Friday, May 24, 2019

जैन व बौद्ध धर्मांचा उदय

Image result for SANCHI STUPA IMAGE
सांची स्तूप 



या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  CLICK ME


या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा  CLICK ME


1. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर वृषभदेवप्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

2. वर्धमानाचा जन्म कुंडल या ठिकाणी झाला.
3. महावीरांना वयाच्या 42 व्या वर्षी दिव्य ज्ञान प्राप्त झाले.
4. वयाच्या 72 व्या वर्षी महावीरांचे निर्वाण पावापुरी (बिहार) या ठिकाणी झाले.
5. गौतम बुद्धाचे सिद्धार्थ हे मूळ नाव होय.
6. बुद्धांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ (हरिणबाग) या ठिकाणी दिले.
7. बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

Related image
भगवान महावीर 
1. महावीराच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. 
 उत्तर : वर्धमान महावीरचा जन्म कुंडल येथे इ.स.पू. 599 मध्ये झाला. त्याचे वडील सिद्धार्थ व आई त्रिशलादेवी होती. वर्धमानाचे लग्न यशोधरेशी झाले. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने संसाराचा त्याग करून सत्याच्या शोधात तो 12 वर्षे भटकत राहिला. वयाच्या 42 व्या वर्षी त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झाली. तो सर्वज्ञ झाला. लोक त्यास महावीर किंवा जिन म्हणू लागले. त्याच्या अनुयायांना जैन म्हणण्यात येई. त्यांने तीस वर्षे लोकांना उपदेश केला. बिहारला पावापुरी येथे वयाच्या 72 व्या वर्षी (इ.स.पू. 527) त्याचे निर्वाण झाले. त्याला जैनधर्मीय चोविसावा तीर्थंकर मानतात.
2. त्रिरत्न म्हणजे काय ?
उत्तर : भगवान महावीरने सांगितलेल्या तीन आचारधर्मास त्रिरत्ने म्हणतात. ती म्हणजे 1. सम्यक ज्ञान 2. सम्यक दर्शन 3. सम्यक चारित्र्य.
3. जैन धर्मांच्या शाखांची नावे लिहा.
उत्तर : जैन धर्मांच्या शाखा दोन आहेत. 1. श्वेतांबर 2. दिगंबर.  श्वेतांबर  हे लोक पांढरी वस्त्रे परिधान करतात. तर दिगंबर हे वस्त्रांचा त्याग करतात.
4. मधला मार्ग म्हणजे काय ?
उत्तर : जीवनातील दु:ख घालविण्यासाठी भगवान गौतम बुद्धाने अष्टांग मार्गसांगितले आहेत. या मार्गाला मधला मार्गअसे म्हणतात.
5. नवीन धर्मांने प्रभावित झालेले लोक कोण ?
उत्तर : श्रीमंत, व्यापारी, कारागीर आणि सामान्य लोक हे नव्या धर्माच्या शिकवणीने प्रभावित झाले होते.
6. त्रिपिटीकावर टीप लिहा.
Image result for tripitaka picture
त्रिपिटीका 
उत्तर : गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांची शिकवण आणि आख्यायिका त्रिपिटकया ग्रंथात संग्रहीत केल्या. विनय, धम्म आणि अभिधम्मपीटक या प्रमाण ग्रंथांनी मिळून बनलेले त्रिपिटक होय. कालांतराने या शिकवणी संदर्भात भेद होऊन बौद्ध धर्मात फूट पडली व वेगळे पंथ उदयास आले ते म्हणजे हिनयान, महायान, वज्रयान इ. 
७. पार्श्वनाथाने सांगितलेली चार व्रते कोणती ?
उत्तर : पार्श्वनाथाने सांगितलेली चार व्रते म्हणजे 1.अहिंसा, 2.सत्य, 3.अस्तेय (चोरी करू नये) 4.अपरिग्रह (संपत्तीचा संग्रह करू नये)
८. वर्धमानचे आई वडील कोण होते ?
उत्तर : वर्धमानचे वडील सिद्धार्थ हे ज्ञातृक जमातीचे मुख्य होते तर आई त्रिशलादेवी लच्छवी घराण्याची राजकन्या होती. 
९. भगवान महावीरने सांगितलेली पाच तत्त्वे कोणती ?
उत्तर : भगवान महावीरने सांगितलेली पाच व्रते म्हणजे 1.अहिंसा, 2.सत्य, 3.अस्तेय (चोरी करू नये) 4.अपरिग्रह (संपत्तीचा संग्रह करू नये) 5.ब्रह्मचर्य 
१०. गौतम बुद्धाच्या जीवनाबद्दल थोडक्यात लिहा.


Image result for gautam buddha photo
गौतम बुद्ध 

 उत्तर : गौतम बुद्धाचे पूर्वीचे नाव सिद्धार्थ. इ.स.पू. 567 मध्ये सिद्धार्थचा जन्म झाला. त्याचे वडील शुद्धोधन व आई मायावती. राजऐश्वर्य आणि संसाराचा त्याग करून सिद्धार्थ विरक्त झाला. त्यांने अक्षय सुखाच्या शोधार्थ अनेक दिवस घालविले. त्याला अक्षय  ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांने सारनाथ येथील हरिणबागेत पहिले प्रवचन दिले. त्याला धर्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते. येथेच त्याने चार आर्य सत्य व अष्टांग मार्ग सांगितले. वयाच्या 80 व्या वर्षी  कुशीनगर येथे इ.स. पू. 487 मध्ये सिद्धार्थाचे महानिर्वाण झाले.

या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  CLICK ME

या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. CLICK ME


११. गौतम बुद्धांनी सांगितलेली चार सत्ये कोणती ?
उत्तर : गौतम बुद्धांनी सांगितलेली चार सत्ये म्हणजे संपूर्ण जग हे क्षणिक आणि दु:खमय आहे. दु:खाचे मूळ कारण म्हणजे आशा किंवा तृष्णा आहे. आशा, इच्छा यांचा त्याग केल्याने समाधानी जीवन प्राप्त होते. 

1२. गौतम बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्गकोणता ?
उत्तर : गौतम बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग’ : 1.उत्तम कृती 2.भाषा 3.ज्ञान 4.जीवन 5.प्रयत्न 6.स्मृती 7.निर्णय 8.विचार. 
13. बौद्ध धर्मातील वेगवेगळे पंथ कोणते ?
उत्तर : हिनयान, महायान, वज्रयान आणि त्याचे उपविभाग हे बौद्ध धर्मातील वेगवेगळे पंथ आहेत.
14. बौद्ध धर्माचा प्रसार कोणत्या देशात झाला ?
उत्तर : मलाया, बर्मा, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, श्रीलंका, बामीयन देशामध्ये मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार  झाला.
 

1 comment:

पत्रलेखन : दहावीच्या परीक्षेत आलेले 2017 ते 2024

पत्रलेखन : दहावीच्या परीक्षेत आलेले 2017 ते 2024