संयुक्त राष्ट्रसंघटना |
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1) संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ........... मध्ये झाली2) संयुक्त राष्ट्रसंघटनेचे मुख्यालय ........... या शहरात आहे.
3) मंत्रिमंडळाशी जुळणारी संयुक्त राष्ट्रसंघाची शाखा ........... येथे आहे.
4) आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधिशांचा कार्यकाल ........... वर्षे असतो.
5) आंतरराष्ट्रीय न्यायालय ........... येथे आहे.
6) संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे सचिव ........... हे आहेत.
7) जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ........... या वर्षी झाली.
8) सार्कची स्थापना ........... या वर्षी झाली.
उत्तरे : 1. 24 ऑक्टोबर 1945 2. न्यूयॉर्क 3. महासभा 4. नऊ 5. हेग (नेदरलँड) 6. अँटोनियो गटेरस 7. 1948 8. 1985
2. खालील प्रश्नाची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1) संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यास कोण जबाबदार होते?उत्तर : इंग्लंडचे विन्स्टन चर्चिल, रशियाचे जोसेफ स्टॅलीन, अमेरिकेचे फ्रँकलीन डी. रुझवेल्ट या नेत्यांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली.
2) संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाखा कोणत्या?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्य सहा शाखा आहेत. 1. महासभा (जनरल असेंब्ली) 2. सुरक्षा समिती 3. आर्थिक आणि सामाजिक मंडळ 4. विश्वस्त समिती 5. सचिवालय 6.आंतरराष्ट्रीय न्यायालय.
3) सुरक्षा समितीचे कायमचे सभासद कोण आहेत?
उत्तर : सुरक्षा समितीचे कायमचे सभासद : 1.अमेरिका 2. रशिया 3. ब्रिटन 4. फ्रान्स 5. चीन.
4) जागतिक आरोग्य संघटनेची उद्दिष्टये कोणती?
उत्तर : 1. मानव जातीचे आरोग्य सुधारणे आणि त्याचे संरक्षण करणे. 2. कॉलरा, प्लेग, मलेरिया, देवी यासारख्या सांसर्गिक रोगांचे उच्चाटन करणे. 3. जगातील एड्स, कॅन्सर यासारख्या महाभयंकर रोगांचे उच्चाटन करणे. 4. लोकसंख्या विस्फोट, परिसर सुरक्षा, उपासमार आणि कुपोषण यासारख्या समस्यांवर उपाययोजना करणे.
5) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या कार्याची यादी करा.
उत्तर : 1. जगातील कामगारांचे हित जपणे. 2. कामगारांना सामाजिक सुरक्षा प्राप्त करून देणे. 3. कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. 4. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे. 5. मजूर स्त्रियांना प्रसूती काळातील फायदा देणे. 6. कामगार वर्गाला त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देणे. 7. निवारा, सकस आहार यासारख्या सुविधा देणे.
6) सार्कचे विस्तृत रूप लिहा.
उत्तर : दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार संस्था.
3. खालील प्रश्नांची सहा ते दहा वाक्यात उत्तरे लिहा.
1) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उद्दिष्टांची यादी करा.उत्तर : 1. आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांती प्रस्थापित करणे. 2. सर्व देशामध्ये मैत्री अथवा सलोख्याचे संबंध निर्माण करणे. 3. मानवाच्या मूलभूत हक्काबाबत विश्वास निर्माण करणे. 4. सर्व देशामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविणे तसेच जागतिक समस्यावर तोडगा शोधून काढणे. 5. आंतरराष्ट्रीय वादविवादांना न्याय आणि सन्मान प्राप्त करून देणे. 6. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये हितसंबंध जपण्याचे केंद्र म्हणून कार्यरत राहणे.
2) महासभेच्या रचनेबद्दल सविस्तर लिहा.
उत्तर : महासभेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांचा समावेश असतो. यात प्रत्येक देश आपले पाच प्रतिनिधी पाठवू शकतो. परंतु प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार असतो. सभेच्या प्रथम सत्रात एका वर्षाच्या कालावधीकरिता एका अध्यक्षाची निवड केली जाते. तसेच सतरा उपाध्यक्षांची आणि सात समित्यांसाठी सात चेअरमनांची निवड केली जाते. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात या सभेचे अधिवेशन भरविण्यात येते, ते डिसेंबर महिन्यापर्यंत चालते. सर्व निर्णयावर 2/3 इतक्या मतांची आवश्यकता असते. वार्षिक आराखडा तयार करून त्याला संमती देण्याचे काम महासभेचे असते. काही वेळा तातडीची सभा घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा करते. जगातील सर्वच समस्या सोडविण्यासाठी जागतिक संसद म्हणून महत्त्वाची भूमिका निभावते.
3) आर्थिक आणि सामाजिक समितीचे कार्य कोणते ?
उत्तर : 1. आंतरराष्ट्रीय आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास करून त्याची नोंद ठेवणे त्याचप्रमाणे निराश्रित स्त्रियांचा दर्जा, निवारा इ. सारख्या समस्या या समितीच्या अखत्यारीत येतात. 2. मानवी हक्काची आणि मूलभूत स्वातंत्र्याची शिफारस करते. 3. मानवी संसाधन, संस्कृती, शिक्षण इ. च्या संवर्धनाकरिता आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवू शकते. 4. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न आणि कृषीविषयक संघटना, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या विशेष शाखांमध्ये समन्वय साधते.
4) जागतिक शांतता प्रस्थापित करण्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर : 1. संयुक्त राष्ट्रसंघाला मोठ्या प्रमाणात राजकीय तंटे मिटवावे लागतात. 2. गुंतागुंतीची जागतिक परिस्थिती आणि सुरक्षा समितीच्या कायमच्या सदस्यांमधील दुबळ्या संबंधामुळे युनोला मिश्र यश मिळाले आहे. 3. निरीक्षण दलाकडून युद्धबंदीने अथवा लष्कराला पाचारण करून राष्ट्रसंघ कारवाया करते. 4. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रयत्न करीत असतो. 5. सुवेझ कालवा, इराण, इंडोनेशिया, ग्रीस, काश्मीर, पॅलेस्टाईन, कोरिया, हंगेरी, कांगो, सायप्रस, अरब, इस्त्राइल, नामिबिया, अफगाणिस्तान इ. सारख्या देशांतील तंटे सोडविले गेले आहेत. 6. अण्वस्त्र आणि शस्त्रास्त्रे यांचे निर्मूलन करण्यासाठी युनोने गंभीर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. 7. शीतयुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात युनोची भूमिका महत्त्वाची आहे.
5) युनेस्कोचे कार्य कोणते?
उत्तर : युनोची महत्त्वाची शाखा असून स्थापना 1946 मध्ये झाली आहे. मुख्यालय पॅरिस येथे आहे. 1.राष्ट्राराष्ट्रातील शैक्षणिक सुधारणा, सांस्कृतिक सुधारणा, वैज्ञानिक आणि तांत्रिक सुधारणा करणे हे याचे प्रमुख कार्य आहे. 2. तांत्रिक शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, सृजनशीलता, सांस्कृतिक आणि परिसर अभ्यास व विकास घडविणे. 3. जगातील सरकारी आणि खासगी संस्थांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या ज्ञानाचा विकास घडविणे.
6) जागतिक आर्थिक समस्या सोडविण्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) भूमिका स्पष्ट करा.
उत्तर : आंतरराष्ट्रीय आर्थिक समस्या सोडविणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिक व्यापार, आर्थिक स्थायी चलनाचा समतोल राखणे यासाठी ही संस्था कार्यरत आहे. विविध देशातील केंद्रीय बँकांची केंद्रीय बँक असे या संस्थेला संबोधतात. सर्व राष्ट्र्रांमध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार निर्माण करून गरीब आणि श्रीमंत देशातील आर्थिक व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करते.
7) राष्ट्रकूल संघाच्या उद्दिष्टांची यादी करा.
उत्तर : 1. लोकशाहीचे समर्थन करणे. 2.स्वायत्तता मिळवून देणे 3. दारिद्र्य निर्मूलनास साहाय्य करणे. 4. जागतिक शांतता प्रस्थापित करणे. 5. क्रीडा, विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रगती घडवून आणणे. 6. सदस्य राष्ट्रांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करणे.
8) युरोपियन समुदायाचे वर्णन करा.
उत्तर : युरोपियन समुदाय हा 27 युरोपियन देशांचा समूह आहे. यातून आता ब्रिटन बाहेर पडला आहे. त्यामुळे ती संख्या 26 झाली आहे. मॉस्ट्रिच येथे 1992 मध्ये याची स्थापना झाली आहे. सर्वांसाठी एकच बाजारपेठ, एकच चलन, एकच कृषी आणि व्यापारी धोरण अंमलात आणणे हे याचे प्रमुख कार्य आहे. या समुदायाच्या महत्त्वाच्या शाखा म्हणजे समिती, आयोग, युरोपियन संसद आणि युरोपियन न्यायालय यांचे कार्य संयुक्त राज्याप्रमाणे चालते. हा समुदाय शांती आणि लोकशाही प्रदान करणारे दल आहे. आर्थिक समुदायाचा यशोदाता आहे. युरोपियन समुदायाने त्यांच्या सदस्यांना मानद सार्वभौमत्व प्रदान केले आहे.
No comments:
Post a Comment