Sunday, May 19, 2019

तीन मुद्दे


लेखक परिचय : 
आचार्य विनोबा भावे ऊर्फ विनायक नरहर भावे  (1895-1982)
सुप्रसिद्ध विचारवंत, तत्त्वज्ञ व भाष्यकार, गांधीवादी विचारसरणीचे व भूदान चळवळीचे प्रणेते, ‘मधुकर’, ‘जीवनदृष्टी’, ‘गीता प्रवचने’, ‘लोक नीती’ इ. विचारप्रवर्तक पुस्तके त्यांनी लिहिली. ‘आचार्यकुल’ स्थापन करून शिक्षणविषयक नवे विचार मांडले.

मूल्य : श्रमप्रतिष्ठा
साहित्य प्रकार : वैचारिक लेख
संदर्भ ग्रंथ : मधुकर
मध्यवर्ती कल्पना : कोणतेही काम यशस्वी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण प्रत्येक काम यशस्वी होईलच असे नाही. त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी कोणती पथ्ये पाळावी लागतात याची माहिती आचार्य विनोबा भावे यांनी या पाठात दिली आहे.


स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. विनोबा भावे यांनी कोणती चळवळ सुरू केली?
उत्तर : विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली.

2. विनोबानी कशाची स्थापना करून शिक्षणविषयक नवीन विचार मांडले?
उत्तर : विनोबानी आचार्यकुलाची स्थापना करून शिक्षणविषयक नवीन विचार मांडले.

3. कामाची तीन स्वतंत्र अंगे कोणती?
उत्तर : कामात वेग पाहिजे, नेटकेपणा पाहिजे आणि ज्ञान पाहिजे ही कामाची तीन स्वतंत्र अंगे आहेत.

4. कामाच्या बाबतीत कोणता नियम असतो?
उत्तर : काम जाणून केले पाहिजे, नेटके केले पाहिजे, वेगाने केले पाहिजे. हे तिन्ही गुण साधले म्हणजे काम साधले.

5. सफाई आणि नेटकेपणा याबाबतीत विनोबाजींनी कोणता दाखला दिला आहे?
उत्तर : सफाई आणि नेटकेपणा याबाबतीत विनोबाजीनी लष्कराचा दाखला दिला आहे.

6. कामाचा गाभा असे विनोबाजी कशाला म्हणतात?
उत्तर : सुंदरतेला विनोबाजी कामाचा गाभा म्हणतात.

प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन-तीन वाक्यात लिहा.

1. रसोई बनविणे केव्हा निरुपयोगी म्हणता येईल?
उत्तर : रसोई करणारा मनुष्य रसोई चांगली करतो. पण पाच माणसांची रसोई बनवायला त्याला पाच तास लागतात, तर त्याचे रसोई बनविणे निरुपयोगी आहे. काम करताना वेळेचेही भान आवश्यक आहे.

2. लष्करी शिस्त आणि व्यवहार यांचा मेळ विनोबाजींनी कसा मांडला आहे?
उत्तर : कामातील सफाई आणि नेटकेपणा याबाबतीत लष्कराचा दाखला विनोबांनी दिला आहे. लष्कराने अमुक मैल अमुक वेळात कूच करून जायचे हे तर झालेच  पण हे कूच करण्याचे काम पद्धतशशीर, लष्करी शिस्तीवर हुकूम, टापटीप सांभाळून झाले पाहिजे. पाचपाचांच्या की चाराचारांच्या जशा ठरल्या असतील तशा रांगा करून चालले पाहिजे. सर्वांची पावले सारखी पडली पाहिजेत. कोणी मागेपुढे होता कामा नये. असे होईल तरच त्या कूच करण्याचा उपयोग व्हावयाचा. त्या कामात नेटेकेपणा नसेल तर ते काम निरर्थक होते. कारण सुंदरता हा कामाचा गाभा आहे. ती केवळ शोभा नाही असे विनोबाजींनी म्हटले आहे.

3. लिहिणे केव्हा आले म्हणायचे असे विनोबा म्हणतात?
उत्तर : जलद, धावत्या हाताने लिहिता आले पाहिजे. वाटोळे, सरळ, मोकळे असे सुंदर लिहिता आले पाहिजे आणि शुद्धलेखनाच्या नियमावर हुकूम शुद्ध लिहिता आले पाहिजे. तसे झाले म्हणजे लिहिणे आले असे म्हणता येईल.

4. सुंदरता ही कामाची शोभा नसून तो कामाचा गाभा आहे असे का म्हटले आहे?
उत्तर : कामातील सुंदरता साधली नाही, तर काम करून, न करून सारखे होते. सुंदरता किंवा नेटकेपणा हा गुण कामात आल्याने दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम खुलेल. ज्या कामात नेटकेपणा नाही ते काम निरर्थक आहे. सुंदरता ही केवळ शोभा नसून तो कामाचा गाभा आहे.

प्र. 3. पुढील प्रश्नांची प्रत्येकी चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा.

1. वेग साधणे हा कामाचा एक आवश्यक मुद्दा ठरतो हे पटवून देताना विनोबानी कोणती उदाहरणे दिली आहेत ?
उत्तर : काम नीट होण्यासाठी प्रथम त्या कामातला संपूर्ण वेग साधला पाहिजे.हे स्पष्ट करण्यासाठी विनोबानी परीक्षा, लष्कर व रसोईचे उदाहरण दिले आहे. परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरे उरलेल्या वेळेच्या आत लिहून झाली पाहिजेत असा नियम असतो. यात वेळ महत्त्वाचा असतो. अमुक मैल कूच करून जायचे असते एवढाच प्रश्न लष्कराकडे नसतो. तर अमुक वेळेच्या आत अमुक मैल जायचे आहे, असा मुदत बंदिचा प्रश्न लष्करापुढे असतो.   रसोई बनविणाèया माणसानेही वेळेचे भान ठेवून रसोई बनविणे सोयीचे ठरते. अन्यथा ते निरुपयोगी ठरते.

2. काम करत असताना ज्ञानाचे महत्त्व काय ?
उत्तर : काम करत असताना त्या कामाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लष्कराने ठरलेल्या वेगात अगदी पद्धतशीर कूच केले आणि ते ठरलेल्या वेळी पोचले सुद्धा; पण ठरलेल्या जागी मात्र  पोचले नाही. जाणून काम केले नाही म्हणजे अशा दशा होते. बरोबर नकाशे आखून रस्त्यातील वळणे कोठे कोठे कसकशी सापडावयाची हे ठरवून त्याप्रमाणे कूच केले पाहिजे.

3. लेखकाने नेटकेपणाचे महत्त्व कसे सांगितले आहे ?
उत्तर : कोणतेही काम नीट होण्यासाठी त्या कामात सफाई किंवा नेटकेपणा आवश्यक आहे. यासाठी त्यांनी लष्कराचा दाखला दिला आहे. लष्कराने अमुक मैल अमुक वेळात कूच करून जायचे हे तर झालेच  पण हे कूच करण्याचे काम पद्धतशीर, लष्करी शिस्तीवर हुकूम, टापटीप सांभाळून झाले पाहिजे. पाचपाचांच्या की चाराचारांच्या जशा ठरल्या असतील तशा रांगा करून चालले पाहिजे. सर्वांची पावले सारखी पडली पाहिजेत. कोणी मागेपुढे होता कामा नये. असे हाईल तरच त्या कूच करण्याचा उपयोग व्हावयाचा. कामात नेटेकेपणा नसेल तर ते काम करून, न करून सारखे होते. नेटकेपणामुळे दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम खुलेल. ज्या कामात नेटकेपणा नाही ते काम  निरर्थक आहे.

प्र. 4. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1. ................ चा प्रश्न लष्करापुढे असतो.

2. सर्व कामे या प्रवाहाचे ................ सांभाळून करायची असतात.

3. विनोबा भावे यांचे पूर्ण नाव ............... हे होय.

4. शुद्ध लेखनाच्या ..................... शुद्ध लिहिता आले पाहिजे.

5. कामात ........... किंवा ............... हा गुण आल्याने दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम खुलेल.

उत्तरे : 1. मुदत बंदीचा  2. धोरण  3. विनायक नरहर भावे  4. नियमावर हुकूम  5. सुंदरता, नेटकेपणा

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024