Thursday, May 23, 2019

आधुनिक युरोप



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. ‘रेनायझन्सम्हणजे ................

2. पुनरुज्जीवनाचा जनक ................ याला म्हणतात.

3. मार्टिन ल्युथरचे अनुयायी ................

4. प्रतिसुधारणा चळवळीचा नेता ................

5. ‘स्पिनिंग जेनीयंत्राचा शोध ................ यांने लावला.

उत्तरे : 1. पुनर्जन्म/पुनर्जागृती 2. पेट्रार्क 3. प्रोटेस्टंट 4. इग्नेशियस लायोला 5. जेम्स हारग्रीव्हज

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. धर्मसुधारणेचे परिणाम कोणते ?
उत्तर : धर्मसुधारणेचे परिणाम : 1. धर्मसुधारणेच्या परिणामामुळे ख्रिश्चन जगताच्या अखंडत्वाला धक्का पोहोचला. ख्रिश्चन धर्माच्या मुख्य तीन शाखा झाल्या त्या म्हणजे कॅथॉलिक चर्च, आर्थोडॉक्स चर्च आणि प्रोटेस्टंट चर्च. 2. युरोपातील अनेक देशांचे राजे पोपच्या वर्चस्वातून मुक्त झाले. 3. धर्मसुधारणेमुळेच राष्ट्रीय प्रभुत्वाचा (राष्ट्र-राज्यांचा) उदय झाला. 4. चर्चची संपत्ती आर्थिक विकासाकरिता उपयोगात आणली. 5. राष्ट्रीय भावना आणखी प्रबळ झाली आणि युरोपच्या राजांनी धार्मिक सहिष्णूतेचा स्वीकार केला. 6. या चळवळीमुळे साहित्यक्षेत्राचा विकास झाला आणि युरोपातील लोकांच्या मनावर प्रादेशिक भाषांचा प्रभाव पडला. 7. कॅथॉलिक चर्चमध्ये सुधारणा होऊन तीच पुढे प्रतिसुधारणा चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली.

2. भौगोलिक संशोधनासाठी कारणीभूत घटक कोणते ते लिहा.
उत्तर : भौगोलिक संशोधनासाठी कारणीभूत घटक : 1. इ.स. 1453 मध्ये अ‍ॅटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर काबीज केले. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम देशांमधील व्यापाराचे नवे मार्ग खुले झाले. भारतातून युरोपात निर्यात होणाèया मसाल्याच्या पदार्थांमुळे तुर्की लोकांना आर्थिक फायदा झाला. त्यामुळे युरोपियनांना भारताकडे येणारा नवीन सागरी मार्ग शोधणे भाग पडले. 2. स्पेन आणि पोर्तुगाल या देशांची सागरी व्यापारात अरबांबरोबर स्पर्धा करण्याची इच्छा होती. 3. ख्रिश्चन धर्मगुरुंना ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी नवीन देश शोधावे असे वाटत होते. 4. पूर्वेकडील देशांकडे समुद्रप्रवास करण्याचे साहस केल्याने युरोपियनांचे कुतूहल अधिक वाढले. 5.नाविकांसाठी होकायंत्र आणि ग्रहोन्नतीमापक किंवा वेधयंत्र यासारख्या उपकरणांमुळे समुद्रात दूरवर सफरी करणे सोईचे झाले. उत्तम तक्ते आणि अचूक नकाशे यामुळे खलाशांना मदत झाली. 6. चीनसारख्या देशात संपत्तीचा प्रचंड साठा आहे. अशी युरोपियनांची समजूत होती आणि त्यांच्याशी व्यापार करणे फायदेशीर ठरेल असे त्यांना वाटत होते.

3. लिओनार्दो द विन्सीच्या मुख्य कलाकृती कोणत्या ?
उत्तर : लिओनार्दो द विन्सीच्या मुख्य कलाकृती म्हणजे अंतिमभोजन आणि मोनालिसा होय.

4. पुनरुज्जीवन काळातील साहित्याच्या विकासाचे उदाहरणासहित विवरण करा.
उत्तर : 1. इटली हे अनेक दिग्गज लेखकांचे माहेर बनले होते. फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी आणि स्पेन या देशांनी सुद्धा साहित्य प्रवाहात आपले योगदान दिले. या काळातील साहित्यात धार्मिक विषयाऐवजी ऐतिहासिक विषय हाताळले जाऊ लागले. मानवी देह, शरीर वगैरे गोष्टींबद्दल लिहिले जाऊ लागले. साहित्यातील अभिव्यक्तीसाठी लॅटिन भाषेऐवजी प्रादेशिक भाषांचा वापर होऊ लागला. 2. पेट्रार्कला पुनरुज्जीवनाचा जनक असे म्हणतात. त्याने सुमारे 200 ग्रीक आणि लॅटिन हस्तलिखितांचा संग्रह केला होता. त्याने आफ्रिकाहे प्रसिद्ध काव्य लॅटिन भाषेत लिहिले. शिवाय सुनीते व गीतरचनेसाठी तो प्रसिद्ध होता. 3. बोकॅशियोने इटालियन भाषेत लिहिलेल्या 100 कथांचा संग्रह म्हणजे डेकॉमेरॉन’. 4. डान्टेने लिहिलेल्या प्रसिद्ध कृती म्हणजे डिल्हाईन कॉमेडीतर इंग्लंडच्या चॉसरने  कॅन्टरबरीटेल्सलिहिल्या. 5. स्पेनच्या सर्व्हाटिसने डॉन क्विझोटतर इंग्लंडच्या थॉमस मूरने रचलेले युटोपियाया पुनरुज्जीवन काळातील प्रसिद्ध साहित्यकृती होत. 6. इंग्लंडचा शेक्सपीयर हा श्रेष्ठ कवी व नाटककार होता. त्याने अनेक सुखान्त व दु:खान्त  नाटके लिहिली.

5. औद्योगिक क्रांतीचे परिणाम सांगा.
उत्तर : 1. उद्योगधंद्यांमध्ये अनेक बदल होऊन यंत्रांची मागणी वाढली. 2. आर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनेक बदल झाले. 3. नवनवीन उद्योगधंदे सुरू झाले. उत्पादनाचा खर्च कमी होऊन जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात मिळू लागल्या. 4. कुटिरोद्योग मोठ्या कारखान्यांबरोबर स्पर्धा करू न शकल्यामुळे त्यांचा नाश झाला. 5. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत झाले. गरीब लोक दारिद्रयातच खितपत राहिले. 6. खेड्यातील लोक शहराकडे स्थलांतर करू लागले. 7. समाजात भांडवलदारांचा एक वर्ग निर्माण होऊन मालक वर्ग व कामगार वर्ग यांचे संबंध बिघडले आणि दोन्ही वर्गात संघर्ष सुरु झाला.




No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024