Thursday, May 23, 2019

उद्योगधंद्यांचे व्यवस्थापन



प्रश्न 1 -खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. व्यवस्थापन म्हणजे काय ?
उत्तर : जे एल. हेज यांच्या मते, ‘‘व्यवस्थापन कला म्हणजे इतर लोकांकडून कामे करवून घेणे.’’ किंवा इतरांच्या प्रयत्नाने कामे तडीस नेणे म्हणजे व्यवस्थापन होय.

2. निर्णय घेणे म्हणजे काय ?
उत्तर : अनेक गोष्टींमधून एकच गोष्ट घेणे किंवा निवडणे म्हणजे निर्णय घेणे. किंवा समस्या सोडवणे म्हणजेच निर्णय घेणे.

3. वैयक्तिक निर्णय आणि सामूहिक निर्णय म्हणजे काय ?
उत्तर : वैयक्तिक निर्णय : लहान आस्थापनांमध्ये एकमेव व्यापाराशी संबंधित उद्योगात एकच व्यक्ती निर्णय घेते याला वैयक्तिक निर्णय असे म्हणतात.
सामूहिक निर्णय : भागीदारी संस्था आणि एकत्रित सांघिक कंपन्या किंवा सहकारी सोसायट्यांमध्ये लोकांच्या संघाकडून निर्णय घेतले जातात. तेव्हा त्यास सामूहिक किंवा सांघिक निर्णय म्हणतात.

4. व्यवस्थापकीय दृष्टीतून अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व म्हणजे काय ?
उत्तर : व्यवस्थापकीय दृष्टीतून अधिकार म्हणजे कार्यालयीन अधिकार आणि जबाबदारी म्हणजे व्यक्तीची जबाबदारी अशा अर्थाने हे तत्त्व वापरले जाते.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा.

1. हेन्री फायोल यांनी सुचविलेली व्यवस्थापकीय तत्त्वे सांगा ?
उत्तर : एखाद्या व्यवसायातील निर्विघ्न आणि कार्यक्षम व्यवस्थापनेसाठी काही गरजेची तत्त्वे वापरली जातात. हेन्री फायोल यांनी सांगितलेली तत्त्वे पुढीलप्रमाणे : 1. श्रम विभागणी 2. अधिकार आणि जबाबदारी 3. शिस्त 4. आज्ञापालन 5. दिशा दिग्दर्शन 6. व्यक्तीगत आवड ते सांघिक आवड 7. लोकांचे वेतन 8. केंद्रीकरण 9. दर्जात्मक पद्धत 10. नि:पक्षपातीपणा 11Ÿ. व्यक्तीच्या अधिकाराच्या उपयोगाची स्थैर्यता 12. पुढाकार घेणे 13. एकी हेच बळ

2. व्यवस्थापनेची कर्तव्ये म्हणजे काय ?
उत्तर : इतरांच्या प्रयत्नाने कामे तडीस नेणे म्हणजे व्यवस्थापन. पद्धतशीर मार्गांनी अनेक गोष्टी व्यवस्थापनाला पार पाडाव्या लागतात. या पद्धतशीर मार्गानाच व्यवस्थापकीय कार्य म्हणतात. ही कार्ये पुढीलप्रमाणे होत. - 1. योजना करणे 2. एकत्रीकरण करणे 3. नोकर मंडळींची व्यवस्था 4. दिशा दिग्दर्शन 5. सुसंगतपणा 6. नियंत्रण ठेवणे.

3. व्यवस्थापकीय तत्त्वांमधील अधिकार आणि जबाबदारी दर्जात्मक पद्धत आणि केंद्रीकरण म्हणजे काय ?
उत्तर : अधिकार आणि जबाबदारी : व्यवस्थापकीय तत्त्वांमधील अधिकार हे कार्यालयीन अधिकार आणि जबाबदारी ही व्यक्तीची जबाबदारी अशा अर्थाने हे तत्त्व वापरले जाते. बुद्धिमत्ता, मागील अनुभव, नैतिकता इ. गुणांनी युक्त असे हे तत्त्व आहे.
दर्जात्मक पद्धत : या तत्त्वाचा अर्थ असा की प्रत्येक उद्योगात अधिकार हे ज्या त्या दर्जाच्या अधिकाèयांकडे सोपवलेले असतात, म्हणजे वरचे अधिकारी आणि त्यांच्या हाताखालील लोक यांतील संबंध वरिष्ठ अधिकाèयांकडे असलेले अधिकार आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक यांच्यातील अधिकार पुरेसे स्पष्ट हवेत.
केंद्रीकरण : सत्तेचे, अधिकाराचे केंद्रीकरण जर झालेले असेल तर त्याचा फायदा सर्वांनाच होतो.

4. औद्योगिक व्यवस्थेत निर्णय घेण्याची गरज का भासते ?
उत्तर : प्रत्येक उद्योगाचे स्वत:चे ध्येय आणि उद्दिष्ट असते. अनेक लहान गोष्टींमध्येसुद्धा अनेक पर्याय उपलब्ध असतात. समजा, एखाद्या व्यापाèयाला काही वस्तूंची वाहतूक करायची आहे, तर कोणत्या प्रकारची वाहतूक व्यवस्था निवडायची ? असा प्रश्न सुरुवातीला त्याला पडेल. त्या वस्तू ट्रकने, टेंपोने, रेल्वेने की हवाई मार्गाने पाठवायच्या ? या अनेक विकल्पातून एकच पर्याय त्याला निवडाला लागेल. हा निवडलेला पर्याय योग्य असेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल पण तो कोणता विकल्प निवडतो यावर त्याचा निर्णय ठरणार म्हणून निर्णय प्रक्रिया ही उद्योगातील एक महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेतल्यामुळे उद्योगातील अनेक समस्या सुटतात. एखाद्या योग्य निर्णयामुळे फायदा होतो तर अयोग्य निर्णयामुळे नुकसान संभवते त्यामुळे निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते.

5. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक कोणते ?
उत्तर : निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक : 1. ध्येय निश्चिती 2. कामाची व्याख्या 3. विकल्पांचा शोध 4. योजना आखणे 5. सुज्ञ विचार आणि युक्तीवाद 6. वस्तुस्थिती  7. समस्येची उकल करणे.

6. निर्णय घेताना कोणत्या गोष्टी आपण मनात ठेवल्या पाहिजेत ?
उत्तर : निर्णय घेताना पुढील गोष्टी आपण विचारात ठेवल्या पाहिजेत : 1. समस्येचे पृथ:करण 2. आवश्यक कार्ययोजना 3. धैर्य व सहनशीलता 4. भविष्यातील यथायोग्यपणा 5. जल आणि सूज्ञ निर्णय घेण्याची क्षमता.

7. व्यवस्थापकीय कर्तव्यातील योजना आणि एकत्रीकरण करणे म्हणजे काय ?
उत्तर : योजना करणे : हे व्यवस्थापकीय कर्तव्यातील एक महत्त्वाचे अंग आहे दिलेल्या वेळेचा उपयोग करून निर्दिष्ट गोष्टी कोणत्या हे ठरवणे, योजना, धोरणे, डावपेच, कार्यक्रम, कामकाजाच्या पद्धती आणि वेळापत्रकानुसार कामाची यादी करणे इ. गोष्टींचा अंतर्भाव होतो.
एकत्रीकरण करणे : मानवी शक्ती आणि भौतिक साधने यांचा एकत्रित मिलाफ. यातील भौतिक साधने म्हणजे यंत्रे आणि कच्चा माल. उद्दिष्टपूर्ती गाठण्यासाठी मानवी साधने आणि भौतिक साधने यांचा मेळ घातला जातो. यासाठी व्यवस्थापकांना पुरेशा अधिकारांचे प्रतिनिधीत्व दिले जाते आणि ध्येय निश्चितीसाठी वेगवेगळ्या स्तरातील लोकांकडून सहकार्याने कामे करून घेतली जातात.

8. व्यवस्थापकीय कर्तव्यात नियंत्रण हा घटक कसा महत्त्वाचा आहे ?
उत्तर : नियंत्रण या घटकात व्यवस्थापनातील सर्व कौशल्ये येतात. इतर कार्यांवर लक्ष ठेवण्याचे काम हे तत्त्व करते. प्रत्येक व्यवस्थापकाने या गोष्टीकडे लक्ष दिलेच पाहिजे.

9. नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे घटक कोणते ?
उत्तर : नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक : 1. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी परस्पर सामंजस्य असणे आवश्यक आहे. 2. पूर्वनियोजित योजनेनुसार सर्व कार्ये सुरळीत पार पडत आहेत की नाहीत हे पाहिले पाहिजे. 3. सर्वांची क्रियाशीलता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

10. ‘‘दिशा दिग्दर्शन आणि सुसंगतपणा हे औद्योगिक व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक आहेत’’ कसे ?
उत्तर : औद्योगिक व्यवस्थापनातील दिशा दिग्दर्शन महत्त्वाचे आहे कारण यामध्ये उद्योगाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सूचना करणे, मार्गदर्शन करणे, देखरेख ठेवणे, लोकांचे नेतृत्व करणे इ. करावे लागते. यासाठी हाताखालील लोकांना योग्य त्या सूचना द्याव्या लागतात. त्या सूचनांचे पालन होते की नाही ते पहावे लागते आणि योजना यशस्वी करावी लागते. तर सुसंगतपणाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे कारण यामध्ये इच्छित ध्येय गाठण्यासाठी निरनिराळ्या विभागांकडून सुसंगतपणे आणि एकत्रितरित्या कामे करवून घ्यावी लागतात. ध्येय निश्चितीचा पाठलाग करण्यासाठी सांघिक प्रयत्न आवश्यक असतात.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024