Thursday, May 23, 2019

राष्ट्रीय एकात्मता



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. भारत धर्मनिरपेक्षता राष्ट्र असल्याने कोणत्याही धर्माला .................... करता येत नाही.

2. ‘जातीयवादहा .................... महत्त्वाचा अडथळा आहे.

3. प्रजासत्ताक दिन हा .................... राष्ट्रीय सण आहे.

4. भारतात सुमारे  .................... भाषा आहेत.

5. राष्ट्रीय ध्वज .................... चा भाग आहे.

उत्तरे : 1. विरोध 2. राष्ट्रीय एकात्मतेत 3. राष्ट्रीय 4. 1652 5. राष्ट्रीय बोधचिन्हाचा

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. राष्ट्रीयत्व म्हणजे काय ?
उत्तर : नागरिकांचे त्यांच्या राष्ट्राविषयीचे प्रेम म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना होय. यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रदेशात जन्माला येऊन त्या प्रदेशाविषयी ऐक्याची भावना असणे होय. यात भाषा, संस्कृती, इतिहास, वंश, धर्म, जात जमात इ. विषयीची आपुलकीची भावना असते.

2. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ?
उत्तर : वंश, जात, धर्म, संस्कृती व भाषा यामध्ये भिन्नता असूनसुद्धा आपण सारे एक आहोत या भावनेला राष्ट्रीय एकात्मता असे म्हणतात.

3. भारतात विविधता असण्याची कारणे कोणती ?
उत्तर : भारतामध्ये भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक व वांशिक भेद आहेत त्यामुळे येथे विविधता आढळते.

4. राष्ट्रीय एकात्मतेला सहाय्य करणारे घटक कोणते ?
उत्तर : राष्ट्रीय एकात्मतेला सहाय्य करणारे घटक 1. धर्मनिरपेक्षता 2. लोकशाही 3. राष्ट्रीय सण 4. राष्ट्रीय बोधचिन्हे 5. परस्परसहकार्य (परस्परावलंबन) याशिवाय संभाषण, प्रसारमाध्यमे, नैसर्गिक वैशिष्ट्ये.

5. ‘जातीयवादहा एकात्मतेला कशी बाधा आणतो ते स्पष्ट करा.
उत्तर : 1. विविध जाती, वंश धर्माच्या संघटना करून आपल्या धर्माला, जातीला प्रोत्साहन दिल्यामुळे एकात्मतेला धोका पोचतो. 2. अनेक जातीय संघटनांमुळेही धोका वाढतो. 3. धर्मांधता व संकुचितपणामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येते. 4. जातीयवादी संकुचित वृत्तीमुळे एकतेची भावना कमी होते. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येते.

--------------------------------------------------------------------------------------------------------




No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024