Friday, May 24, 2019

दारिद्र्य आणि भूक



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. राष्ट्रीय आदर्श अवलोकन संघटनानुसार 2004-05 मध्ये भारतात 21.8 टक्के लोक गरीब होते.

2. गरीब लोकांना ओळखण्यासाठी दारिद्र्य रेषा आखणारा पहिला मनुष्य दादाभाई नौरोजी.

3. अन्नधान्य खरेदी करणे आणि साठवण्यासाठी भारत सरकारने भारतीय अन्न महामंडळ (ऋेेव उेीिेीरींळेपेष खपवळर) व्यवस्था उभारली आहे.

4. गरिबांना आरोग्य सुविधा पुरविली जाते त्यास यशस्विनी म्हणतात.

5. वयस्कर लोकांना पेन्शन देण्यासाठी जी योजना सुरू करण्यात आली, त्यास संध्या सुरक्षा योजना म्हणतात.

6. सरकार पेरणीपूर्वी अन्नधान्यासाठी कमीत कमी दर निश्चित करते त्यास आधारभूत किंमत म्हणतात.

प्रश्न 2 - एका वाक्यात उत्तरे द्या.


1. दारिद्र्य म्हणजे काय ?
उत्तर : ज्या माणसांना मुलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत दुर्लक्षिले जाते त्यास दारिद्र्य म्हणतात.

2. माणसाच्या मुलभूत गरजा कोणत्या ?
उत्तर : अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी या माणसाच्या  मुलभूत गरजा आहेत.

3. दारिद्र्य रेषा म्हणजे काय ?
उत्तर : गरीब आणि श्रीमंत यातील फरक ओळखण्यासाठी ज्या रेषेचा वापर केला जातो तिला दारिद्र्य रेषा म्हणतात. दारिद्र्याच्या मोजमापासाठी या  रेषेचा वापर केला जातो.

4. भूकेचे मोजमाप करण्यासाठीचे सूचकांक कोणते ?
उत्तर : भूकेचे मोजमाप करण्यासाठी जागतिक भूक सूचकांचा आराखडा उपयोगी ठरतो.

5. अन्न सुरक्षा स्पष्ट करा.
उत्तर : देशातील प्रत्येकाला अन्न पुरविण्याची खात्री देणारी व्यवस्था म्हणजे अन्न सुरक्षा होय.

6. साठागृह आणि एकत्रीकरण म्हणजे काय ?
उत्तर : भारतीय अन्न महामंडळ  सुगीच्या दिवसात शेतकèयांकडून अतिरिक्त अन्नधान्य खरेदी करते यालाच अन्नधान्याचा साठा  आणि एकत्रीकरण असे म्हणतात.

प्रश्न 3 - पाच सहा वाक्यात उत्तरे द्या.


1. भारतात गरिबी कशी ओळखली जाते ?
उत्तर : गरीबीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भूक आणि दारिद्र्य. गरिबाला दोन वेळचे जेवणी मिळत नाही. असे गरीब लोक उपासमारीने त्रस्त असतात. आपल्या आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे ते आजारी असतात. शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या अभावाने विशेष कौशल्य त्यांच्याकडे असत नाही. म्हणून त्यांना नोकरीच्या संधी कमी आणि जी नोकरी मिळते त्यातही सातत्य असत नाही. भारतात गरीब हा सहसा झोपडीत राहतो. या झोपडीच्या भिंती आणि छप्पर मातीने सारवलेले, नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या असतात. अत्यंत गरिबांना एवढेही घर मिळत नाही. ते रस्त्याकडेला किंवा झाडाच्या तंबूत राहतात. शहरात जिथे हे लोक राहतात. तेथील वस्तीला झोपडपट्टी म्हणतात.

2. दारिद्र्याचे निर्देशांक कोणते ?
उत्तर : दारिद्र्य (गरिबी) ओळखण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी काही निर्देशांकाचा वापर केला आहे ते म्हणजे 1.निरक्षरतेचे प्रमाण 2.उपासमारींची संख्या 3.आरोग्याच्या काळजीचा अभाव 4.नोकरीच्या संधींचा दुष्काळ 5.सार्वजनिक आरोग्याचा अभाव 6.सामाजिक बहिष्कृत आणि अपंग असलेल्यांनाही गरीब मानले जाते.
3. जरी भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता मिळवली असली तरी ही भूक आणि महापूरपासून सुटका होत नाही. का ?
उत्तर : स्वातंत्र्य मिळून आपल्याला सहा दशकांचा काळ उलटला आहे. या काळात अन्नधान्याची उपलब्धता भरपूर झाली. आपल्या देशाच्या गरजेइतके  अन्नधान्याचे उत्पादन आपण करू शकतो .अन्नधान्यात आपण स्वयंपूर्णता मिळवली असली तरी ही भूक आणि महापूरपासून सुटका होत नाही. कारण भारतात अजूनही बरेचसे भुकेलेले आहेत. गरिबातील क्रयशक्तीचा अभाव, अन्नधान्यातील वितरणातील गोंधळ हेच या विरोधाभासाचे कारण आहे. त्याचप्रमाण दुषित पाण्याच्या महापुरामुळे पुष्कळ लोक उपासमारीने मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे नासधून होऊन अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होतो. अन्नाची कमतरता जाणवते. अन्नाच्या कमतरतेमुळे अन्नधान्याची  किंमत वाढते. अशावेळी गरिबांना पैसे देऊन अन्नधान्य घेणे परवडत नाही म्हणून ते उपासमारीला बळी पडतात. महापुरामुळे सामुदायिक उपासमार घडते. 

4. भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर : सरकारी नियंत्रणातील रास्त भाव धान्य दुकानातून (रेशन दुकान) अन्न महामंडळाने साठवलेले धान्य गरिबांना स्वस्त किमतीत विकले जाते. यालाच सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणतात. 2.या रास्त भाव धान्य दुकानातून अन्नधान्य, साखर, केरोसीन, खाद्यतेल आणि इतर आवश्यक वस्तू विकल्या जातात. बाजारातील किंमतीपेक्षा यांच्या किमती कमी असतात.  3.आज शहरी व ग्रामीण भागात सरकारने रास्त भाव धान्याची दुकाने उघडली आहेत. आज 4.7 लाख दुकानांचा 16 कोटी कुटुंबाना फायदा होत आहे. 4. सरकारने गरीब कुटुंबाना शोधून त्यांना दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रके (बीपीएल) वाटली आहेत. प्रत्येक महिन्याला निश्चित किमतीचे अन्नधान्य या शिधापत्रिकेवर अशा कुटुंबाना पुरविले जाते .

5. गरिबी निर्मूलनासाठी सरकारने केलेल्या उपायांची यादी करा.
उत्तर : गरिबी निर्मूलनासाठी सरकारने चार प्रकारचे उपाय हाती घेतले आहेत. 1.आर्थिक विकास कार्यक्रम 2. दारिद्र्य निर्मूलन उपायाची साधने, (स्व उद्योग कार्यक्रम व रोजंदारी कार्यक्रम) 3.किमान मूळ गरजांची योजना 4.सामाजिक सुरक्षा योजना.

6. गरिबांना सामाजिक सुरक्षा योजना कशी पुरविली जाते
उत्तर : 1.अशक्त, अपंग, वयस्कर अशा गरीब लोकांना सामाजिक सुरक्षेद्वारे संरक्षण पुरवण्यासाठी प्रयत्न करते. 2.कोणतेही काम न करणाèया वयस्कर लोकांसाठी प्रत्येक महिन्याला संध्या सुरक्षा योजनेद्वारे भत्ता देण्यात येतो. 3.अपंग आणि अशक्त लोक जे काम करू शकत नाहीत अशांना प्रत्येक महिन्याला असमर्थ भत्ता देण्यात येतो. 4.गरीब विधवांना प्रत्येक महिन्याला विधवा भत्ता मिळतो.

7. ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कशी सहाय्यभूत ठरते ?
उत्तर : सन 2006 मध्ये भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजना सुरू केली आहे . 1. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी रोजंदारी योजना आहे. 2. या योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील काम करू इच्छिणाèया सदस्याला 100 दिवस हे रोजंदारीचे काम मिळू शकते. यानुसार जो गरीब आहे आणि माफक पगार मिळवू इच्छितो असा कोणताही मनुष्य आपल्या ग्रामपंचायतीत स्वत:चे नाव नोंदवू शकतो. नोंदणी केल्यापासून 15 दिवसांच्या आत जर त्यास काम मिळाले नाही तर सरकारने निश्चित केलेली रक्कम बेकार भत्ता म्हणून त्याला दिली जाते.  ---  

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024