खालील प्रश्रांची उत्तरे लिहा.
1. पहिल्या अँग्लो - मराठा युद्धाची कारणे द्या.उत्तर : पहिले अँग्लो - मराठा युद्ध (1775-1782) : 1. बक्सारच्या लढाईत पराभूत होवून ब्रिटीशांच्या आश्रयाला आलेल्या दुसèया शाह आलमशी मराठ्यानी हातमिळवणी केली आणि त्याला दिल्लीच्या तख्तावर बसविले. 2. इंग्रजांच्या ताब्यात असलेले कोरा आणि अलाहाबाद हे प्रांत शाह आलमने मराठ्यांना दिले यामुळे इंग्रज व मराठ्यांमध्ये वैर निर्माण झाले. 3.पेशवेपदासाठी राघोबानी नारायणरावांचा खून केला. त्यामुळे अंतर्गत युद्ध सुरू झाले. 4. नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राघोबादादांऐवजी नारायणरावांचा मुलगा दुसरा माधवराव याला पेशवेपद देण्यात आले.5. यामुळे राघोबा ब्रिटीशांच्या आश्रयाला गेला. या संधीचा आपल्याला पुरेपूर फायदा घेता येईल असा ब्रिटीशांचा अंदाज होता. 1775 ते 1782 दरम्यान मराठे व ब्रिटीशांमध्ये प्रदीर्घ युद्ध झाले.
2. सहाय्यक सैन्यपद्धतीमधील अटी सविस्तरपणे लिहा.
उत्तर : सहाय्यक सैन्य पद्धती : 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली याने ‘सहाय्यक सैन्य पद्धती’ अंमलात आणली
सहाय्यक सैन्य पद्धतीतील अटी
1. सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणाèया राज्यकर्त्यानी इंग्रजांची एक मोठी फौज आपल्या राज्यात ठेवून घेवून तिच्या खर्चाची तरतूद करावयाची. तसेच सैनिकांना वेतन देवून जमिनीवर कांही प्रमाणात महसूलही द्यावयाचा. 2. राज्यकर्त्यांनी इतर राज्यांशी तसेच इतर संस्थानांशी स्वतंत्र करार करावयाचे नाहीत. त्यासाठी त्यांना गव्हर्नरची परवानगी घेणे बंधनकारक राहील. 3. राज्यकर्त्यांना इंग्रजांचा वकील आपल्या दरबारी ठेवावा लागेल. 4. इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही युरोपियनांची नेणूक करता येणार नाही. 5. वरील सर्व सेवांच्या बदल्यात त्या राज्यकर्त्याला ईस्ट इंडिया कंपनी कडून अंतर्बाह्य संपूर्ण संरक्षण मिळेल. 3. तिसèया अँग्लो - मराठा युद्धाची कारणे कोणती ?
उत्तर : तिसरे अँग्लो - मराठा युद्ध (1817-18) 1. स्वतःची पत व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मराठा घराण्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. 2. ईस्ट इंडिया कंपनीच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी पेशव्यांनीसुद्धा आटोकाट प्रयत्न केले. 3. पेशव्यांनी पुण्यातील इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला चढवून तेथे जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला.
4. खालसा धोरण (दत्तकवारसा नामंजूर) भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्ताराला कसे पूरक ठरले?
उत्तर : 1848 मध्ये लॉर्ड डलहौसीने भारतातील सर्व संस्थाने ब्रिटीश साम्राज्यामध्ये विलीन करून घेण्यासाठी ‘खालसाधोरण’ म्हणजेच ‘दत्तकवारसा नामंजूर’ हे धोरण अवलंबिले ज्याद्वारे दत्तक घेतलेल्या
राजांच्या मुलांना वारसाहक्क नाकारण्यात आला. यानुसार जर एखाद्या निपुत्रिक राजाचा मृत्यू झाला तर त्याच्या दत्तक पुत्रांना गादीवर बसण्याचा कायदेशीर हक्क नव्हता आणि असे राज्य आपोआपच ब्रिटीश साम्राज्यामध्ये विलीन केले जात असे. या धोरणा अंतर्गत सातारा, नागपूर, संबलपूर, उदयपूर, जयपूर, झाशी यासारखी अनेक संस्थाने खालसा करण्यात आली.
No comments:
Post a Comment