Friday, May 24, 2019

ग्रीक, रोमन आणि अमेरिकन संस्कृती

Image result for amphitheater
ऍम्पिथिएटर 

प्रश्न 1 - खालील जागा योग्य शब्दांनी भरा.

1. होमरने लिहिलेली महाकाव्ये इलियड आणि ओडिसी होेय.
2. ग्रीकांनी हुकूमशहांना टायरंटस असे म्हटले आहे.
3. औषधशास्त्राचा पाया हिप्पोके्रटिस यांने घातला.
4. हेरोडोटस याला इतिहासाचा जनक म्हटले जाते.
5. प्रिन्सेप म्हणजे राज्याचा प्रथम नागरिक होय.
6. लॅटिन ही रोमनांची भाषा होय.
7. मायन संस्कृतीतील दगडी शिल्पांना स्टेलिस म्हटले जात असे.
8. टेक्सोको हे मेक्सिकोतील सरोवर होय.
9. इन्का संस्कृतीचा प्रमुख टूपेक हा होता.
10. इन्काचे आराध्य दैवत सूर्यदेवता होते.

Image result for socrates picture
सॉक्रेटिस
Image result for plato picture
प्लेटो 
Image result for aristotle picture
अरिस्टोटल


  
Image result for alexander the great picture
अलेक्सझांडर
Image result for homer greek writer
होमर 

 

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा.

1. ग्रीक साहित्यात होमरचे योगदान कोणते ?
उत्तर : होमरची दोन महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. इलियड आणि ओडिसी. इलियड हे ट्रॉयचा वेढा आणि त्याचा नाश याचे वर्णन आहे. ओडिसीत ओडिसीच्या ट्रॉयहून परतत असतानाच्या साहसी कृत्यांचे वर्णन आहे.
2. ग्रीक नगरराज्ये कोणकोणती होती ?
उत्तर : अ‍ॅथेन्स स्पार्टा, मॅसेडोनिया आणि थेब्ज ही ग्रीक नगरराज्ये होती.
3. रोमन प्रजासत्ताकांची वैशिष्ट्ये कोणती होती ?
उत्तर : रोमन प्रजासत्ताक सिनेट आणि असेंब्ली हे सल्लागार समिती म्हणून कार्य करीत होती. या समितीमधील सभासद युद्धकाळात सैन्याचे नेतृत्व करीत. त्यांनी न्याय व कायदा अंमलात आणला. सिनेटवर उच्चकुलीन वर्गाचे नियंत्रण असे. सामान्यवर्गाचे अधिकार मर्यादित असे. करांचे ओझे कमी होते. कर भरला नाही तर शिक्षा होई. सिनेटने घेतलेला निर्णय लोकसंरक्षक अधिकारी किंवा पुढारी नाकारू शकत. सामान्य वर्गाला मात्र बंधनकारक असे. बंडामुळे सामान्यवर्गाला उच्च सभेतील प्रतिनिधी निवडण्याचे  अधिकार मिळाला होता. कायद्यामुळे नागरिकांना त्यांचे हक्क आणि पिळवणुकीविरुद्ध प्रतिकाराचे ज्ञान प्राप्त झाले.
4. कोलंबियातील प्राचीन संस्कृती कोणकोणत्या ?
उत्तर : माया, अ‍ॅझटेक आणि इन्का, झॅपोटेक, टोटेनिक या कोलंबियातील प्राचीन संस्कृती होत.
5. मायन कोण होते ?
उत्तर : मेक्सिकोतील युक्यूटान भागातील इंडो अमेरिकन टोळ्यांना मायन म्हणतात.
6. अ‍ॅझटेक निसर्ग पूजक होते. कसे ?
उत्तर : अ‍ॅझटेक लोक मूलत: भटके होते. ते निसर्गाची पूजा करीत. देवाला वेगवेगळ्या मार्गांनी प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करीत. मानवी बळी हा त्यापैकीच एक होता.


Image result for olympics
ऑलिंपिकचे चिन्ह 

Image result for gladiator
ग्लॅडिएटर 
 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024