विद्यार्थी मित्रांनो,
भूगोलातील पहिला पाठ म्हणजे भारताचे स्थान आणि विस्तार होय. हा पाठ नकाशाच्या दृष्टीने तसेच एकेक गुणांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा पाठ आहे. या पाठातील प्रत्येक ओळ न ओळ महत्त्वाची असल्यामुळे सर्व पाठ नजरेखालून गेलाच पाहिजे.
भारताच्या मध्यातून 23 1/20 उत्तर अक्षांश गेले आहे. ते कर्कवृत्त या नावाने ओळखले जाते. तर 82 1/20 पूर्व रेखांश देशाच्या मध्यातून गेलेले आहे. हे भारताचे मध्य रेखांश असून ते अलाहाबाद शहराजवळून गेलेले आहे. त्यावरूनच भारताची प्रमाणवेळ (आयएसटी) निश्चित करण्यात आलेली आहे.
राजकीय विभाग : भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशाच्या राज्यकारभाराच्या सोयीच्या ट्टष्टीने भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार जी राज्ये अस्तित्वात आलेली आहेत. त्यांची संख्या सध्या 29 आहे. आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताची राजधानी दिल्ली असून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून विशेष दर्जा आहे. अलीकडे आंध्रप्रदेशमधील काही भाग वेगळा करून ‘तेलंगाणा’ हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले आहे. सध्यातरी त्या राज्याची तसेच आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबाद ही आहे. या सर्व राज्यांचा विस्ताराच्या दृष्टीने विचार केला तर सर्व राज्यांमध्ये राजस्थान हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य आहे तर गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे.
भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये ज्या सीमा आहेत. त्याही वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. त्यांची नावे विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा रॅडक्लिफरेषा म्हणून ओळखण्यात येते.भारत आणि आफगाणिस्तानमधील सीमारेषा ड्युरांड रेषा म्हणून ओळखली जाते. तर भारत व चीनमधील सीमारेषा मॅकमोहनरेषा म्हणून ओळखतात. अद्याप नवीन ब्ल्यू प्रिंट आलेली नसली तरी नकाशा कसा काढावा तो. कसा अधोरेखित करावा, सजवावा याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या विषय शिक्षकांकडून समजावून घेतल्यास हा पाठ अतिशय सोपा होऊन जातो.
भूगोलातील पहिला पाठ म्हणजे भारताचे स्थान आणि विस्तार होय. हा पाठ नकाशाच्या दृष्टीने तसेच एकेक गुणांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा पाठ आहे. या पाठातील प्रत्येक ओळ न ओळ महत्त्वाची असल्यामुळे सर्व पाठ नजरेखालून गेलाच पाहिजे.
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. CLICK ME
जग आणि आशियामध्ये भारताचे स्थान |
भारताचे स्थान :
भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले. आहे. भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 80.40 ते 370.60 उत्तर अक्षांश आणि 680.70 ते 970.250 पूर्व रेखांशामध्ये विस्तारले आहे. अंदमान आणि निकोबार या बेटांनी पुढे दक्षिणेकडे भारताचा रेखांशीय विस्तार वाढविला आहे. ग्रेट निकोबार बेटातील ‘इंदिरा पाँईंट’ हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. तर जम्मू व काश्मीर मधील ‘इंदिरा कोल’ हे भारतातील उत्तरेकडील टोक आहे.भारताच्या मध्यातून 23 1/20 उत्तर अक्षांश गेले आहे. ते कर्कवृत्त या नावाने ओळखले जाते. तर 82 1/20 पूर्व रेखांश देशाच्या मध्यातून गेलेले आहे. हे भारताचे मध्य रेखांश असून ते अलाहाबाद शहराजवळून गेलेले आहे. त्यावरूनच भारताची प्रमाणवेळ (आयएसटी) निश्चित करण्यात आलेली आहे.
भारताचा विस्तार :
रशिया, कॅनडा, चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यासाररख्या देशानंतर भारत हे जगातील सातवे मोठे राष्ट्र आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32, 87, 263 चौ.कि.मी इतके आहे. जगाच्या एकूण भूभागापैकी 2.42 % भाग भारताने व्यापलेला आहे. भारताची पूर्वपश्चिम रूंदी 2,933 कि.मी आणि उत्तर - दक्षिण लांबी 3,214 कि.मी, इतकी आहे.भारताच्या सीमा :
भारताला भूसीमा व जलसीमा दोन्ही लाभल्या आहेत. देशाच्या भूसीमेची लांबी 15,200 कि.मी. आहे. उत्तरेकडे असलेला हिमालय पर्वत ही भारत आणि चीन यांच्यातील नैसर्गिक सीमा आहे. भारताच्या प्रमुख भूप्रदेशाला 6100 कि.मी. लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. (अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांचा किनारा धरून ती लांबी 7516.5 कि.मी. इतकी होते.) भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे.शेजारील राष्ट्रे :
भारताच्या शेजारी एकूण 7 राष्ट्रे आहेत. भारताच्या वायव्येला पाकिस्तान आणि अफगणिस्तान, उत्तरेला नेपाळ, भूतान आणि चीन. तसेच पूर्वेकडे बांग्लादेश आणि म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश) हे देश आहेत. भारताच्या आग्नेयेला श्रीलंका देश असून तो पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे भारताच्या प्रमुख भूभागापासून वेगळा झाला आहे.राजकीय विभाग : भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशाच्या राज्यकारभाराच्या सोयीच्या ट्टष्टीने भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार जी राज्ये अस्तित्वात आलेली आहेत. त्यांची संख्या सध्या 29 आहे. आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताची राजधानी दिल्ली असून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून विशेष दर्जा आहे. अलीकडे आंध्रप्रदेशमधील काही भाग वेगळा करून ‘तेलंगाणा’ हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले आहे. सध्यातरी त्या राज्याची तसेच आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबाद ही आहे. या सर्व राज्यांचा विस्ताराच्या दृष्टीने विचार केला तर सर्व राज्यांमध्ये राजस्थान हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य आहे तर गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे.
भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये ज्या सीमा आहेत. त्याही वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. त्यांची नावे विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा रॅडक्लिफरेषा म्हणून ओळखण्यात येते.भारत आणि आफगाणिस्तानमधील सीमारेषा ड्युरांड रेषा म्हणून ओळखली जाते. तर भारत व चीनमधील सीमारेषा मॅकमोहनरेषा म्हणून ओळखतात. अद्याप नवीन ब्ल्यू प्रिंट आलेली नसली तरी नकाशा कसा काढावा तो. कसा अधोरेखित करावा, सजवावा याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या विषय शिक्षकांकडून समजावून घेतल्यास हा पाठ अतिशय सोपा होऊन जातो.
रणजित ल. चौगुले
सहशिक्षक, सरकारी सरदार्स हायस्कूल, बेळगाव.
Thanks 😊
ReplyDeleteShilavaran samaja notes
ReplyDelete