Thursday, May 23, 2019

आपली राज्यघटना (संविधान)

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




प्रश्न 1 - गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

1. राज्याचा कारभार चालविणारा कायदा ................... हा होय.

2. नूतन कायदेमंडळाची सभा .................. रोजी झाली.

3. .................. हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

4. आपल्या घटनेने .................. सरकार पद्धतीचा अवलंब केला आहे.

5.         ज्या राज्यात लोक सार्वभौम अधिकार उपभोगतात त्यांना .................. असे म्हणतात.

6. आपल्या घटनेने आपल्या नागरिकांसाठी .................. नागरिकत्वाची तरतूद केली आहे.

7. घटनात्मक उपायांचा अधिकार कलम .................. अन्वये समाविष्ट करण्यात आला आहे.

8. राज्याच्या धोरणांची अधिकृत तत्वे .................. देशाच्या घटनेतून घेतली आहेत.

उत्तरे : 1. राज्यघटना 2. 11 डिसेंबर 1946 3. बाबासाहेब आंबेडकर 4. संसदीय (संघराज्य/संयुक्त राज्य) 5. प्रजासत्ताक 6. एकेरी  7. 32  8. आयर्लंड


प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. नूतन कायदेमंडळाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : नूतन कायदेमंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

2. आपली घटना केव्हा अंमलात आली ?
उत्तर : 26 जानेवारी 1950 रोजी आपली घटना अंमलात आली.

3. भारतीय घटनेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर :  भारतीय घटनेची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. भारतीय घटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत घटना आहे.  2. ती घटना लवचिक आहे. 3. संसदीय सरकार पद्धतीचा पुरस्कार आपल्या घटनेने केला आहे. 4. प्रजासत्ताक पद्धती 5. संघराज्य पद्धती 6. जनतेला दिलेले मूलभूत हक्क (अधिकार)  7. मूलभूत कर्तव्ये 8. राज्याची अधिकृत तत्त्वे व धोरणे 9. स्वतंत्र आणि केंद्रीय न्यायव्यवस्था 10. एकेरी नागरिकत्व 11. प्रौढ मतदान पद्धती 12. द्वि-सदन कायदेमंडळ 13. पक्ष पद्धती

4. घटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे ?
उत्तर : घटनेच्या प्रस्तावनेत भारताचे स्वातंत्र्य, प्रजासत्ताक गणराज्य, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही या गोष्टी तसेच प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मागासवर्गीयांना व अल्पसंख्यांकाना पुरेसे संरक्षण देण्याचेही वचन दिले आहे.

5. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ?
उत्तर : धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही एकाच धर्माचे पालन न करता सर्व धर्मीयांना समान स्थान देणे.  1976 मध्ये 42 व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार धर्मनिरपेक्षहा शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आला आहे. यानुसार कोणत्याही विशिष्ट धर्माला राष्ट्रीय दर्जा दिलेला नाही. नागरिकांना स्वत:च्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे.

6. आपल्या घटनेत समाविष्ट केलेले मूलभूत हक्क कोणते ?
उत्तर : आपल्या घटनेत समाविष्ट केलेले मूलभूत हक्क पुढीलप्रमाणे - 1. समानतेचा हक्क 2. विशेष स्वातंत्र्याचा हक्क 3. शोषण (पिळवणूक) विरोधी हक्क 4. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 5. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 6. घटनात्मक उपायांचा हक्क

7. मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत ?
उत्तर : भारतीय घटनेत 4 अ भागातील 51 अ कलमांतर्गत 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. ती कर्तव्ये पुढीलप्रमाणे -1. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राज्यघटनेचा आदर करणे. 2. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा देणाèया आदर्शांचे पालन करणे. 3. भारताची अखंडता जपणे. 4. मातृभूमीचे रक्षण करणे. 5. भारतीयांमध्ये बंधुत्वभाव व निष्ठा वाढीस लावणे. 6. आपला अमूल्य वारसा जतन करणे. 7. नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून वृद्धींगत करणे. 8. वैज्ञानिक दृष्टीकोन व चौकसबुद्धीचा विकास करणे. 9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. 10. वैयक्तिक व सामूहिक विकासासाठी प्रयत्न करणे. 11. 6 ते 14 वयोगटातील मुलांना पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

7. राज्याच्या धोरणाची अधिकृत तत्त्वे कोणती ?
उत्तर : राज्याच्या धोरणाची अधिकृत तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सर्व नागरिकांना पुरेशी उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करून देणे. 2. सामाईक संपत्ती आणि उत्पादन साधने काही ठराविक लोकांची वैयक्तिक मालमत्ता बनण्यापासून रोखणे. 3. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान मोबदला देणे आणि कामगारांचे स्वास्थ्य जपणे. 4. वृद्ध, रोगी, दुर्बल व असहाय्य घटकांना राष्ट्रीय मदत पुरविणे. 5. देशामध्ये सर्वत्र समान नागरी नियमांचा अवलंब करणे. 6. 6 वर्षाखालील सर्व मुलांना आरोग्यविकासाची व पूर्वशालेय विकासाची संधी उपलब्ध करून देणे. 7. ऐतिहासिक स्मारकांचे रक्षण करून ऐतिहासिक वारसा जपणे. 8. कार्यकारी मंडळ व न्याय व्यवस्था वेगळी करणे. 9. आंतरराष्ट्रीय शांतता जपणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे. 10. ग्रामपंचायतीची स्थापना करणे. 11. ग्रामीण कुटिरोद्योगांना प्रोत्साहन देणे. 12. आधुनिक पद्धतीने कृषीविकास व पशूसंवर्धनाचे व्यवसाय करणे. 13. दारुबंदीची हमी देणे. 14. शास्त्रीय पद्धतीने कृषीविकास करण्याची हमी देणे.


या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024