Thursday, May 23, 2019

मानवी साधन संपत्ती


प्रश्न 1 - योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

1. ज्ञान, माहिती आणि कौशल्य असलेल्या एखाद्या देशातील कामकरी लोकांना ------------- म्हणतात.

2. 2011 मध्ये स्त्री पुरुष प्रमाण दर 1000 पुरुषांमागे ..................  स्त्रिया असा होता.

3. भारतात दर .................... वर्षांनंतर शिरगणती करण्यात येते.

4. एखाद्या देशाच्या लोकसंख्येची गुणवत्ता ................... व .................. वर अवलंबून असते.

5. एका वर्षात जन्मलेल्या दर हजारी बालकांमध्ये जन्मलेली जन्मलेली बालके की जी जन्मलेल्या एका वर्षात मृत्यू पावतात त्यास .................... दर म्हणतात

6. भारतात सरासरी जन्म दर जास्त, सरासरी मृत्यू दर ............ आहे, लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे.

उत्तरे : - 1. मानवी साधन संपत्ती  2. 940  3. दहा  4, चांगले आरोग्य व शिक्षणा 5. बालमृत्यू   6. कमी 


प्रश्न 2 - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या.

1. कामकरी लोक म्हणजे कोणते लोक ?
उत्तर : प्रौढांमध्ये काम करण्याची क्षमता असते यांना कामकरी लोक म्हणतात.

2. मानवी साधन संपत्ती म्हणजे काय ?
उत्तर : ज्या लोकांच्याकडे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि कौशल्य असते असे कामकरी लोक हे त्या देशाची मानवी साधन संपत्ती असतात.

3. 2011 च्या शिरगणतीनुसार भारताची लोकसंख्या किती होती ?
उत्तर : 2011 च्या शिरगणतीनुसार भारताची लोकसंख्या  121.01 कोटी आहे.

4. सरासरी जन्म दर म्हणजे काय ?
उत्तर : दर हजारी लोकांमध्ये किती मुलांचा जन्म होतो यालाच सरासरी जन्म दर म्हणतात.

5. 2011 मध्ये भारताचा सरासरी जन्म दर 22, सरासरी मृत्यू दर 6 होता. तर सरासरी लोकसंख्या वाढीचा दर काय होता ?
उत्तर : 1.7 टक्के इतका होता.

6. 2011 च्या शिरगणतीनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती ?
उत्तर : 2011 च्या शिरगणतीनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 होती.

7. विकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. का ?
उत्तर : विकसित देशात सर्व लोक शिक्षित आणि ज्ञानी असतात सर्वांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात यामुळे जन्म व मृत्यू दर कमी असतो. यामुळेच लोकसंख्या वाढीचा दर फार कमी असतो.


प्रश्न 3 - खालील प्रश्नांची 5 ते 6 वाक्यात उत्तरे लिहा.

1. लोकसंख्येची घनता म्हणजे काय ? एखाद्या देशाच्या लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते?
उत्तर : एक चौरस किलो मीटरच्या परिघात किती लोक राहतात यावरून लोकसंख्येची घना ठरविली जाते. ही घनता त्या देशाच्या लोकसंख्येच्या भारावर अवलंबून असते.
एखाद्या देशाची लोकसंख्या भागिले त्या देशातील एकूण भूभाग गुणिले 1000 (1कि.मी.) म्हणजे लोकसंख्येची घनता होय.
लोकसंख्येची घनता = एकूण लोकसंख्या   1000
                    एकूण जमीन

2. उत्पादनाच्या घटकातील सर्वोत्तम घटक म्हणजे मानवी साधन संपत्ती का ?
उत्तर : नैसर्गिक आणि भौतिक साधन संपत्तीपेक्षा वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी मानवी साधन संपत्ती अधिक महत्वाची आहे. नैसर्गिक आणि भौतिक साधन संपत्ती स्वत:च स्वत: वस्तू आणि सेवांचे उत्पादन करू शकत नाहीत. मानवाची बुद्धिमत्ता आणि प्रयत्नांनेच उत्पादन शक्य होते. उत्पादनासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि काम मानवी साधन संपत्ती पुरवू शकते. उदा. शेती, उद्योग, सेवा, संरक्षण वगैरे.

3. मानवी साधन संपत्तीच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर : मानवी साधन संपत्तीस चांगले शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरविल्या तर त्याचे रूपांतर मानवी भांडवलात किंवा उत्पादक मालमत्तेत होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्याची क्षमता आणि समाजात रूपांतर होऊ शकते.

4. फक्त विकसनशील देशातच लोकसंख्येची वाढ होते का ?
उत्तर : आर्थिक विकास व्हावा म्हणून अविकसित देश अनेक उपाय योजतात. सरकार लोकांना शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी पुरविते. साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविले जाते. त्यामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी होतो. या टप्प्यात जन्म दर वाढतो, मृत्यू दर कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या  वाढीचा दरही जास्त राहतो.  

5. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?
उत्तर : चांगले आरोग्य ही सामाजिक गरज आहे.  गर्भवती स्त्रिया, गरीब आणि आदिवासींच्या आरोग्य आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी अत्युत्तम आरोग्य सुविधा विकसित केल्या पाहिजे. अशा सुविधा म्हणजे दवाखाने, डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी वर्ग, खाट, आवश्यक औषधी सामग्री आणि उत्तम औषध निर्मिती उद्योग हे सर्व लोकांना उपलब्ध झाले पाहिजे. कुटुंब कल्याण व सकास आहार पुरवठा केला पाहिजे.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024