1. योग्य शब्द भरुन खालील रिकाम्या जागा भरा.
1. भारतीय घटनेच्या ............ कलमानुसार अल्पसंख्याक समाज शैक्षणिक संस्था उभ्या करू शकतो.
2. ............ कलमान्वये अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यात आले.
3. ‘अस्पृश्यता फौजदारी कायदा’ ............ मध्ये अस्तित्वात आला.
उत्तरे : 1. 30 व्या 2. 17 व्या 3. 1955.
2. गटचर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. सामाजिक असमानतेची कारणे काय आहेत?
उत्तर : 1. लिंग. जात. व्यवसाय, वर्ग आणि वंश हाच सामाजिक असमानतेचा पुरावा आहे.
2. अगोदरच अस्तित्वात असलेल्या सामाजिक संधींची असमानता हीच सामाजिक असमानतेचे कारण आहे.
3. ही असमानता अशीच सुरु आहे. त्यामध्ये साहित्य, स्त्रोत. उत्पन्न, संधी, मान्यता, आणि सामाजिक स्तर.
4. अन्न आणि सामाजिक सुरक्षितता, जात, उत्पन्न आणि लिंगावर आधारित भेदभावातील दुर्लक्षामुंळे आज समाजात असमानता दिसून येते.
2. लिंग असमानता कशी पसरली?
उत्तर : आमचा सामाजिक ट्टष्टीकोन हा परस्परावलंबी आहे. म्हणजे, एका माणसाचे विचार दुसèया माणसाच्या विचारावर प्रभाव पाडतात. असा व्यक्तीवरील प्रभाव हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे विचार किंवा शेजारील व्यक्तींचे विचार यामुळे पडतो म्हणून प्रेरणादायी घटनाच एखादा मुलगा अथवा मुलीच्या शिक्षणाला पूरक ठरते. लिंग असमानता ही प्रामुख्याने शालेय शिक्षण आणि आरोग्याच्या सोयींमध्ये प्रकर्षाने दिसते.
3. सामाजिक स्तराची वैशिष्टये कोणती?
उत्तर : सामाजिक स्तराची वैशिष्टये -
1. सामाजिक स्तर ही सामाजिक धारणा आहे.
सामाजिक मान्यता आणि महत्व यावर हा स्तर आधारलेला आहे. कोणत्याही शारीरिक वैशिष्ट्यावर तो अवलंबून नाही. उदा एखाद्या व्यक्तीचा स्तर हा त्याची उंची, सौंदर्य, शक्ती यासारख्या शारिरीक वैशिष्ट्यावर अवलंबून नसून त्याचे शिक्षण उत्पन्न, व्यवसाय, बुद्धिमत्ता, कौशल्य आणि इतर सामाजिक वैशिष्ट्यांवर अवलंबून आहे.
2. सामाजिक स्तर हा सार्वत्रिक आहे
जेव्हा मानवी समाज अस्तित्वात आला, तेंव्हा सामाजिक स्तर हा श्रम विभागणी, व्यवसाय, उत्पन्न अणि इतर सामाजिक वैशिष्ट्यांवर आधारला गेला.
3. सामाजिक स्तर प्राचीन आहे मानवाच्या जन्मापासूनच सामाजिक स्तर अस्तित्वात आहे. भटक्या समाजापासून ते सध्याच्या आधुनिक सुसंस्कृत समाजापर्यत हा सामाजिक स्तर आढळतो.
4. सामाजिक स्तर हा निरनिराळ्या मार्गाने अस्तित्वात आहे
सामाजिक स्तराला निरनिराळ्या भागात निरनिराळी नावे आहेत. उदा. प्राचीन रोमध्ये गरीब आणि श्रीमंत (प्लेबियन आणि पॅट्रीशियन) असा सामाजिक स्तर होता. तर भारतात कर्मावर आधारीत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण किंवा स्तर होते.
4. अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे कसा? चर्चा करा.
उत्तर : 1. भारतीय समाजातील अनिष्ट प्रथा म्हणजे अस्पृश्यता. यामुळे एका वर्गाला मनुष्य म्हणूनही कधी वागणूक दिली गेली नाही.
अस्पृश्यांना सामाजिक स्तरावरील कनिष्ठ दर्जा देण्यात आला होता.2. शिक्षणापासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आले. 3. मालमत्तेचा हक्क नाकारला. 4. अस्पृश्यांना राजकीय सहभाग नाकारला गेला.
5. अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी कोणत्या कायदेशीर उपाययोजना केलेल्या आहेत?
उत्तर : 1) भारतीय घटनेचे 17 वे कलम अस्पृश्यतेचे खंडन करते. 2) इ.स. 1955 मध्ये अस्पृश्यतेच्या विरोधात कायदा अंमलात आणला. 3) इ.स. 1976 मध्ये मुलभूत हक्क व संरक्षण कायद्यान्वये अस्पृष्यांना त्यांचे मुलभूत हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न केला. 4) भारतात अस्पृश्यता मानने हा कायद्याने गुन्हा आहे. 5) मागासवर्गीयांना शैक्षणिक, राजकीय, आर्थिक बाबतीत व नोकरीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. 6) इ. स. 1989 च्या कायद्यानुसार अस्पृश्यतेच्या निर्मूलनाची जबाबदारी राज्यांना देण्यात आलेली आहे.
6. सामाजिक स्तराचे मुख्य प्रकार कोणते ?
उत्तर : 1) आदिवासी समाज 2) गुलामगिरी 3) वतनदारी पध्दत
4) वर्णव्यवस्था 5) जाती व्यवस्था
7. ‘सामाजिक स्तर’ म्हणजे काय ?
उत्तर : मानवी समाजात, लोकांमधील वर्गवारी ही श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच अशी विभागली गेली आहे. लोकांची हीच वर्गवारी आणि निरनिराळे स्तर यालाच ‘सामाजिक स्तर’ म्हणतात.
8. सामाजिक न्याय आणि लोककल्याण करणे हे राज्यसरकारचे कर्तव्य आहे असे कोणते कलम सांगते ?
उत्तर : 39 वे कलम
9. 14 वर्षाखालील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरवले पाहिजे असे कोणते कलम सांगते ?
उत्तर : 45 वे कलम
10. भाषण स्वातंत्र्य व स्वत:चे मत मांडण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार कोणत्या कलमानुसार मानण्यात आला
उत्तर : 19 व्या कलमानुसार
11. 19 वे कलम अल्पसंख्याकांबाबतीत कशाला कर्तव्य मानते ?
उत्तर : अल्पसंख्यांक मुलांचे कल्याण करणे, त्यांना संधी उपलब्ध करुन देणे हे घटनात्मक कर्तव्य आहे
12. कोणते कलम अल्पसंख्यांकांना सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण पुरवते ?
उत्तर : 29 वे कलम
13. कोणते कलम अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापण्यासाठी मदत पुरवते ?
उत्तर : 30 नं. चे कलम
14. कोणत्या कलमाने मागासवर्गीय जाती आणि जमातींना शिक्षण पुरवणे हे सरकारी कर्तव्य ठरविण्यात आले आहे ?
उत्तर : 46 वे कलम
15. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत जगण्याचा हक्क हा शैक्षणिक हक्काशी जोडला आहे ?
उत्तर : 21 वे कलम
16. कोणत्या कलमानुसार मुलांना शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे ?
उत्तर : 21 वे कलम
17. उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्रप्रदेश सरकार यांच्यातील खटल्यात न्यायालयाने काय सांगितले आहे.
उत्तर : उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्रप्रदेश सरकार यांच्यातील न्यायप्रविष्ट घटनेमध्ये 1993 साली सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले आहे की 21 अ कलमानुसार 14 वर्षाखालील मुलांना शिक्षण हक्क मिळालाच पाहिजे. या निर्णयानुसार न्यायालयाने सांगितले आहे की अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत, संपूर्ण शैक्षणिक स्तराकडे समान दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. यामुळे, आपल्या देशातील सर्व नागरिकांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळाला आहे.जगण्याच्या हक्काचाच तो एक भाग आहे.
No comments:
Post a Comment