Thursday, May 23, 2019

राज्य सरकार



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. भारत हा ................. असून ................. राज्ये व ................. केंद्रशासित प्रदेशांचा बनला आहे.

2. राज्य विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन व्यक्तीची नेमणूक ................. करतात.

3. कर्नाटक विधानपरिषदेमध्ये ................. सदस्य आहेत.

4. राज्य मंत्रिमंडळात ................. आणि ................. हे खरे कार्यकारी असतात.

5.         राज्यपालांची नियुक्ती ................. करतात.

6. स्टेट अ‍ॅडव्होकेट जनरलची नियुक्ती ................. करतात.

उत्तरे : 1. संघराज्य, 28 राज्ये, 6 केंद्रशासित प्रदेश 2. राज्यपाल 3. 75 4. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ 5. राष्ट्रपती 6. राज्यपाल  

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. विधानसभेच्या रचनेचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर : राज्य कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाला विधानसभा म्हणतात. यातील सदस्यांची संख्या ही त्या राज्यातील लोकसंख्येवरून ठरवलेली असते. कोणत्याही विधानसभा सदस्यांची संख्या कमाल 500 व किमान 60 असावी लागते. छोट्या राज्यातील सदस्यांची संख्या कमी असते. उदा. मिझोराम व गोवा येथे प्रत्येकी 40 सदस्य आहेत. कर्नाटक विधानसभेमध्ये 225 सदस्य आहेत. 224 सदस्य निवडून आलेले असून 1 अँग्लो इंडियन सदस्य राज्यपालांनी निवडलेला आहे. विधानसभेच्या सदस्यांचा कालावधी 5 वर्षे असतो. कॅबिनेटच्या शिफारशीनुसार मुदत पूर्ण होण्यापूर्वी विधानसभा विसर्जित केली जावू शकते. अशावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.

2. विधानपरिषदेतील सदस्य कोणकोणत्या क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करतात ?
उत्तर : कर्नाटक विधानपरिषदेतील सदस्य 5 क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करतात. काही सदस्यांची निवड विधानसभा सदस्य, स्थानिक मंडळ, पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदार संघ यामधून केली जाते. कला, साहित्य, शिक्षण, समाजसेवा, विज्ञान इ. क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या काही तज्ज्ञ नागरिकांची नेमणूक राज्यपाल करतात.

3. राज्यपालांची पात्रता आणि कार्यकालावधी याविषयी माहिती लिहा.
उत्तर : राज्यपाल होण्यासाठीची पात्रता - 1. भारताचा नागरिक असावा. 2. किमान वय 35 वर्षे असावे. 3. सरकारी नोकर नसावा. 4. संसदेचा किंवा कायदेमंडळाचा सभासद नसावा आणि जर तो सभासद असेलच तर नियुक्तीनंतर पूर्वपदाचा राजीनामा द्यावा लागतो.
राज्यपालांचा कालावधी 5 वर्षे असतो. मुदत संपल्यानंतर दुसèया राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत पदावर राहू शकतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे राज्यपालांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी परत बोलावू शकतात.

4. मुख्यमंत्री या विषयावर थोडक्यात टीप लिहा.
उत्तर : मुख्यमंत्री हे राज्यसरकारचे प्रमुख असतात. सरकारचे यश किंवा अपयश हे मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक कार्यक्षमतेवर अवलंबून असते. राज्याची विश्वसनीय व्यक्ती म्हणून मुख्यंमंत्र्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळ, कायदेमंडळाचा प्रमुख असतो तसेच आघाडी सरकारच्या पक्षाचा नेता असतो. मुख्यमंत्री हा दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचा सदस्य असावा लागतो. काहीवेळा तो कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तरीसुद्धा मुख्यमंत्री बनू शकतो परंतु त्याला 6 महिन्याच्या आत एका गृहाचा सदस्य बनणे अनिवार्य असते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024