Sunday, May 12, 2019

भारताचे हवामान


1) खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
1. भारतात ............ या प्रकारचे हवामान आहे.
2. भारतातील ............ या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो.
3. भारतातील ............ या ठिकाणी सर्वात कमी तापमान असते.
4. भारतात ............ या महिन्यात अतिशय थंडी असते.
उत्तरे : 1. उष्णकटिबंधीय मान्सून 2 मौसीनराम (मेघालय)  3. द्रास (कारगील जवळ)  4. जानेवारी 



2)  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
उत्तर : भारताच्या हवामानावर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणजे स्थान, जलसंपत्ती, भूस्वरूप व मान्सून वारे. म्हणून भारताचे हवामान प्रदेशानुसार व ऋतूानानुसार बदलत जाते

2. भारतातील प्रमुख मोसमाचे प्रकार कोणते?
उत्तर : भारताचे वार्षिक हवामान हे चार ऋतूंध्ये विभागलेले आहे. 1) हिवाळा (डिसें ते फेब्रु) 2) उन्हाळा (मार्च ते मे) 3) पावसाळा (जून ते सप्टें) 4) परतीच्या मान्सूनचा काल (मध्य सप्टे. ते नोर्व्हे)

3. नैऋर्त्य मान्सून वारे कसे तयार होतात त्याचे वर्णन करा.
उत्तर : उन्हाळ्याच्या अखेरच्या काळात उष्णता जास्त असल्याने मध्यभारतात कमी दाबाचा प्रदेश तयार होतो. या उलट हिंदी महासागरात जास्त दाबाचा प्रदेश तयार होतो त्यामुळे बाष्पयुक्त वारे नैऋर्त्य दिशेकडून भारताकडे वाहू लागतात. यामुळे देशातील विविध भागामध्ये पाऊस पडतो जवळजवळ 75% पाऊस या ऋतूत पडतो.
नैऋर्त्य मान्सून वाèयाच्या भारतातील द्वीपकल्पीय भागात दोन शाखा झाल्या आहेत. त्या म्हणजे अरबी समुद्रातील शाखा व बंगालच्या उपसागरातील शाखा. अरबी समुद्रावरून वाहणाèया वाèयाुंळे पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील भागात जोराचा पाऊस पडतो. हे वारे जसजसे पूर्वेकडे वाहतात. तसतसा पाऊस कमीकमी होत जातो. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील प्रदेशाला ‘पर्जन्य छायेचा प्रदेश’ म्हणतात.

4. हिवाळ्यातील हवामानाच्या स्थितीचे वर्णन करा.
उत्तर : या ऋतूत सूर्याची लंबरूप किरणे दक्षिण गोलार्धात पडतात. त्यावेळी भारतात सूर्याची किरणे तिरपी पडतात. देशाच्या उत्तरेला थंड वातावरण व दक्षिणेला उष्ण वातावरण असते. जानेवारी महिन्यात अतिथंडी असते. या मोसमात उत्तर भारतातील राज्ये जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशातील पर्वतावर अति कमी तापमान असते. कारगील जवळील ‘द्रास’ येथे भारतातील सर्वात कमी म्हणजे (- 40) सें.ग्रे. इतके तापमान असते. पर्वतीय धुके व दंव हे सामान्यतः सगळीकडे दिसून येते. या पर्वत प्रदेशात प्रचंड हिमवृष्टी होते. भारतातील एकूण वार्षिक पर्जन्यापैकी फक्त 2% पाऊस हिवाळ्यात पडतो

5. भारतातील कमी पावसाचे प्रदेश कोणते?
उत्तर : सुमारे 50 सें.मी. पेक्षा कमी पाऊस पडणाèया प्रदेशाला कमी पावसाचा प्रदेश म्हणतात यामध्ये कच्छचा प. भाग, राजस्थानमधील थर वाळवंट व त्याच्या सभोवतालचा प्रदेश म्हणजे पश्चिम पंजाब, हरियाणा व गुजराथ, उत्तर झास्कर पर्वतरांगा व पश्चिम घाटातील पर्जन्य छायेचा प्रदेश.  ‘रोयली’ (जि.जैसलमेर, राजस्थान)  हे भारतातील अत्यंत कमी पाऊस पडणारे  ठिकाण आहे.

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024