1. मानवी हक्कांची पायमल्ली 2. शस्त्रास्त्र स्पर्धा 3. आर्थिक असमानता 4. वर्णभेद 5.दहशतवाद
2. मानवी हक्कासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर : 1) भारताचा स्वातंत्र्य लढा ही मानवी हक्कांना दिलेली पुष्टी आहे. 2) जगभरातील मानवाच्या हक्कांचा पाठपुरावा भारताने नेहमीच केला आहे. 3) भारतीय घटनेत मूलभूत हक्कांचा समावेश करून भारताने मानवी हक्कांचा गौरव केला आहे. 4) भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत देखील जगातील मानवाचे मूळ हक्क उचलून धरले आहेत. 5) गुलामगिरी, माणसांचा व्यापार, बालकामगार पद्धत, स्त्रियांचे शोषण, आर्थिक असमानता या मानवी मूल्यांच्या èहासाचा कारणीभूत घटकांना भारताने तीव्र विरोध केला आहे. 6) वंशहत्या, सर्व प्रकारचे शोषण आणि सर्व प्रकारची दडपशाही यांना भारताने विरोध केला आहे. 7) संयुक्त राष्ट्रसंघटना आणि इतर जागतिक संरक्षणाच्या माध्यमातून भारत मानवी हक्कांच्या संरक्षणाचा आग्रहाने प्रयत्न करत आहे.8) मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी भारतात पूरक आयोग स्थापन करण्यात आले आहेत. 9) युनोच्या सर्वसाधारण सभांमधून भारताने मानवी हक्कांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक समर्थन केले आहे.
3. ‘शस्त्रास्त्र स्पर्धा जगाला विनाशाच्या खाईत लोटणार’ या विधानाच्या आधारे शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे होणारे परिणाम लिहा.
उत्तर : 1) शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक भय, अस्थिरता तणाव व प्रत्यक्ष युध्द परिस्थिती इ. गोष्टी घडू शकतात. 2) पृथ्वीचे व मानवाचे अस्तित्व नष्ट होऊ शकते. 3) शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे आर्थिक नुकसान होते. 4) अणुयद्धामुळे व अणुयुगामुळे शस्त्रास्त्र नियंत्रण व निशस्त्रीकरण हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
4. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांची लक्षणे कोणती?
उत्तर : 1) वसाहतवादाला बळी पडलेली राष्ट्रे ही आर्थिकरित्या मागासलेली राहिली. 2) या राष्ट्रांत कृषी व्यवसाय, उद्योगधंदे, वाहतूक आणि दळणवळण, विज्ञान, शिक्षण, आरोग्य इ. क्षेत्रात मागासलेपणा असतो. 3) या राष्ट्रांत आहार, भांडवल, तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा, उच्चशिक्षण सुविधांचा अभाव असतो. 4) आंतरराष्ट्रीय व्यापारी धोरण, मुक्त व्यापारी धोरण, जीवघेणी व चुकीची स्पर्धा, जागतिकीकरण या सर्वांचा परिणाम या राष्ट्रांवर होताना दिसतो.
5. आर्थिक असमानता दूर करण्यासाठी भारताने कोणती पावले उचलावयास हवीत?
उत्तर : 1. अलिप्तवादी धोरण स्वीकारले पाहिजे. 2. कोणत्याही अटीशिवाय विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांना मदत करण्याच्या धोरणाचा भारताने पुरस्कार करावा.
6. ‘वर्णभेद मानवतेच्या विरोधात आहे’ स्पष्ट करा.
उउत्तर : 1) गोèया लोकांनी काळ्या लोकांना वर्णावरून दिलेली वाईट व अपमानास्पद वागणूक म्हणजे वर्णभेद होय. 2) भारत, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडातील अनेक राष्ट्रांना वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. भारताचे परराष्ट्र धोरण वर्णभेदाला विरोध करते. 3) विश्वातील सर्व माणसे समान आहेत हा विचार आमचा परराष्ट्र धोरणातील महत्वाचा मुद्दा आहे. 4) मूठभर गोèया लोकांनी वर्णभेदाच्या नावावर बहुसंख्य काळ्या लोकांना अमानवी वागणूक दिली आहे. 5) वर्णभेदामुळे मानवाची स्वतंत्रता, त्याचे अस्तित्व, हक्क व मूल्ये धोक्यात येतात. त्याला गुलामाप्रमाणे वागविले जाते, हे मानवतेच्या दृष्टीने विघातक आहे. 6) नेल्सन मंडेलांनी त्याला आफ्रिकेत विरोध केला. युनोने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांची घोषणा करून वर्णभेदाला विरोध केला आहे.
7. कोणत्या गोष्टींच्या आधारावर मानवी हक्कांची अवहेलना व शोषण झालेले दिसून येते.
उत्तर : धर्म, वंश, लिंग, जात, वर्ण, आणि राष्ट्रीयता यांच्या आधारावर मानवी हक्कांचे शोषण झालेले दिसून येते.
8. जागतिक मानवी हक्काच्या घोषणेनुसार कशावर प्रतिबंध घालण्यात आला आहे ?
उत्तर : 1.गुलामगिरीची पद्धत 2.माणसांचा व्यापार 3.बालकामगार पद्धत 4.स्त्रियांचे शोषण.
9. लोकशाही राष्ट्रांनी आपल्या संविधानात समाविष्ट केलेले घटनात्मक मानवी हक्क कोणते ?
उत्तर : 1.जगण्याचा हक्क 2. स्वातंत्र्याचा हक्क 3. संरक्षणाचा हक्क 4. धार्मिक स्वातंत्र्य 5. शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क.
10. या देशात मानवी हक्कांची पायमल्ली व शोषण होताना आढळून येते ?
उत्तर : निरंकुश हुकूमशाही किंवा एकपक्षीय राजवटीत मानवी हक्कांची पायमल्ली व शोषण होते.
11. मानवी हक्क जाहिरनाम्यामध्ये काय आहे ?
उत्तर : या मार्गदर्शिकेत 30 कलमे आहेत. उदा. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी स्वातंत्र्य, प्रतिष्ठा व समानता हे हक्क प्राप्त आहेतच. त्यामध्ये गुलामगिरी तसेच स्त्रियांच्या शोषणाचे निर्मूलन करण्याचीही तरतूद आहे.
12. भारतीय संविधानात कोठे मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे ?
उत्तर : भारतीय संविधानात तिसèया भागात 12 ते 35 कलमांतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश केला आहे.
13. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
उत्तर : ‘मानवी हक्क आयोगाची’ स्थापना झाली.
14. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी भारतात स्थापन करण्यात आलेले आयोग कोणते ?
उत्तर : ‘राष्ट्रीय मानव हक्क आयोग’, ‘महिला आयोग’ ‘राष्ट्रीय परिशिष्ट जाती आयोग’, ‘राष्ट्रीय परिशिष्ट जमाती आयोग’, ‘मागासवर्गीय आयोग’ आणि ‘अल्पसंख्यांकांचा आयोग’
15. नि:शस्त्रीकरण म्हणजे काय ?
उत्तर : शस्त्रास्त्र स्पर्धा रोखण्यासाठी ठराविक प्रमाणात किंवा संपूर्णपणे शस्त्रास्त्रांची कपात करणे.
16. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने कोणते धोरण अवलंबिले आहे ?
उत्तर : अलिप्ततावादी.
17. तृतीय जग ही संकल्पना काय दर्शविते ?
उत्तर : मागास राष्ट्रे.
No comments:
Post a Comment