Thursday, May 23, 2019

क्रांती आणि राष्ट्रांचे एकीकरण



प्रश्न 1 - खाली दिलेल्या रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. इंग्लंडने अटलांटिका किनारपट्टीवर स्थापन केलेल्या तेरा वसाहतींना ................. म्हणत होते.

2. इ.स. 1774 मध्ये तेरा वसाहतींच्या प्रतिनिधींची सभा .................. येथे भरली.

3. अमेरिकेच्या स्वातंत्र्याची घोषणा इ.स. ................. मध्ये करण्यात आली.

4. ‘स्पिरीट ऑफ लॉजया ग्रंथाचा कर्ता .................

5. ‘तरुण इटली’ (यंग इटली) हा पक्ष इटलीमध्ये स्थापन करणारा .................

6. ‘रक्त आणि लोहधोरण अवलंबणारा .................

उत्तरे : 1. नवीन इंग्लीश वसाहती 2. फिलाडेल्फिया 3. 4 जुलै 1776 4. माँटेस्क्यू 5. जोसेफ मॅझिनी 6. अ‍ॅटोव्हान बिस्मार्क

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची कारणे सांगा.

उत्तर : अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची कारणे पुढीलप्रमाणे 1. वसाहतींबद्दल मायदेशाचे धोरण आणि स्वातंत्र्याविषयी वसाहतवाल्यांचे प्रेम. 2. सप्तवार्षिक युद्धाचे परिणाम 3. नौकानयन कायदा, थॉमस पेन, जॉन अ‍ॅडम्स जॉन एडवर्ड कोक आणि बेंजामिन फ्रँकलिन वगैरे लेखकांचा प्रभाव 4. क्विबेक कायदा, टाऊनशिप ड्यूटी (स्टँप ड्यूटी) आणि बोस्टन टी पार्टी वगैरे कारणांमुळे अमेरिकेत क्रांती झाली.

2. अमेरिकेच्या स्वातंत्र्य संग्रामाचे महत्त्व सांगा.
उत्तर : 1. अमेरिकेच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या लढाईत सार्टोगयेथील लढाईत ब्रिटिशांचा पराभव झाला. फ्रेंचांच्या सहाय्याने यॉर्कटाऊन युद्धात जॉर्ज वॉशिंग्टनने ब्रिटिश सैन्याचा पूर्ण पराभव केला. ब्रिटिश सेनापती कॉर्नवालीस आपल्या सैन्यासह शरण आला. 2. 1783 मध्ये झालेल्या पॅरिस येथील तहाने तेरा वसाहतींचे स्वातंत्र्य ग्रेट ब्रिटनने मान्य केले. 4 जुलै रोजी स्वातंत्र्याची घोषणा केल्यामुणे तो दिवस अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. आज तो दिवस अमेरिकन लोक स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात. 3. इ.स. 1787 मध्ये स्वतंत्र झालेल्या तेरा वसाहतींच्या प्रतिनिधींनी फिलाडेल्फिया येथे सभा घेतली आणि जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा अध्यक्ष म्हणून निवडले. 4. त्यांनी संघराज्याची राज्यघटना तयार केली. ही जगातील पहिली लिखीत घटना होय. 5. फ्रान्सच्या राज्यक्रांतीस प्रेरणा मिळाली. 6. वसाहतवाल्यांच्या बाजूने लढलेले अनेक फ्रेंच सैनिक नंतर फ्रान्सच्या राज्यक्रांतीचे नेते बनले. 7. स्पेन आणि पोर्तुगीज वसाहतींना त्यांच्या मायदेशाविरुद्ध बंड करून स्वातंत्र्य मिळविण्याची स्फूर्ती मिळाली. 8. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या नवीन राष्ट्राचा उदय झाला.

3. फ्रेंच राज्यक्रांतीस आर्थिक घटक कसे कारणीभूत ठरले.
उत्तर : 1. फ्रान्स हा मूलत: कृषिप्रधान देश होता. जरी शेती पद्धतीमध्ये काही सुधारणा झालेल्या असल्या तरी शेती अजूनही मागासलेली होती. 2. जमिनीपासून मिळणारे उत्पन्न फार कमी होते. शेतकèयांनाच जास्त कष्ट भोगावे लागत होते. 3. दुष्काळ पडणे ही गोष्ट सर्वसामान्य होती. त्यामुळे अन्नासाठी उठाव होत. 4. उद्योगधंद्यावर व्यापारी संघाचे नियंत्रण होते. अंतर्गत अडथळ्यांमुळेच आणि अधिकाèयांच्या अतिहस्तक्षेपामुळे त्यांची वाढ खुंटली होती. याचा परिणाम म्हणजे उद्योगात उत्पन्न कमी होऊ लागले.

4. इटलीच्या एकीकरणात गॅरिबॉल्डीची भूमिका कोणती ?
उत्तर : 1. गॅरिबॉल्डी हा एक चांगला लढवय्या सैनिक होता. तो यंग इटलीपक्षात सामील झाला आणि अनेक वेळा त्यांने क्रांतीचे नेतृत्व केले. 2. त्यांने रेड शर्टसनावाची सशस्त्र स्वयंसेवकाची संघटना स्थापन केली. तो ऑस्ट्रिया विरुद्धच्या युद्धात सार्डिनियाच्या बाजूने या संघटनेत सामील झाला. 3. 1860 मध्ये सिसिली व नेपल्स राज्यावर  रेड शर्टच्या सहाय्याने आक्रमण करून ती जिंकून घेतली व इटली देशाचे त्वरित एकीकरण केले आणि तेथील राजाकडे लोकशाही सुधारणांसाठी आग्रह धरला.

5. जर्मनीच्या एकीकरणाचा शिल्पकार कोण ? त्याच्याबद्दल टीप लिहा.
उत्तर : अ‍ॅटोव्हान बिस्मार्क हा जर्मनीच्या एकीकरणाचा शिल्पकार होता. प्रशियाचा राजा पहिला विल्यम याचा तो  मुख्यमंत्री होता. तो एक सरकारी नोकर असून जर्मनीचे विधिमंडळ डायेटचा सदस्य होता. तो विदेशात राजदूत म्हणून काम करून प्रसिद्धीस आला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रियाच्या नेतृत्वाखाली असलेल्या जर्मन संघराज्याच्या कार्याबद्दल सूक्ष्म माहिती होती. ऑस्ट्रिया, फ्रान्स, रशिया देशात राजदूत म्हणून त्याने काम केले होते.
जर्मनीच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांने रक्त आणि लोह’ (युद्धनीती) हे धोरण अवलंबिले. त्यासाठी त्याने बलाढ्य लष्कर बनविले. त्याचे मुख्य ध्येय ऑस्ट्रियाला जर्मन संघराज्यातून बाहेर काढणे हे होते. 1866 मध्ये उत्तर जर्मन संघराज्याची रचना केली. फ्रान्सचा सम्राट तिसरा नेपोलियन याचा दक्षिण जर्मन राज्यांच्या मदतीने ब्रिस्मार्कने पराभव केला.
---------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024