Sunday, May 12, 2019

भारतातील माती


1.  रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
1. नद्यांनी वाहून आणून संचित झालेल्या मातीला ........... असे म्हणतात.
2. काळ्या मातीला ........... व ........... असेही म्हणतात.
3. अधिक उष्णता व अधिक पाऊस पडणाèया उष्ण प्रदेशात ........... ही माती तयार होते.
4. डोंगरीमाती ........... या पिकांसाठी उपयुक्त आहे.
उत्तरे : 1. गाळाची माती  2. रेगूर मृदा व काळी कपाशीची माती 3. बाजूकडील माती (लॅटेराईट माती) 4. चहा, कॉफी, फळे इ.

2.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. भारतातील मातीचे प्रमुख प्रकार कोणते?
उत्तर : भारतातील मातीचे प्रमुख्याने खालील प्रकार केले आहेत. 1) गाळाचीमाती 2) काळीमाती 3) लालमाती 4) लॅटेराईट माती 5) वाळवंटीमाती 6) डोंगरी माती
2. भारतात काळ्या मातीची विभागणी कशी झाली आहे?
उत्तर : भारतात काळीमाती दख्खनच्या पठाराच्या बेसाल्ट खडकापासून बनलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळते. या क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगाणाचा काहीभाग, उत्तर कर्नाटक, गुजराथ व तामिळनाडूतील काही भाग यांचा समावेश होतो
3. लाल मातीची वैशिष्टये कोणती?
उत्तर : ग्रॅनाईट, नीस व इतर स्फटिकमय खडकांची झीज होऊन त्यांच्या चुèयापासून ही माती तयार होते. याचा रंग लाल किंवा फिक्कट लाल असतो. यात वाळूचे प्रमाण जास्त व चिक्कणमातीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ओलावा टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य यात कमी  असते. नाचणी, तृणधान्ये,शेंगा तंबाखू, बटाटे या पिकांसाठी ही माती उपयुक्त आहे. पाण्याचा पुरवठा झाल्यास या मातीत विविध प्रकारची पिके घेता येतात.
4. मातीची धूप व संरक्षण म्हणजे काय?
उत्तर : भूपृष्ठावरील मातीचा वरचा थर निघून जातो यालाच मातीची धूप म्हणतात.
मातीची धूप थांबविणे व सुपीकता राखून ठेवणे याला ‘मातीचे संरक्षण’ असे म्हणतात. 
5. मातीची धूप झाल्यामुळे कोणते परिणाम होतात ?
उत्तर : मातीच्या धूपेचे परिणाम  1. मातीची सुपीकता कमी होते व शेतजमिनीची उत्पादन क्षमता किंवा कस कमी होतो. 2. नदीमध्ये गाळ साचतो, पूर परिस्थिती निर्माण होते नदीचे पात्र बदलते, धरणातील
पाणीसाठयाचे सामर्थ्य कमी होते. 3. भूमीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अंतर्जल पातळी खालावते. 4. वनस्पती वाळतात व दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. 5. देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचते.
6. मातीची धूप होण्याची कारणे कोणती?
उत्तर : मातीची धूप होण्याची मुख्य कारणे 1) अरण्यांचा नाश 2) जनावरांचे सतत चरणे 3) जुन्या पद्धतीची शेती 4) बदलती शेती  5) मातीच्या वरच्या थराचा विटा, कौले इ.साठी वापर 6)  नद्या,  हिमनद्या, वारे, समुद्राच्या लाटा इ. मुळे मातीची धूप होत असते.
7. अरण्याचे उपयोग कोणते ?
उत्तर : 1. अरण्ये वैविध्यपूर्ण लाकूड मोठ्या प्रमाणात पुरवितात ज्यांचा उपयोग इंधन, इमारतीसाठी लाकूड व उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल म्हणून केला जातो. 2.अरण्ये जनावरांना चारा व लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. 3. अरण्ये ही अप्रत्यक्षपणे जमिनीच्या भूपृष्ठावरील भागाचे संरक्षण करतात. जोरात वाहणाèया पाण्याच्या प्रवाहापासून मातीची धूप होणे थांबवितात. 5. वाळवंटीकरण थांबवितात.  6. मातीची सुपीकता वाढविण्यासाठी सहाय्य करतात. 7. तापमान वाढीवर नियंत्रण ठेवून पर्यावरणाचा समतोल राखतात. 8. ते वन्यप्राण्यांचे आश्रय स्थान आहे.
8. भारतात आढळणारे अरण्यांचे विविध प्रकार कोणते ?
उत्तर : भारतात सहा प्रकारची अरण्ये आढळतात.
1) उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये 2) उष्ण कटिबंधातील पानझडी अरण्ये 3) खुरट्या वनस्पती आणि गवताळ प्रदेश 4) वाळवंटी अरण्ये 5) डोंगरी अरण्ये 6) मँग्रोव्ह अरण्ये  

1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024