Thursday, May 23, 2019

देशाची संरक्षण व्यवस्था



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्य उद्देश .............. हा आहे.

2. आपल्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख .............. हे असतात.

3. भूसेनेच्या प्रमुखाला .............. म्हणतात.

4. संरक्षण मंत्रिमंडळाचे मुख्यालय .............. येथे आहे.

5.         हिंदुस्थान शिप बिल्डींग यार्ड .............. येथे आहे.

6. सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र .............. येथे आहे.

7. भारतीय रेडक्रॉस सोसायटीची स्थापना .............. मध्ये झाली.

उत्तरे : 1. देशाचे संरक्षण 2. राष्ट्रपती 3. जनरल 4. नवी दिल्ली 5. विशाखापट्टण 6. येलहंका (बेंगळूर) 7. 1920

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. कारवारजवळील नावीक तळाचे नाव काय ?
उत्तर : कारवारजवळ सीबर्ड नावीक तळआहे.

2. आपल्या संरक्षण मंत्रिमंडळाचे चार विभाग कोणते ?
उत्तर : संरक्षण मंत्रिमंडळाचे चार विभाग - 1. संरक्षण विभाग 2. संरक्षण उत्पादन विभाग 3. संरक्षण संशोधन विभाग 4. संरक्षण अभिवृद्धी विभाग

3. भारतीय भूसेनेची रचना कशी आहे याचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर : भूदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. या दलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात. लेफ्टनंट जनरल, कमांडर, मेजर जनरल, मास्टर जनरल, लष्करी सचिव, लष्करी अभियंते इ. अधिकारी लष्कर प्रमुखांच्या अखत्यारित काम पाहतात. भूदलाचे तीन विभाग असतात. 1. पायदळ 2. घोडदळ 3. तोफखाना रेजिमेंट, रणगाडे व तोफांचा समावेश असणारे विशेष दल. याचबरोबर वितरण आणि अभियांत्रिकी या विभागांचाही समावेश असतो. सुलभ प्रशासन व्यवस्थेसाठी भूदलाचे 7 विभागात विभाजन केलेले आहे.

4. भूसेनेच्या कमांडस कोणत्या ?
उत्तर : सुलभ प्रशासन व्यवस्थेसाठी भूदलाचे 7 विभागात विभाजन केलेले आहे.  1. पश्चिम कमांड (चांदी मंदीर - चंदीगड) 2. पूर्व कमांड (कोलकत्ता- प.बंगाल) 3. उत्तर कमांड (उधमपूर - काश्मीर) 4. दक्षिण कमांड (पुणे - महाराष्ट्र) 5. केंद्र कमांड (लखनौ - उत्तर प्रदेश) 6. प्रशिक्षण कमांड (माव - मध्यप्रदेश) 7. वायव्य कमांड (जयपूर - राजस्थान). या विभागांचे आणखी दोन भागात विभाजन केले आहे. 1. प्रादेशिक विभाग 2. प्रादेशिक उपविभाग. लेफ्टनंट जनरल हा प्रादेशिक विभागाचा प्रमुख असतो तर ब्रिगेडियर हा प्रादेशिक उपविभागाचा प्रमुख असतो.

5. भारतीय वायूदलाच्या कार्याचे वर्णन करा.
उत्तर : भारतीय वायूदल युद्धकाळात तसेच शांततेच्या काळात परिणामकारकरित्या आणि शौर्याने कार्य करते. भारतीय वायूदल हे देशाची सुरक्षितता, एकात्मता व स्थैर्य राखण्यात यशस्वी झाले आहे.

6. भूसेनेत भरती होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता कोणती ?
उत्तर : 1. भूसेनेत भरती होऊ इच्छिणाèयाकडे सेवाभाव, देशप्रेम, आत्मबलिदानाची तयारी तसेच देशातील विविध संस्कृतींशी जुळवून घेण्याची वृत्ती इ. गुण असावे लागतात. 2. देशाचा कोणताही नागरिक त्याचा धर्म, जात, वर्ग, जमात इ. बाबी विचारात न घेता सेनादलात भरती होऊ शकतो. परंतु शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान इ. बाबतीत काही अटींची पूर्तता करावी लागते.

7. एन.सी.सी. चे उद्देश कोणते ? त्याचे फायदे कोणते ?
उत्तर : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात शिस्त, नेतृत्व, मैत्री, सेवाभाव यासारखे गुण विकसित करणे हाच एन.सी.सी.चा मुख्य उद्देश आहे. याचे फायदे पुढीलप्रमाणे - 1. ज्यांनी एन.सी.सी.चे प्रशिक्षण घेतले असेल त्यांना सेनादलात सहजपणे प्रवेश मिळू शकतो. 2. ज्या छात्रांना प्रशिक्षणात उच्च श्रेणी प्राप्त होते त्यांच्यासाठी व्यावसायिक विद्यालयात काही जागा राखीव असतात. 3. या छात्रांना शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. 4. प्रशिक्षणादरम्यान छात्र दूरची रपेट, दूरचा खडतर प्रवास, विमानोड्डाण, गिर्यारोहण, जलपर्यटन इ. साहसी कृत्ये करतात. 5. ज्या विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.चे प्रशिक्षण घेतले आहे असे विद्यार्थी सैनिकी शाळेत प्रवेश घेऊ शकतात.

8. इंडियन रेड क्रॉस सोसायटीबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : इंडियन रेड क्रॉस सोसायटीची 1920 साली स्थापना करण्यात आली. ही एक मानवतावादी स्वयंसेवी संघटना असून 35 राज्यात व केंद्रशासित प्रदेशात मिळून 700 शाखा कार्यरत आहेत. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारताचे राष्ट्रपती हे या संघटनेचे चेअरमन असतात तर केंद्रीय आरोग्यमंत्री हे अध्यक्ष असतात. सेक्रेटरी जनरल हे प्रशासकीय अधिकारी असतात. या संघटनेच्या प्रशासनामध्ये 19 सदस्य व 1 सचिव असतो. राष्ट्रपती 6 सदस्यांची नियुक्ती करतात तर उरलेले 12 सदस्य हे राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून निवडले जातात. नैसर्गिक आपत्तीकाळात तसेच अत्यंत निकडीच्याप्रसंगी रेडक्रॉस संस्था जनतेला आपली अमूल्य सेवा देते. ही संस्था आजारी लोकांना तसेच युद्धातील जखमींना कोणताही भेदभाव न करता नि:स्वार्थ सेवा देते. ही संस्था 7 मूलभूत तत्त्वांना महत्त्व देते. 1. मानवता 2. नि:पक्षपातीपणा 3. तटस्थता 4. स्वातंत्र्य 5. स्वयंसेवा 6. एकता 7. आंतरराष्ट्रीय हित.

------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024