1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
1. ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल .......... हा होता.2. भारताचे पहिले गृहमंत्री ........... हे होते.
3. भारताचे पहिले राष्ट्रपती ........... हे होते.
4. इ.स. ........... मध्ये पाँडिचेरीचा भारतात केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला.
5. राज्य पुनर्रचना कायदा ........... मध्ये अस्तित्वात आला.
उत्तरे : 1. लॉर्ड माऊंटबॅटन 2. सरदार वल्लभभाई पटेल 3. डॉ. राजेंद्र प्रसाद 4. 1963. 5. 1956
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतापुढे कोणकोणत्या समस्या होत्या?उत्तर : 1. जातीय दंगलीची 2. निर्वासितांची समस्या 3. निर्वासितांना अन्न, वस्त्र निवारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान होते. 4. संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न होता. 5Ÿ. देशात सुरक्षा व ऐक्य निर्माण करणे महत्त्वाचे होते. 6. देशाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी शेती वाणिज्य, व्यापार व उद्योग या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे होते. 7Ÿ. आपले स्वतंत्र संविधान तयार करणे हेही एक मोठे आव्हान होते. 8. स्वातंत्र्य शत्रूपासून अबाधित ठेवणे हे परमकर्तव्य होते.यासाठी लष्कर मजबूत करण्याची गरज होती. 9. भारतीय समाजामध्ये लिंगभेद व वर्णभेद अस्तित्वात असल्याने सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी सामाजिक रचना मजबूत करणे गरजेचे होते. 10. नवीन परराष्ट्र धोरण आखणे.
2. निर्वासितांची समस्या कशा पद्धतीने सोडविण्यात आली?
उत्तर : 1) भारताच्या फाळणीनंतर लाखोंच्या संख्येने पाकिस्तानातून निर्वासित भारतात आले. तर बांग्ला देशाच्या निर्मितीदरम्यान त्या देशातून निर्वासित आपल्या देशात आले. 2) अशा लक्षावधी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता इ. गोष्टी पुरविणे ही सरकारची जबाबदारी होती.3) भारत सरकारने तसेच पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय व त्रिपुरा या राज्यसरकारांनी निर्वासित लोकांना आवश्यक त्या सुविधा पुरवून त्यांना आश्रय दिला. 4) तिबेटहून आलेल्या निर्वासितांची सोय म्हैसूर जिल्ह्यातील बैलुकुप्पे येथे करण्यात आली. त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा व रोजगार या मुलभूत समस्या सोडवण्यात आल्या. 5) त्यांना लघु व कुटीरोद्योग सोयी देऊन उदरनिर्वाह पुरवण्यात आला.
3. पाँडिचेरीला फे्रंचांच्या तावडीतून कसे सोडविण्यात आले?
उत्तर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही प्रदेश फ्रेंचांच्या ताब्यात होता. पाँडिचेरी, करैकल, माहे आणि चंद्रनगर येथे फ्रेंचांच्या वसाहती होत्या. काँग्रेसच्या धडपडीनंतर साम्यवादी आणि इतर संघटनानी भारतात विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली. 1954 मध्ये ही संस्थाने विलीन करण्यात येवून पाँडिचेरीला 1963 मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले.
4. पोर्तुगीजांच्या ताब्यातून ‘गोवामुक्ती’ कशी करण्यात आली?
उत्तर : गोव्याचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करण्यासाठी जोरदार चळवळ चालू होती. गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. पोर्तुगीजांना गोवा सोडून जाण्याचा आदेश दिला गेला. तरीही पोर्तुगीजांनी आंदोलकांविरूद्ध दडपशाहीचे धोरण अवलंबिले. त्यांनी आफ्रिका व युरोप येथून जादा सैन्याच्या तुकड्या मागवून स्वतःचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. इ.स.1955 मध्ये भारताच्या विविध प्रांतातील लोक एकत्र आले. आणि सर्वांनी मिळून पोर्तुगीजांविरूद्ध ‘गोवा मुक्ती आंदोलन’ सुरु केले. अशा परिस्थितीत भारत सरकारने गोवामुक्तीसाठी सैन्यबलाचा वापर केला आणि गोवा स्वतंत्र झाला. इ.स.1987 पर्यंत गोवा केंद्रशासित प्रदेश होता व नंतर ते स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले.
5. भाषावार प्रांत रचनेच्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती द्या.
उत्तर : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची देशातील सर्वात महत्त्वाची लोकशाही चळवळ म्हणजे भाषावार प्रांतरचनेची चळवळ होय. राज्यकारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी भाषावार प्रांतरचनेची मागणी करण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात राज्यकारभार व्यवस्थित नव्हता. संस्थानांद्वारे राज्यकारभार चालविण्यासाठी वापरली जाणारी भाषा ही सामान्य माणसांची भाषा नव्हती. अशा परिस्थितीत भाषावार प्रांतरचनेच्या मागणी करून आंध्र महासभेमार्फत पोट्टी श्रीरामुलू यांनी 58 दिवस उपोषण करून 1952 मध्ये प्राणत्याग केला. त्यांनी विशालांध्राची मागणी केली होती. यानंतर आंध्राची मागणी तीव्र झाली. त्यामुळे 1953 साली केंद्राने फाजली अली आयोगाची रचना केली. के.एम. पण्णीकर आणि एच.एन. कुंज्रू हे या समितीचे सदस्य होते. 1953 मध्ये आंध्र प्रदेश हे भाषावार प्रांतरचनेतील पहिले राज्य उदयास आले. या आयोगाच्या शिफारशीनुसार इ. स. 1956 साली राज्य पुनर्रचना कायदा संसदेने संमत केला. यानुसार 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले.
प्र. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. भारतात किती संस्थाने होती ?उत्तर : 562 संस्थाने.
2. कोणत्या संस्थानांनी विलीनीकरणाच्या प्रक्रियेस विरोध केला?
उत्तर : जुनागड, हैद्राबाद, जम्मू आणि काश्मीर.
वल्लभभाई पटेल. |
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल.
4. भारताचे पोलादी पुरुष म्हणू कोणाला ओळखले जाते ?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल.
5. भारतातील कोणत्या गोष्टीमुळे इंग्रजांना फोडा व राज्य करा हे धोरण राबविणे सुलभ झाले?
उत्तर : भारतातील विविधतेमुळे.
6. दिल्लीत स्वातंत्र्योत्सव साजरा केला जात असताना गांधीजी काय करत होते ?
उत्तर : गांधीजी नौखाली व इतर काही भागातील दंगलग्रस्तांचे सांत्वन करण्यात मग्न झाले होते.
7. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू
8. नेहरूंच्या मनात निधर्मी राष्ट्रनिर्मितीची संकल्पना का निर्माण झाली ?
उत्तर : भारताच्या फाळणीच्यावेळी उसळलेल्या दुष्ट दंगलींमुळेच नेहरूंच्या मनात निधर्मी राष्ट्रनिर्मितीची संकल्पना निर्माण झाली.
9. कोणते भारतीय नेते भारताची फाळणी थांबवू शकले नाहीत ?
उत्तर : मौलाना अबुल कलाम आझाद व खान अब्दुल गफारखान.
10. धर्माबाबत भारतीय घटनेत काय नमूद करण्यात आले आहे ?
उत्तर : भारताच्या घटनेने प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यामागे भारत एक निधर्मी राष्ट्र व्हावे अशी उदात्त भावना आहे.
11. बांग्ला मुक्तीसाठीचा संघर्ष केव्हा झाला ?
उत्तर : 1971 साली.
12. बांग्ला देशातून आलेल्या निर्वासितांची सोय कोणत्या राज्यांनी केली ?
उत्तर : पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय व त्रिपुरा या राज्यसरकारांनी निर्वासित लोकांना आश्रय दिला.
No comments:
Post a Comment