Friday, May 24, 2019

जगाच्या प्राचीन संस्कृती

Image result for pyramids
पिरॅमिड 

प्रश्न 1 - खालील जागी योग्य शब्द भरा.

1. हिरोग्लाफिक्स म्हणजे पवित्र लिखाण (चित्रलिपी) होय.
2. इजिप्तच्या राजांना फरोहा असे म्हणत.
3. ग्रीकांनी मेसापोटेमियाचा उल्लेख दोन नद्यांमधील प्रदेश असा केला आहे.
4. अमुराईटसचा प्रसिद्ध राजा हम्मुरबी हा होय.

प्रश्न 2 - जोड्या जुळवा (उत्तरे)

                                                      
            1. हो यांग हो नदी                      चीन
            2. क्यूनफॉर्म लिपी                    मेसापोटेमिया
            3. क्लिओपात्रा                         इजिप्शियन राणी
            4. हम्मूरबी                               अमुराईटसचा राजा
            5. चिनी वंश/घराणे                   शांघ

प्रश्न 3 -  थोडक्यात उत्तरे लिहा.

1. मम्मीजचे जतन कसे केले जात असे ?
उत्तर : मम्मी म्हणजे प्रेत. इजिप्शियन लोक प्रेतावर रसायनांचा वापर करून प्रेत पातळ कापडात गुंडाळून ठेवत असत. त्यालाच मम्मी म्हणतात. या मम्मी विशिष्ट शवपेटीत घालून थडग्यात ठेवत. ही थडगी म्हणजे पिरॅमिडस. यामध्ये प्रेतासोबत दैनंदिन गरजेच्या वस्तू, आचारी, न्हावी यांच्या प्रतिमा ठेवल्या जात असत.
2. पिरॅमिडसची माहिती लिहा.
उत्तर : मम्मी विशिष्ट शवपेटीत घालून ठेवलेली थडगी म्हणजे पिरॅमिडस होय. हे पिरॅमिडस सुरुवातीला पर्वत शिलालेखामध्ये खोदून तयार केली जात असत. उत्तरेकडे सरकल्यानंतर वाळवंटात पिरॅमिडस बांधण्यात आले. यासाठी मोठ मोठ्या दगडांचा वापर करून उंच मनोरे बांधले जात असत. राजे आणि श्रीमंत लोकांच्यात उंच पिरॅमिडस बांधण्याची स्पर्धा असे.
3. हो यांग हो नदीला चीनचे अश्रू का म्हणतात ?
उत्तर :  हो यांग हो नदीला आलेल्या महापुरामुळे नदीचे पात्र बदलले जाऊन हजारो घरे आणि शेती नाश पावतात. अनेक कालवे या पुरामुळे उद्ध्वस्त होतात. त्यामुळे तिला चीनचे अश्रू असे म्हणतात.
Image result for egypt king pharaoh
फरोह


Image result for ziggurat
झिगुरात
Image result for great wall of china
चीनची भिंत 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024