Thursday, May 23, 2019

सामाजिकीकरण



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. मानव प्राण्याला समाजशील प्राणी बनविण्याच्या प्रक्रियेला ................... म्हणतात.

2. आई ही मुलाची पहिली ................... असते.

3. ................... मुळे बालकांची मने कळीप्रमाणे हळूवार विकसित होतात.

उत्तरे : 1. सामाजिकीकरण 2. गुरु 3. सामाजिकीकरण

 प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. सामाजिकीकरणामध्ये समवयस्कांच्या भूमिकेबद्दल चर्चा करा.
उत्तर : समवयस्क हे देखील सामाजिकीकरणासाठी हातभार लावणारे मुख्य घटक आहेत. वर्गमित्र मैत्रिणी, खेळातील सवंगडी किंवा मित्र यांचा यामध्ये समावेश होतो. सहकार्य आणि परस्परांना समजून घेण्याची वृत्ती, तडजोड या गोष्टी या नात्याचा आधार असतात. समवयस्क समूहातील सदस्य एकाच वयाचे असल्याने पालक किंवा शिक्षकांकडून ज्या गोष्टी शिकू शकत नाहीत त्या या सदस्यांकडून शिकल्या जातात. सामाजजिक दृष्टिकोनातून हे ज्ञान आवश्यक असते.

2. कौटुंबिक वातावरणात मूल कोणती मूल्ये शिकते ?
उत्तर : मुलाच्या सामाजिकीकरणात कुटुंबाची भूमिका मोठी असते. माता पिता मुलांशी घनिष्ठ किंवा रक्ताच्या नात्याने बांधलेले असतात.  पालकांची वर्तणूक, संस्कृती, परस्पर प्रतिक्रिया, शिष्टाचार इ. मुलावर मोठा प्रभाव पडत असतो. प्रेम, काळजी, देखभाल, दयाळूपणा, करुणा, सहकार्य, नैतिक मूल्ये, सहनशीलता या सर्वांचा बालकाच्या वाढीवर आणि त्याच्या मानसिकतेवर फार मोठा प्रभाव पडतो आणि हे सर्व गुण घेतच बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो.

3. सामाजिकीकरणात धर्माची भूमिका काय असते ?
उत्तर : सामाजिकीकरणात धर्माची भूमिका महत्त्वाची असते. सामाजिक जीवनाचा पाया दृढ करण्याचे कार्य धर्म करतो. धर्मामध्ये नैतिकतेच्या मार्गावरून जीवन व्यतीत करण्याचे शिक्षण दिले जाते. धार्मिक श्रद्धा, पालक, नातेवाईक व ज्येष्ठ यांच्यासोबतीने धार्मिक स्थळाला दिलेली भेट यांचे मूल्य निरीक्षण करतात. सणवार, जत्रा, धार्मिक सण या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे दानशूरपणा, सेवाभाव, समाजसेवेची वृत्ती इ. गोष्टी विकसित होतात. ज्याचा समाजाला उपयोग आणि गरज असते त्या बèयाच गोष्टी धर्म शिकवितो.

4. सामाजिकीकरणाचे महत्त्व काय ?
उत्तर : सामाजिकीकरणाचे महत्त्व - 1. मानवाला समाजशील प्राणी होण्यास सहाय्यक होते. 2. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. 3. जीवनात शिस्त येते. 4. वेगवेगळी जीवनावश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त होते. 5. समाजातील भेदभाव (अंतर) कमी केले जातात. 6. उज्ज्वल भविष्याला आकार देण्याची, निर्माण करण्याची संधी मिळते. 7. संस्कृती, परंपरा सतत पुढे जपण्यासाठी सहाय्य होते. होते. 8. सामाजिक व्यवस्था सुरक्षित राखली जाते.

5. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत शिक्षक कोणती भूमिका निभावतात.
उत्तर : सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत शिक्षक महत्त्वाची भूमिका निभावतात. शाळेत मूल फक्त शिक्षणाने प्रभावित होत नाहीत तर शिक्षक व सोबतच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव खूप मोठा असतो. शिक्षकांची मुलांशी वागणूक प्रेमळ स्वभाव, सहृदयता, समानता यांची अभिव्यक्ती शिक्षकांनी शिकविलेली नैतिक मूल्ये यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास प्रेम, धैर्य इ. सद्गुण विकसित होतात. शिक्षकांनी शालेय व शालाबाह्य रचनात्मक कार्यक्रमात मुलांना भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे. त्यामुळे सामाजिकीकरण दृढ करणे साध्य होते.

6. आधुनिक समाजात प्रसारमाध्यमे सामाजिकीकरणास कशा प्रकारे सहाय्य करतात ?
उत्तर : आधुनिक समाजात प्रसारमाध्यमे सामाजिकीकरणामध्ये मुख्य भूमिका प्रभावीरित्या पार पाडतात. प्रभावीपणे सादर केलेली जाहिरात, कथा, कादंबèया, कविता, नाटके, भित्तीपत्रके, रेडिओवरील कार्यक्रम, थोरांचे सुविचार यांचा दैनिक जीवनात खूप प्रभाव पडतो. दूरदर्शन, चित्रपट, नाटक, वृत्तपत्र, रेडिओ ही प्रसारमाध्यमे साहित्याचा उपयोग आणि सादरीकरण प्रभावीपणे करून सामाजिकीकरणास मदत करतात. याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कार्यक्रम नवीन स्थळे, शोध, संशोधन याबद्दल माहिती देत व्यक्तीच्या विकासाला सहाय्यक ठरतात.



No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024