Sunday, May 12, 2019

भारताचे परराष्ट्र धोरण


प्र.1 रिकाम्या जागा भरा.
1. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार ......... यांना म्हटले जाते.
2. जगातील कोणत्याही गटात सामील न होणे म्हणजे ......... धोरण होय.
3. स्वातंत्र्यापूर्वी भारत ......... या देशाची वसाहत होता.
उत्तरे  : 1. पं. जवाहरलाल नेहरू  2. अलिप्त नीती  3. ब्रिटिश

प्र. 2. खालील प्रश्नांवर  चर्चा करून त्यांची उत्तरे लिहा.

1. परराष्ट्र धोरण म्हणजे काय?
उत्तर : एका राष्ट्राने दुसèया राष्ट्राशी अवलंबलेले धोरण म्हणजेच परराष्ट्र धोरण होय.
2. ‘‘परराष्ट्र धोरण राष्ट्राच्या विकासाला सहाय्यक असते’’ कसे?
उत्तर : थोर तत्त्ववेता अ‍ॅरिस्टॉटलने मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे सांगितले. ज्याप्रमाणे व्यक्ती एकाकी जीवन जगू शकत नाही, त्याचप्रमाणे राष्ट्रसुद्धा एकाकी राहू शकत नाही. त्याला आंतरराष्ट्रीय संबंध हे जोपासावेच लागतात. प्रत्येक सार्वभौम राष्ट्राचे स्वतंत्र असे परराष्ट्र धोरण  असते. त्यांच्यात अंतर्गत व बाह्य धोरण असते. ते विकासाला सहाय्यक असते. आजुबाजूच्या राष्ट्रांशी आपण मैत्रीचे  धोरण राबवून शांती व सौहार्द निर्माण करू शकतो. वेगवेगळ्या गोष्टींची देवाण घेवाण करू शकतो. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी वा इतर संकटावेळी हेच धोरण आपल्याला कितपत मदत मिळेल हे ठरविते.
3. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे ध्येय (प्रमुख वैशिष्ट्ये ) काय आहे?
उत्तर : 1. राष्ट्राची सुरक्षा 2. राष्ट्राचा आर्थिक विकास 3. भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचे देशांतर्गत प्रसारण  4. मित्रराष्ट्रांची संख्या वाढविणे 5. आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे.
4. भारत वसाहतवादाच्या विरोधात का आहे?
उत्तर : 1) वसाहतवाद  म्हणजे एखाद्या राष्ट्राने दुसèया राष्ट्रावर नियंत्रण मिळवून स्वत:च्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी त्या राष्ट्राचा उपयोग करणे. 2) भारत ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला बळी पडला. त्यामुळे भारताचे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले होते. 3) प्रत्येक राष्ट्राला स्वत:चे राजकीय व आर्थिक स्वातंत्र्य हवे असते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत वसाहतवादाला तीव्र विरोध करतो. याविरोधात लढूनच भारताने स्वातंत्र्य मिळविले आहे. 4) भारतासोबत आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देश वसाहतवादाचे बळी ठरले. 5) वसाहतवादामुळे जागतिक शांतता व सौख्याला बाधा येते.  6) वसाहतवादामुळे मानवी मूल्ये व हक्कांची पायमल्ली होते. त्यामुळे  दिल्ली (1949) आणि बाडुंग (1955) ला झालेल्या आशियायी देशांच्या  संमेलनात  स्वत:चे वसाहत विरोधी धोरण जाहीर केले.   
5. ‘पंचशील तत्त्वे’ कोणकोणती?
उत्तर :   1) प्रत्येकाच्या प्रादेशिक ऐक्यतेचा व सार्वभौमत्वाचा परस्परांनी आदर करणे. 3) परस्परांनी परस्परांवर आक्रमण न करणे.  4) एकमेकांच्या वैयक्तिक व अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ न करणे. 5) समानता आणि परस्परांचे फायदे याकडे लक्ष देणे.6) शांततापूर्ण सहजीवन प्रस्थापित करणे.
6. ‘सध्याच्या जगाला नि:शस्त्रीकरणाची अत्यंत गरज आहे’ असे भारत प्रतिपादन करतो. का? स्पष्ट करा.
उत्तर : 1) एखाद्या राष्ट्राने टप्याटप्याने शस्त्रास्त्रे कमी करणे, नष्ट करणे म्हणजे नि:शस्त्रीकरण होय. 2) शस्त्रास्त्राचा साठा, निर्मिती व विक्री करण्याचे जगभरामध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. 3) ही स्पर्धा अशीच सुरू राहिली तर तिसरे महायुद्ध अटळ आहे, अशी भीती भारताने व्यक्त केली आहे. 4) प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या किंवा गैरसमजुतीमुळे शस्त्रास्त्रांचा वापर होण्याची भीती निर्माण झाली आहे. 5) प्रत्येक राष्ट्राला स्वत:च्या संरक्षणासाठी शस्त्रांची जरी गरज असली तरी आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेहरूंच्या काळापासून भारताने शस्त्रीकरणाला विरोध केला आहे.     

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024