या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. बृहद् हिमालय पर्वतरांगाना ............ असेही म्हणतात.2. हिमालयातील ............ या रांगा थंड हवेच्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहेत.
3. दक्षिण भारतातील ............ हे अतिउंच शिखर आहे.
4. पश्चिमघाट व पूर्वघाट हे ............ या पर्वतात एकत्र जुळतात.
5. उत्तरेकडील महामैदाने ............ मातीपासून बनलेली आहेत.
उत्तरे : 1. हिमाद्री 2. मध्य हिमालय (लेसर हिमालय) 3. अनैमुडी 4.निलगिरी 5.गाळाच्या
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. भारताचे प्राकृतिक विभाग कोणकोणते?उत्तर : भूरचना आणि भूमीवरील लक्षणांच्या आधारावर भारताची चार प्रमुख प्रकारात विभागणी केली जाऊ शकते. ते म्हणजे
1) उत्तरेकडील पर्वत 2) उत्तरेकडील महामैदाने
3) द्वीपकल्पीय पठार 4) किनाèयापट्टयांची मैदाने व बेटे
2. उत्तरेकडील मैदानांची रचना कशी झाली आहे?
उत्तर : उत्तरेकडील महा मैदान : हे मैदान सतलज, गंगा आणि ब्रम्हपुत्रा या तीन नद्यांनी हिमालयातून वाहून आणलेल्या सुपीक गाळाच्या मातीने बनलेले आहे. हे अत्यंत सपाट मैदान आहे याच्या पृष्ठ भागावर कोठेही खडक आढळत नाही. हे मैदान हिमालय पर्वत आणि भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्यामध्ये पसरलेले आहे.
3. शिवालिक पर्वत रांगांबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : शिवालिक टेकड्या : या हिमालयाच्या बाहेरील किंवा पायथ्याकडील टेकड्यांच्या रांगा आहेत. या टेकड्या प्रमुख हिमालयाच्या दक्षिण भागात आहेत याला ‘बाह्य हिमालय’ असेही म्हणतात. हिमालयातील या अत्यंत कमी उंचीच्या रांगा आहेत. याची उंची 600 ते 1500 मीटर असून रुंदी 15 ते 150 कि.मी. इतकी आहे. ही रांग पश्चिमेकडे जम्मू काश्मीर पासून पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेली आहे. येथे सपाट मैदानांनी बनलेल्या दèया निर्माण झालेल्या आहेत. त्यांना ‘डून्स’ असे म्हणतात. उदा. डेहराडून.
4. पूर्वघाट व पश्चिम घाट यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर : पूर्वघाट: हा भारताच्या पूर्व किनारपट्टीस समांतर पसरलेला आहे. उत्तरेकडे महानदीच्या खोèयापासून दक्षिणेकडे निलगिरी पर्वतापर्यंत विस्तारलेला आहे. येथे पश्चिमघाट व पूर्वघाट एकमेकांस जोडले जातात. हे पश्चिमघाटा इतके उंच नसून या रांगा तुटक तुटक अशा पसरल्या आहेत. पूर्व घाटांत ‘आर्मकोंडा’ हे अति उंच पर्वत शिखर आहे.
पश्चिम घाट : हा तापी नदीच्या खोèयापासून कन्याकुमारीच्या भूशिरापर्यंत पश्चिम किनारपट्टीस (अरबी समुद्र) समांतर पसरलेला आहे. यालाच ‘सह्याद्रीच्या रांगा’ असेही म्हणतात. या रांगा अखंड व सलग पसरलेल्या आहेत. याच्या पश्चिम बाजूस तीव्र उतार असून पूर्वभाग सौम्य उताराचा आहे. बोरघाट, तालघाट आणि पालघाट या येथील प्रमुख खिंडी आहेत. पश्चिम घाटातील पालघाटाच्या दक्षिणेस अन्नामलाई, पळणी, कार्डम (इलाईलाई) या पर्वत रांगा पुढे विस्तारल्या आहेल. अन्नामलाई पर्वत रांगात ‘अनैुडी’ (2695 मी.) हे दक्षिण भारतातील अति उंच शिखर आहे.
5. उत्तरेकडील पर्वंत रागांचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर : उत्तरेकडील पर्वंत रागांचे महत्त्व : 1. हिमालय पर्वत ही नैसर्गिक तटबंदी असून त्यामुळे परकीय आक्रमणे आणि मध्य आशियातून येणारे अतिशीत वारे अडविले जातात. 2. बाष्पयुक्त मान्सून वारे अडविले जातात त्यामुळे भरपूर पाऊस पडण्यास मदत होते. 3. त्याच्या उतरणीवर घनदाट अरण्ये आहेत आणि येथील प्रदेश मळयांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. उदा. आसाम मधील चहाचे मळे. 4. विविध प्रकारच्या खनिजसंपत्तीने हा प्रदेश समृद्ध आहे. 5. अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. या नद्यांवर धबधबे निर्माण झाले असून त्यांचा जलविद्युतशक्ती निर्माण करण्यासाठी उपयोग होतो.
No comments:
Post a Comment