मोती लाल नेहरू |
वल्लभभाई पटेल |
अबुलकलाम आझाद |
या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. असहकार चळवळीच्या कार्यक्रमांची यादी करा.उत्तर : 1. शाळा, महाविद्यालये व न्यायालयांवर बहिष्कार टाकणे. 2. 1919 च्या कायद्यानुसार घेण्यात येणाèया प्रांतीय कायदे मंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणे. 3. ब्रिटीश सरकारने बहाल केलेल्या पदव्या, सन्मान परत करणे. 4. स्थानिक स्वराज्य संस्थांध्ये नामांकन झालेल्या सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणे. 5. सरकारी कार्यक्रमात सहभागी न होता बहिष्कार टाकणे. 6. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे. 7. हातमागावरील विणकèयांना प्रोत्साहन देणे 8. खादीचे कापड तयार करणे 9Ÿ. राष्ट्रीय शाळांची स्थापना करणे 10. हिंदू व मुस्लीम यांच्यांत ऐक्य साधणे. 11.अस्पृश्यता निवारण करणे 12. महिलांना सक्षम बनविणे.
या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
2. चौरीचौराच्या घटनांचे वर्णन करा.
उत्तर : 1. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हयातील ‘चौरीचौरा’ या ठिकाणी 5 फेब्रुवारी 1922 रोजी ही घटना घडली. 2. 3000 शेतकèयांचा एक मोठा गट पोलीस स्टेशन समोर जमला. 3. दारूच्या दुकानासमोर निदर्शने करणाèया भारतीयांवर लाठीमार करणाèया ब्रिटीश पोलीसांविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी हे शेतकरी जमले होते. 4. ब्रिटीश पोलीसांनी जमलेल्या शेतकèयांवर गोळीबार सुरु केला. 5. शेतकरी संतप्त झाले व त्यांनी पोलीस स्टेशनला आग लावली. 6. पोलीस स्टेशनमध्ये असणारे 22 अधिकारी जिवंत जाळले गेले
3. मिठाच्या सत्याग्रहाचे वर्णन करा.
उत्तर : 1. 1930 मध्ये साबरमती येथील काँग्रेस कार्यकारिणीची सभेनंतर कायदेभंग चळवळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2. गांधींनी 2 मार्च 1930 रोजी 11 मागण्या असलेले पत्र व्हॉईसरॉय आयर्विन यांना लिहिले. 3. ब्रिटीश सरकारने जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नागरी कायदेभंग चळवळ, साराबंदीची चळवळ सुरू करण्यात येईल असे घोषित केले. 4.या मागण्या मान्य न झाल्यामुळे 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी आपल्या अनुयायांबरोबर साबरमती आश्रमापासून गुजराथ मधील दांडी पर्यंत पदयात्रा काढली. 5. 6 एप्रिल रोजी गांधी दांडी येथे पोहोचले व मिठाचे उत्पादन करून मिठाचा कायदा मोडला. 6. मिठाच्या सत्याग‘हानंतर 6 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत राष्ट्रीय आंदोलनाचा सप्ताह साजरा करण्यात आला. 7. या चळवळीत सामील झालेल्या नेत्यांना व हजारो लोकांना अटक करण्यात आली. देशाच्या अनेक भागात ही चळवळ पसरली.
या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
4. चले जाव चळवळीचे वर्णन करा.
उत्तर : 1. महात्मा गांधीनी 1942 मध्ये छोडो भारत चळवळ सुरू केली. 2. आपल्या युद्ध प्रयत्नांना भारतीयांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘क्रिप्स मिशन’ भारतात पाठविले. 3. यानुसार भारताला वसाहतीचा दर्जा देणे व मंत्रिमंडळाची स्थापना करणे असे प्रस्ताव मांडले. म्हणून काँग्रेसने ‘चलेजाव चळवळ’ सुरू केली. 4. म. गांधीजीनी ‘करा अथवा मरा’ हा संदेश दिला 5. या संदर्भात गांधीजी, वल्लभभाई पटेल, नेहरू, राजेंद्र प्रसाद, अबुल कलाम आझाद, कस्तुरबा गांधी इ. नेत्यांना अटक झाली. 6. त्यामुळे नवीन नेत्याची तात्काळ गरज असल्याने जयप्रकाश नारायण नेतेपदी आले. 7. मुस्लिम लीग या चळवळीत सामील झाली नाही.
या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
5. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासीच्या बंडाचे वर्णन करा.
उत्तर : 1. ईस्ट इंडिया कंपनीने कर आणि जंगल कायदा अंमलात आणल्याने आदिवासी चळवळीला सुरुवात झाली. 2. आदिवासीनी धार्मिक कारणासाठी लढा दिला. 3. आदिवासी बंडखोरात ‘संथालांचे बंड’ आणि ‘मुंदा चळवळ’ या प्रमुख आहेत. 4. या संदर्भात कर्नाटकातील ‘हलगलीच्या बेरडांचे बंड’ झाले. 5. ब्रिटिशांच्या जमीनदारी पद्धतीमुळे आदिवासी लोक निराश्रित झाले. 6. जमीनदार, सावकार आणि इंग्रज सरकारच्या वाईट वागण्यामुळे संथालाच्यामधे असहिष्णू वृत्ती बळावली. 7. कंपनीने सभ्य आणि शांतताप्रिय लोकांचे शोषण केले म्हणून संतप्त संथालानी गुप्त सभा घेतल्या. 8. संथालानी जमीनदार व प्रमुख नागरिकांची लूट केली. 8. सरकारने बंड दडपून टाकण्यासाठी सैन्याचा वापर करून बंडखोराना अटक केली. संथालाचे आंदोलन संपले. पण पुढील चळवळीना त्यांची प्रेरणा मिळाली.
6. स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस यांनी कोणते योगदान दिले?
उत्तर : 1. भारतातील क‘ांतीकारकांच्यामधे सुभाषचंद्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे. 2. इंग्रजांची उच्चपदस्थ नोकरी नाकारून स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला.3. ते नेताजी या नावाने प्रसिद्ध होते. 4. परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांना इंग्रजाविरूद्ध लढण्यास सज्ज केले. 5. पं. नेहरू व सुभाषचंद्रांनी 1934 ला ‘काँग्रेस समाजवादी पक्षाची’ स्थापना केली. 6. नेताजीनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. 8. जर्मनीला जाऊन भारताच्या स्वातंत्र्याकरिता जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा पाठिंबा मिळवला. 9. आझाद हिंद रेडिओद्वारे भारतीयांसाठी भाषणे केली. 10.‘इंडियन नॅशनल आर्मीचे नेतृत्व केले. 11. ‘दिल्ली चलो’ ची घोषणा केली. 12. ‘तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’ अशा शब्दात भारतीयांना विनंती केली. 13. महिलांसाठी ‘झांशी रेजिमेंट’ स्थापन केली. 14. रंगून येथून सुभाषजींनी मिलिटरी युद्धकौशल्य वापरून इंग‘जांच्या ताब्यातील दिल्ली हस्तगत करण्याची योजना आखली. 15. बर्मा सीमेवर इंग्रज सैन्यावर सशस्त्र हल्ला केला.
या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
7. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर : 1. सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही, असे स्पष्ट मत. 2. जातीभेदाचा अभ्यास करून निर्मूलन करण्याची योजना आखली. 3. अस्पृश्यांसाठी महाड आणि काळाराम मंदिर चळवळ सुरू केली. 4. तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित राहून सल्ले दिले. 5. दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 5. काँगे्रस पक्षात सामील न होता ‘बहिष्कृत हितकर्णी सभा’ आणि ‘स्वतंत्र कार्मिक पार्टी’ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षांची स्थापना केली. 6. ‘प्रबुद्ध भारत’, ‘जनता’, ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ अशी अनेक वृत्तपत्रे प्रसारित केली. 7. शेतमजुरांच्या प्रगतीसाठी काम केले. 8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. 9. अस्पृश्यते विरूद्ध कायदेशीर संरक्षण मिळविले. 10. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे कायदा मंत्री झाले. 11. जातीयतेचा उबग आल्याने हिंदू धर्माशी फारकत घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
7. पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी कोणती भरीव कामगिरी केली?
उत्तर : 1. पंतप्रधान नेहरू हे उद्योगशीलता आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते. 2. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 3. भांडवलशाही आणि समाजवाद या तत्त्वावर आधारलेली ‘मिश्र आर्थिक योजना’ आधुनिक भारताला दिली 4. शीघ‘ औद्योगिकीकरणामुळे विकास शक्य आहे असे त्यांचे मत होते. 5. भारताला पंचवार्षिक योजनेद्वारे विकासांच्या मार्गावर नेण्यात ते अग्रेसर होते. 6. शीतयुद्धापासून लांब राहून अलिप्ततावाद धोरण स्वीकारले. 7. शांती व सुसंवाद या धोरणांचा सतत पाठपुरावा केला. 8. भारतीय लोकशाहीचा पाया भाषावर प्रांतरचनेने मजबूत केला.
No comments:
Post a Comment