साधारणत: दोनशे वर्षांपूर्वी बँकांची सुरवात झाली. कालानुसार बँकांचे स्वरूप बदलत आहे. आज ‘बँक’ हा शब्द आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. बँका या अशा आर्थिक संस्था आहेत की ज्या ग्राहकांनी गुंतवलेल्या ठेवींच्या स्वरूपातील पैसा वापरतात आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना तो परत करण्याची हमी देतात. बँका ग्राहकांना कर्जे देतात आणि त्यावर व्याज आकारतात. बँका निरनिराळ्या देशांच्या पैशांची अदलाबदल करतात. एखाद्या देशाचा विकास हा त्या देशाच्या बँकींग पद्धतीवर अवलंबून असतो.
बँक म्हणजे काय ?
‘बँक’ हा शब्द मूळ इटालियन शब्द इरपज्ञे किंवा फ्रेंच शब्द ‘इरर्पिींश‘यावरून तयार करण्यात ओला आहे. दोन्हीचा अर्थ ‘बाक’ (इरर्पिींश) किंवा पैशांच्या देवाणघेवाणीचे टेबल (चेपशू एुलहरपसश ढरलश्रश) असा आहे. जी कंपनी व्यवसायातील किंवा व्यापारातील आर्थिक व्यवहार सांभाळते, ती बँकींग कंपनी होय बँक ही अशी कंपनी आहे. जी व्यवसायातील किंवा व्यापारातील आर्थिक व्यवहार सांभाळते. तसेच ग्राहकांची ठेव स्वीकारून त्यांना व्याज देते व ग्राहकांच्या ठेवी कर्जस्वरूपात वाटते.
बँकांची वैशिष्ट्ये :
1) बँका या अशा आर्थिक संस्था आहेत की ज्या जनतेच्या पैशाशी संबंधित असतात. 2) बँक ही एक व्यक्ती, पेढी, किंवा कंपनी असू शकते. 3) बँका जनतेकडून ठेवींचा स्वीकार करतात व मुदतपूर्तीनंतर सव्याज परत करतात. ठेवींना त्या संरक्षण देतात. 4) बँका उद्योग, कृषी, शिक्षण, घरबांधणी इ.साठी कर्ज देतात. 5) बँका या ग्राहकांना विविध बँकिंग सुविधा (एजन्सी व उपयुक्त सेवा) उपलब्ध करून देतात. 6) बँका या फायदा मिळवणाèया सेवाभिमुख संस्था आहेत. 7) बँक ठेवीदार व कर्जदार यांना जोडणारा दुवा आहेत. 8) बँक व्यवसाय हे बँकेचे प्रमुख कार्य आहे. 9)प्रत्येक बँकेला स्वत:ची विशिष्ट ओळख असते.
बँकांची कार्ये :
1) जनतेकडून व इतरांकडून ठेवी स्वीकारणे. 2)जनतेला व संस्थांना कर्ज देणे. 3) एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी पैसे पाठवणे. 4) चेक्स, ड्राफ्टस व बिलाद्वारे पैसे वसूल करणे. 5) बिलांमध्ये सूट देणे. 6) सेफ डिपॉझिट लॉकर्स भाड्याने देणे. 7) परदेशी चलनाची अदलाबदल करण्याचे व्यवहार करणे. 8) अत्यंत मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे. 9) बँकेतील शिल्लक रक्कमेची आणि हमी देणारी पत्रे पाठविणे. 10)सरकारी व्यवहार करणे.
बँक व बँकेचे ग्राहक यांच्यातील नाते :
बँकेचे मालक आणि ग्राहक यांचे नाते दोन प्रकारात विभागले जाते ते म्हणजे - 1. सामान्य नाते -
1. प्राथमिक नाते (कर्जदार आणि ठेवीदार यांच्यातील नाते)
2. दुय्यम किंवा गौण नाते (विेश्वस्त आणि लाभार्थी यांच्यातील नाते) 3. दलाल (एजंट) आणि प्रमुखाचे नाते
2. विशेष नाते -
1. चेक देण्या - घेण्याबद्दलची कर्तव्ये किंवा बंधने
2. ग्राहक खात्यांची गुप्तता राखण्याबद्दलची कर्तव्ये किंवा बंधने.
बँकांकडून दिल्या जाणाèया सेवा -
1. क्रेडीट व डेबीट कार्डस् (उधारीने विकत घेण्यासाठीचे कार्ड) 2. खाजगी कर्जे 3. गृह आणि वाहन कर्जे 4. म्युच्युअल फंडस् भागिदारीत परस्पर विनिमयासाठी गोळा केलेला निधी. 5. व्यवसाय कर्जे 6. सेफ डिपॉझिट लॉकर्स 7. विेशस्त सेवा 8. सह्यांची खाती किंवा हमी 9. ई बँकींग
पोस्ट खाते : भारतीय पोस्ट खाते हे ‘पोस्टल बँक ऑफ इंडिया’ या नावाची बँक सुरू करण्याचा विचार करीत आहे.पोस्ट खात्याद्वारे विविध आर्थिक सेवा दिल्या जात आहेत. त्या म्हणजे-पोष्ट ऑफिस बचत बँक, राष्ट्रीय बचत पत्रके , किसान विकास पत्रे, मासिक रिकरिंग डिपॉझिटस्, पोष्टल लाईफ इन्श्युरन्स, निवृत्ती वेतन, पैसे पाठविणे इ.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया :
भारतातील सर्व बँकांचे व्यवहार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियंत्रणाखाली असतात. रिझर्व्ह बँक ही ‘बँकांची जननी’ किंवा ‘बँकाची बँक’ किंवा ‘मध्यवर्ती बँक’ (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) म्हणून ओळखली जाते. रिझर्व्ह बँक पैशांविषयीची धोरणे ठरविते आणि इतर सर्व बँका त्यांचे अनुकरण करतात. आज आपल्या देशात 21 राष्ट्रीयीकृत बँका, 21 खाजगी बँका आणि 19 परदेशी
बँका आहेत.
बँकांचे महत्त्वाचे प्रकार
1. सेंट्रल बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2. व्यापारविषयक बँका 3. औद्योगिक विकास बँका 4. भूविकास बँका 5. स्थानिक बँका पतपेढ्या 6. सहकारी बँका
बँक खात्यांचे प्रकार
बँकेमध्ये चार प्रकारची खाती उघडली जावू शकतात.
1. बचत खाते : हे पगारदार व्यक्तीना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि निवृत्तीवेतनधारकांना उपयुक्त आहे. पैशांची बचत करून पैसे साठविणाèया लोकांना प्रोत्साहन देण्याकरिता ही खाती उघडली जातात.
2. चालू खाते : व्यावसायिक किंवा उद्योजकांना उपयुक्त आहे. या खात्याते दिवसातून किती ही रक्कम कितीही वेळा ठेवली किंवा काढली जावू शकते.
3. आवर्ती ठेव खाते (आर.डी.खाते) : सर्वसाधारणपणे हे खाते भविष्यातील तरतूद करण्याच्या उद्देशाने उघडले जाते. भविष्यातील गरजांसाठी या ठेवी मासिक हप्ता पद्धतीने नियमितपणे ठेवल्या जातात. (उदा. मुलांच्या लग्नखर्चासाठी, शिक्षणासाठी, जमीन, वाहने इ. महागड्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी)
4. मुदत ठेव खाते : विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीकरीता ठेवण्यासाठी हे खाते उघडले जाते. या ठेवीचा कालावधी एक महिना, सहा महिने, एक वर्ष, पाच वर्षे, किंवा दहा वर्षे इ.असू शकतो.
बँक खाते उघडण्याचे फायदे :
1) बँक खाते आपल्याला आपले पैसे सुरक्षित ठेवण्याची सुविधा देते. 2) बँक मतनक खाते दुसèयांना पैसे देण्यासाठी उपयोगी आहे. 3) बँक खात्यामुळे पैशाची बचत होते. 4) खातेदारांना कर्ज मिळते. 5) बँक खात्यामुळे आपल्याला आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होते. 6) खातेदारांना सेफ डिपॉझिट लॉकर्स, एटीएम, क्रेडीट कार्डस् च्या सुविधा प्राप्त करता येतात.
रणजित ल. चौगुले
सहशिक्षक, सरकारी सरदार्स हायस्कूल, बेळगाव.
No comments:
Post a Comment