Thursday, May 23, 2019

कुटुंब



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. फॅमिली (कुटुंब) हा शब्द .................... या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे.

2. समाजाचा जीवकोष .................... याला म्हटले जाते.

3. पिता कुटुंबप्रमुख असलेल्या कुटुंब पद्धतीला .................... असे म्हणतात.

4. केरळच्या मलबार भागातील नायर समाजात .................... कुटुंबपद्धती दिसून येते.

उत्तरे : 1. फॅमलस  2.कुटुंब 3. पितृप्रधान कुटुंब 4. मातृप्रधान

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. कुटुंब हा समाजाचा घटक आहे. कसा ?
उत्तर : कुटुंब ही एक प्राचीन परंपरागत पद्धत आहे. माता-पित्याच्या संबंधाचा परिपाक म्हणजे कुटुंब होय. कुटुंब हा समाजाचा घटक आहे. तो एक जीवकोशाप्रमाणे आहे. त्यातून समुदायाचा विकास होऊन राष्ट्र निर्माण होते.

2. कुटुंबाचे प्रकार सांगा ?
उत्तर : कुटुंबाचे प्रकार 1. पितृप्रधान कुटुंब 2. मातृप्रधान कुटुंब 3. आधुनिक केंद्र (विभक्त) कुटुंब 4. अविभक्त कुटुंब

3. अविभक्त कुटुंब म्हणजे काय ?
उत्तर : अविभक्त कुटुंबात पती-पत्नी, त्यांची मुले, नातवंडे, पणतवंडे अशी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिढ्या एकाच घरात एकमेकाशी प्रेमाने आणि सहकार्याने एकत्र नांदत असतात. एकत्र स्वयंपाक, जेवण करणे, संपत्तीवर सर्वांचा समान हक्क, कुटुंबातील कर्तव्यांची सगळ्यावर जबाबदारी, एकत्रित पूजाअर्चा करणे इ. एकत्रित असते. या कुटुंबातील सर्व सदस्यांचे परस्परांशी रक्ताचे नाते असते. जवळीकीच्या नात्यांचा हा समूह असतो.

4. केंद्र कुटुंब म्हणजे काय ?
उत्तर : कुटुंबाची रचना आणि त्यात राहणाèया पिढ्यांची संख्या यावरून केंद्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंब असे वर्गीकरण करता येते. आई वडील आणि अविवाहित मुले असणाèया कुटुंबाला विभक्त किंवा केंद्रीय कुटुंब म्हटले जाते.

5. कुटुंबाची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर : 1. कुटुंब ही एक वैश्विक सामाजिक पद्धत आहे, जी जगातील सर्वच राष्ट्रात अस्तित्वात आहे. कुटुंब हा सामाजिक पद्धतीचा मध्यवर्ती घटक आहे. 2. कुटुंबातून शेजारी, खेडी, शहरे आणि राष्ट्र यांची निर्मिती झाली आहे. 3. कुटुंबातील सदस्य बालपणापासूनच सामाजिक जबाबदाèया (बांधिलकी) आणि सहकार्यासारख्या गोष्टी आत्मसात करतात. 4. कुटुंब व्यक्तीच्या सामाजिक रूढी, नैतिकता, वागणूक इ. बाबतीत नियंत्रित ठेवते. 5. कुटुंब म्हणजे पारंपरिक मूल्यांची जोपासना करणारी संस्था अथवा घटक आहे.

6. व्यक्तीच्या सामाजिक विकासात बालपण आणि युवावस्था कोणती भूमिका पार पाडतात.
उत्तर : व्यक्तीच्या सामाजिक विकासात त्याचे बालपण आणि युवावस्था हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. मूल आपली मातृभाषा शिकते व त्यातून समाजाबद्दल ज्ञान प्राप्त करते. आईच्या सहवासात आणि तिच्या देखभालीखाली वाढत असताना आवश्यक गुण, चारित्र्य आणि मूल्ये यांच्याबद्दल ज्ञान प्राप्त करून विकसित होत जाते. आपल्या समवयस्कांशी स्नेह, आत्मियता विकसित होते. नेतृत्व गुण आणि साहचर्य इ. गुण विकसित होतात. त्याची सामाजिक वर्तणूक त्याच्या युवावस्थेत आकार घेते. या अवस्थेत व्यक्ती मैत्रीची ओढ, स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि कोणतीही गोष्ट स्वीकारण्याच्या वृत्ती इ. गोष्टी सतत शिकत असते. या काळातील वर्तणूक आणि गुण जसे विकसित झालेले असतात त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावर अगदी वृद्धापकाळापर्यंत टिकून राहतो.

7. अविभक्त कुटुंबाची लक्षणे कोणती ?
उत्तर : कुटुंबाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे - 1. मोठा विस्तार 2. संपत्ती 3. निवासस्थान 4. स्वयंपाकघर 5. धर्म 6. स्वयंपूर्णता 7. अधिकारांची रचना.

8. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबाची संख्या वाढत चालली आहे. कारणे द्या.
उत्तर : आधुनिक समाजात विभक्त कुटुंबाची संख्या वाढत चालली आहे कारण खासगी जीवनशैली, वैयक्तिक सुख, वैयक्तिक आराम, सुख समाधान, संपत्तीची मालकी, बदलणारी मूल्ये. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, भौगोलिक आणि सामाजिक संरचना, विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेली प्रगती, शहरीकरण, लोकशाही आणि समानतेची तत्त्वे, धार्मिक प्रभाव, लौकिक मनोभावाचा व्यापक प्रसार, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सबलीकरण ही सगळी विभक्त (केंद्र) कुटुंबाच्या वाढीची कारणे ठरत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024