Monday, January 30, 2023

भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम

 

3. भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम

 

I) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. दिवाणी अदालत (नागरी कोर्ट) ची स्थापना  ___________  कडून झाली.

उत्तर : वॉरन हेस्टिंग्ज

2. पोलिस अधीक्षकाचे पद  ________  कडून निर्माण केले गेले.

उत्तर : लॉर्ड कॉर्नवॉलिस

3. बंगाल व बिहारमध्ये (कायमधारा) जमीनदारी पद्धती ________ मध्ये सुरु करण्यात आली.

उत्तर : 1793

4. अलेक्झांडर रीडने सुरू केलेली जमीन महसूल पद्धत ____________ होय.

उत्तर : रयतवारी पद्धत

5. भारतामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती पुरस्कृत करणारा ब्रिटीश अधिकारी __________  होय.

उत्तर : वॉरन हेस्टींग्ज

6. ‘रेग्युलेटिंग अ‍ॅक्टची अंमलबजावणी __________या वर्षी झाली.

उत्तर : 1773

 

II). खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

1. ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिशांनी भारतात सुरू केलेल्या न्यायव्यवस्थेबद्दल चर्चा करून माहिती लिहा.

उत्तर : ब्रिटिशांनी भारतात टप्प्याटप्याने केंद्रीकृत न्यायव्यवस्था अंमलात आणली 

·        ब्रिटिशांनी ही व्यवस्था लागू करून मोंगलांची सत्ता मोडून काढली आणि भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.  

·        1772 मध्ये गव्हर्नर पदावर आलेल्या  वॉरन हेस्टींग्जने नवीन योजना अंमलात आणली.

·        या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात दोन प्रकारची न्यायालये असणे सक्तीचे होते.

·        ती म्हणजे - ‘दिवाणी अदालत’ व ‘फौजदारी अदालत’.

·        येथे हिंदूना हिंदू धर्मग्रंथानुसार व मुस्लीमांना शरीयतनुसार न्याय दिला जात असे.

·        गुन्हेगारी प्रकरणात सर्वांची चौकशी इस्लाम कायद्याप्रमाणे केली जात होती.

·        हळूहळू, फौजदारी न्यायालयांमध्ये ब्रिटिश कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्या.

·        ब्रिटिश कायदे अंमलात आणून गुन्हेगारी कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात आले.

·        दिवाणी न्यायालये युरोपीय अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली आली.

·        फौजदारी न्यायालये काझींच्या नियंत्रणाखाली असली तरी ती युरोपीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कार्यरत होती.

 

2. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीदरम्यान पोलीस व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या?

उत्तर : पोलीस व्यवस्था :

·        अंतर्गत कायदे व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे हे पोलिसांचे   काम होते.

·        लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात प्रथमच  प्रभावी पोलीस यंत्रणा राबविली.

·        पोलीस अधीक्षक (Superitendent of Police) हे नवीन पद निर्माण केले.

·        प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक पोलीस ठाणी निर्माण केली

·        प्रत्येक ठाण्यावर ‘कोतवालाची’ नेमणूक केली.

·        प्रत्येक खेड्यात एका चौकीदाराची नेमणूक केली.

·        गावपातळीवरील चोरी, गुन्हे आणि इतर कायद्याच्या उल्लंघनासाठी ‘कोतवाल’ला जबाबदार ठरवण्यात आले.

·        1770 च्या भीषण दुष्काळामुळे कायदा व सुव्यवस्था डळमळीत झाली. म्हणून संपूर्ण पोलीस खाते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अंमलाखाली आणण्यात आले.

·        1781 मध्ये ब्रिटिश दंडाधिकारी नेमण्याची पद्धत सुरू झाली.

·        पोलीस अधिकारी या दंडाधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली कार्यरत असत.

·        1861 मध्ये स्वतंत्र भारतीय पोलीस कायदा अंमलात आणला गेला

·        1902 मध्ये पोलीस आयोगाने पोलीस अधिकार्‍यांच्या पदासाठी योग्य भारतीयांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली.

 

3. (कायमधारा) जमीनदारी पद्धतीने भारतीय शेतकऱ्यांना कर्जात जन्मण्यास कर्जात जगण्यास व कर्जातच मरण्यास कसे भाग पाडले. ते स्पष्ट करा.

उत्तर : लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगालमध्ये वार्षिक स्थिर महसूल निर्माण करण्यासाठी नवीन जमीन धोरण लागू केले. याला कायमधारा पद्धत म्हणतात. या व्यवस्थेनुसार जमीनदार हा जमिनीचा मालक झाला.

·        जमीनदार कराची रक्कम दरवर्षी ठराविक मुदतीत कंपनीकडे जमा करीत.

·        या पद्धतीमध्ये करवसुली करणाऱ्यांना जमिनीचे मालकी हक्क देण्यात आले.

·        त्यांच्यामार्फत सरकारने निश्चित केलेली कराची रक्कम वसूल करण्याची व्यवस्था केली गेली.

·        हे जमीनदार शेतकऱ्यांकडून निश्चित केलेल्या करापेक्षा जादा रक्कम वसूल करीत आणि स्वतः ऐष आरामाचे, सुखाचे जीवन व्यतीत करीत.

·        यामुळे जमीनदार गबर झाले.

·        महापूर व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे जर शेतकरी कर भरण्यास असमर्थ ठरले  तर त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क सरळ कंपनीकडे जात असे.

·        कंपनी व जमीनदार दोघांचाही फायदा होत असे परंतु शेतकरी मात्र पूर्णपणे जमीनदोस्त होत असे.

·        या प्रणालीने एक नवीन सामाजिक गट तयार केला ज्याने ब्रिटिशांना मदत केली.

·        शेतजमिनींमध्ये कामाच्या अनियमित संधींमुळे शेतकरी, शेतमजुरांचे हाल झाले.

·        त्यांचे शोषण झाले आणि त्यांना असुरक्षिततेचे जीवन जगावे लागले.

·      गरीब शेतकऱ्यांचे शोषण होऊन त्यांच्या यातनेत भर पडली मात्र सरकारी खजिन्यामध्ये पुरेसा पैसा येऊ लागला. त्यामुळेच, "भारतीय शेतकरी कर्जात जन्मत असत, कर्जातच रहात असत आणि ब्रिटिशांच्या जमीन कर धोरणामुळे कर्जातच मरत असत.’’ हे चार्ल्स मेटकॉफच्या मत पटते.

 

4. रयतवारी पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर : 1792  मध्ये अलेक्झांडर रीडने  रयतवारी पद्धतीची सुरूवात  बारामहल प्रांतात  केली.

·        1801 मध्ये थॉमस मन्रोने ही पद्धत मद्रास व म्हैसूर प्रांतात चालू ठेवली.

·        या पद्धतीत शेतकरी व कंपनीचा एकमेकांशी थेट संबंध आला.

·        जो जमीन कसत असे तोच जमिनीचा मालक म्हणून ओळखला जात असे.

·        उत्पादनाच्या पन्नास टक्के रक्कम मालकाला कराच्या स्वरूपात कंपनीला द्यावी लागे.

·        या जमीन महसूलाला 30 वर्षाची मुदत असे.

·        या मुदतीनंतर कर आकारणीमध्ये बदल केला जाऊ शकत असे.

·        लहान शेतकर्‍यांना जमिनीची मालकी दिली असली, तरी भरमसाठ जमीन कर आकारणीमुळे त्यांना ते परवडत नसे.

·        करवसुलीसाठी अधिकारी दंडात्मक कारवाई करीत.

·        जरी जास्त पीक पिकले नसले, पिके करपली तरी कर भरावाच लागे.

·        प्रसंगी कर भरण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढावे लागे.

·        कर्जाची रक्कम फेडता आली नाही तर त्यांना आपली जमीन विकावी लागे.  

·        या पद्धतीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असे.

 

5. ब्रिटिशांच्या जमीन महसूल पद्धतीचे परिणाम कोणते?

उत्तर : ब्रिटीश जमीन महसूल पद्धतीचे परिणाम :

1. शेतकऱ्यांचे शोषण करणारा जमीनदारांचा नवा वर्ग निर्माण झाला.

2. जमीनदारांच्या शोषणाला बळी पडलेले शेतकरी हळूहळू भूमिहीन झाले.

3. जमीन म्हणजे एक वस्तू समजली जाऊ लागली - जमिनी गहाण ठेवून कर्ज उपलब्ध होऊ लागले.

4. अनेक जमीनदारांना जमिनीचा कर भरण्यासाठी त्यांच्या जमिनी गहाण ठेवाव्या लागल्या.

5. कृषी क्षेत्र हे इंग्लंडमधील कारखान्यांना लागणाऱ्या कच्या मालाचे उत्पादन करणारे व्यावसायिक क्षेत्र बनले.

6. सावकार लोक गबर झाले.

 

6. भारतामध्ये आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे झालेल्या परिणामांची माहिती लिहा.

उत्तर : भारतावर झालेले ब्रिटिश शिक्षण पद्धतीचे परिणाम :

1. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाबरोबरच आधुनिकता, निधर्मीपणा, लोकशाहीवृत्ती आणि विवेकबुद्धी जागृत झाली.

2. स्थानिक साहित्य व भाषांना उत्तेजन मिळाले. यामुळे सुशिक्षित वर्गात ऐक्याचे विचार निर्माण होण्यास मदत झाली.

3. नियतकालिकांचा उदय झाला. यामुळे सरकारी कामकाजाची व धोरणांची छाननी होऊ लागली आणि भारतीय लोक विविध विषयांवर आपली टीकात्मक मते व्यक्त करू लागले.

4. नवनवीन सामाजिक व धार्मिक चळवळी सुरू झाल्या.

5. जे.एस.मिल, रुसो आणि माँटेस्क्यूसारख्यांच्या थोर विचारांमुळे सुशिक्षित भारतीय तरूणांमध्ये नव्या विचारांची उत्पत्ती होवू लागली.

6. जगभरात सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळींचा प्रभाव भारतीयांवरही पडला.

7. भारतीयांमध्ये आपल्या थोर परंपरा समजून घेवून त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव निर्माण झाली.  

अशा रीतीने ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे  नवीन विचार आणि सांस्कृतिक धारणा उदयास आली. ब्रिटीश शिक्षण व्यवस्थेमुळे पुरोगामी वृत्तीची भारतीयांची नवीन पिढी निर्माण झाली. भारतीय आधुनिक पिढी तयार झाली.

 

7. ‘रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट’ मधील तरतुदी कोणत्या?

उत्तर : या कायद्यातील प्रमुख तरतूदी –

1. या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी ब्रिटिश राजवटीत बंगाल, मद्रास व बाँबे अशा तीन प्रेसिडेन्सीज होत्या. या तिन्ही प्रेसिडेन्सीजमध्ये  स्वतंत्र राज्यकारभार चालत असे. रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट अंतर्गत बंगाल प्रेसिडेन्सीने इतर दोन प्रेसिडेंसींवर नियंत्रण मिळवले.

2. बंगालचा गव्हर्नर हा  तिन्ही प्रेसिडेन्सीजचा गव्हर्नर जनरल बनला.

3. गव्हर्नर जनरलला इतर दोघांवर निर्देश, नियंत्रण आणि देखरेख करण्याचे अधिकार देण्यात आले होते.

4. कंपनीच्या संचालक मंडळाच्या तसेच बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय  बाँबे व मद्रास प्रेसिडेन्सीज कोणावरही युद्ध घोषित करू शकत नव्हते किंवा शांतता करार करू शकत नव्हते. अगदीच आणिबाणीच्या परिस्थितीत स्वतंत्रपणे कार्य करण्याचा अधिकार त्यांना होता.

5. या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. या मध्यवर्ती न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि तीन सामान्य न्यायाधीश होते.

अशारीतीने नावाप्रमाणेच कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवणे हेच या कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट होय.

 

8. 1858 च्या भारत सरकारच्या कायद्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या?

उत्तर : या कायद्यातील प्रमुख तरतुदी :

1. ईस्ट इंडिया कंपनीची मान्यता रद्द करण्यात आली व भारत देशावर राणीचा राज्यकारभार सुरु झाला.

2. गव्हर्नर जनरल या हुद्दयाचे नाव बदलून त्याला ‘व्हाईसरॉय’ असे संबोधण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले.

3. ब्रिटीश सरकारमध्ये ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया’ (राज्यसचिव) नावाचे नवीन पद निर्माण करण्यात आले. सचिव हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा भाग होता आणि भारताचा राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली.

4 प्रशासनात सचिवांना मदत करण्यासाठी मदत करण्यासाठी 15 सदस्यांची एक भारतीय परिषद (Council of India) अस्तित्वात आली.

 

9. 1935 चा भारत सरकारचा कायदा म्हणजे भारतीय संविधानाचा मूळ पाया होय’ याचे समर्थन करा.

उत्तर : या कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा आधार म्हणून काम केले.

·        1928 मध्ये मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेला अहवाल या कायद्याच्या निर्मितीत महत्त्वाचा ठरला.

·        भारतीय राज्यघटनेतील बहुतांश तरतुदी या कायद्यावर आधारित आहेत.

·        या कायद्याने भारतीयांना पूर्णपणे जबाबदार सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली

·        हा कायदा भारतातील ब्रिटिश प्रांतापुरता मर्यादित नसून स्थानिक संस्थानांना पण तो लागू होणार होता 

·        ब्रिटीश शासित प्रदेश, स्थानिक संस्थाने व मांडलिक राज्ये मिळून भारतीय संघराज्याची कल्पना मांडण्यात आली.

·        भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. 

·        केंद्रात दुहेरी राज्यव्यवस्था (Dyarchy) स्थापन करण्यात आली.

·        प्रांतातील दोन गृहांचे सरकार रद्द करून त्यांना संपूर्ण स्वायत्तता देण्यात आली.

·        भारतात संघराज्य न्यायालय (Federal Court) स्थापन करण्यात आले.  

 

10. 1919 च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या?

उत्तर : या कायद्यातील प्रमुख तरतुदी :

1. केंद्रात दोन गृहांचे सरकार (Bi cameral) स्थापण्याची पद्धत सुरू झाली त्यांना वरचे सभागृह व खालचे सभागृह असे म्हणतात.

2. प्रांतामध्ये पण केंद्राप्रमाणेच दोन गृहे निर्माण करण्यात आली.

3. भारतासाठी एका उच्चायुक्तांची नेमणूक करण्यात आली.

4. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करण्याची हमी देण्यात आली.

5.  प्रांतीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळा करण्यात आला.  

6. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन व युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघ सुरु करण्यात आले.

 

ब्रिटीश सत्तेचा विस्तार

 

2. ब्रिटीश सत्तेचा विस्तार

 

I) खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाच्या शेवटी ब्रिटिश व मराठ्यांमध्ये _______ _ हा करार  झाला.

उत्तर : सालबाईचा करार

2. ‘सहाय्यक सैन्य पद्धती’ _____________ यांने अंमलात आणली.

उत्तर : लॉर्ड वेलस्ली

3. ‘खालसा धोरण’ (दत्तक वारसा नामंजूर) _____________ या साली अंमलात आणले गेले.

उत्तर : 1848

4. ‘खालसा धोरण’ (दत्तक वारसा नामंजूर) _____________ यांने अवलंबिले.

उत्तर : लॉर्ड डलहौसी

 

II)  खालील प्रश्रांची उत्तरे लिहा.

1. पहिल्या अँग्लो - मराठा युद्धाची कारणे द्या.

उत्तर : पहिले अँग्लो - मराठा युद्ध (1775-1782) :

·        दुसऱ्या शाह आलमशी मराठ्यांनी हातमिळवणी केली आणि त्याला दिल्लीच्या तख्तावर बसविले .

·        इंग्रजांच्या ताब्यातील  कोरा आणि अलाहाबाद हे प्रांत शाह आलमने मराठ्यांना दिले

·        यामुळे इंग्रज व मराठ्यांमध्ये वैर निर्माण झाले

·        दरम्यान माधवराव पेशवे या शूर व बलाढय योद्ध्याच्या मृत्यूने मराठ्याला जबरदस्त फटका बसला

·        नंतर त्यांचे बंधू नारायणराव सत्तेवर आले.

·        परंतु त्यांचे काका राघोबानी त्यांनी हत्या केली .

·        त्यामुळे पेशवे पदासाठी त्याच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू झाले

·        मराठा सरदारांच्या गटाने  राघोबादादांऐवजी नारायणरावांचा मुलगा दुसरा माधवराव याला पेशवेपद दिले.

·        यामुळे निराश झालेला राघोबा ब्रिटिशांच्या आश्रयाला गेला.

·        या संधीचा फायदा घेत ब्रिटिशांनी मराठ्यांवर आक्रमण केले

 

·        1775 ते 1782 दरम्यान मराठे व ब्रिटिशांच्यात प्रदीर्घ युद्ध झाले .

·        ब्रिटिशांपुढे मराठ्यांचा टिकाव लागला नाही .  सालबाईच्या कराराने हे युद्ध संपुष्टात आले .

·        दुसऱ्या माधवरावाला ‘पेशवा’ म्हणून घोषित करण्यात आले.  

 

2. सहाय्यक सैन्यपद्धतीमधील अटी सविस्तरपणे लिहा.

उत्तर : भारतातील राज्यांना स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली याने ‘सहाय्यक सैन्य पद्धती’ अंमलात आणली हा भारत व ईस्ट इंडिया कंपनी यामधील एक लष्करी करार होता.

सहाय्यक सैन्य पद्धतीतील अटी

1. सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणाऱ्या भारतीय राजांना ब्रिटिश सैन्य त्यांच्या राज्यात ठेवावे लागले.

 2. सैन्याची देखभाल आणि सैनिकांच्या वेतनाचा खर्च संबंधित राजाने करावा किंवा जमिनीवरील ठराविक महसूल  द्यावा.

3. राजाला त्याच्या दरबारात ब्रिटिशांचा वकील ठेवणे आवश्यक होते.

4.  ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय राजाला इतर कोणत्याही युरोपियनांची नेमणूक करता येणार नाही.

5. राज्यकर्त्यांनी इतर राज्यांशी तसेच इतर संस्थानांशी स्वतंत्र करार करावयाचे नाहीत. त्यासाठी त्यांना गव्हर्नरची परवानगी घेणे बंधनकारक होते.

6. वरील सर्व सेवांच्या बदल्यात त्या राजाला ईस्ट इंडिया कंपनी कडून अंतर्गत किंवा बाह्य आक्रमणापासून संपूर्ण संरक्षण मिळेल.

 

3. तिसऱ्या अँग्लो - मराठा युद्धाचे वर्णन करा.

उत्तर : तिसरे अँग्लो - मराठा युद्ध  (1817-18)

·        स्वतःची पत व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मराठा घराण्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

·        ईस्ट इंडिया कंपनीच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी पेशव्यांनीसुद्धा आटोकाट प्रयत्न केले.

·        1817 साली पेशव्यांनी पुण्यातील इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला चढविला

·        नागपूरच्या आप्पासाहेबांनी व मल्हारराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले व ते पराभूत झाले.

·        दुसऱ्या  बाजीराव पेशव्यांने ब्रिटिशांविरुद्ध कोरेगांव व आष्टी येथे 1818 मध्ये युद्ध केले आणि तो  ब्रिटिशांना शरण आला.

·        ब्रिटिशांनी पेशवा हे पद रद्द करून बाजीरावला निवृत्तीवेतन दिले.

·        इंग्रजांनी प्रतापसिंह याला साताऱ्याच्या गादीवर बसविले आणि मराठ्यांचा वारसदार म्हणून घोषित केले

·        अशा रीतीने त्यांनी मराठ्यांचा विरोध पूर्णपणे दडपून टाकला.  

 

4. खालसा धोरण (दत्तकवारसा नामंजूर) भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्ताराला कसे पूरक ठरले?

उत्तर : गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने 1848 मध्ये खालसा धोरण (दत्तक वारसा नामंजूर)  राबविले.

·        भारतातील सर्व संस्थाने ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करून घेण्याच्या  प्रयत्नाचा हा भाग होता.

·        ज्याद्वारे दत्तक घेतलेल्या राजांच्या मुलांना वारसा हक्क नाकारण्यात आला.  

·        ‘खालसा धोरण’ म्हणजेच ‘यानुसार जर एखाद्या निपुत्रिक राजाचा मृत्यू झाला तर त्याच्या दत्तक पुत्रांना गादीवर बसण्याचा कायदेशीर हक्क नव्हता आणि असे राज्य आपोआपच ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केले जात असे.

·        या धोरणा अंतर्गत सातारा, नागपूर, संबळपूर, उदयपूर, झाशी, जयपूर इ.संस्थाने खालसा करण्यात आली.

·        गव्हर्नर जनरलचा या धोरणाबद्दल सखोल अभ्यास असल्याने  याचा वापर   राजकीय अस्त्राप्रमाणे केला.

·        हे धोरण काटेकोरपणे तसेच अत्यंत कठोरपणे राबविण्यात आले.  

 

5. खालसा धोरणांतर्गत कोणकोणती संस्थाने विलीन झाली?

उत्तर : या धोरणा अंतर्गत सातारा, नागपूर, संबळपूर, उदयपूर, झाशी, जयपूर यासारखी अनेक संस्थाने खालसा करण्यात आली.

 

युरोपियनांचे भारतात आगमन


1.  युरोपियनांचे भारतात आगमन


 I) खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. 1453 मध्ये अ‍ॅटोमन तुर्कांनी __________ शहर काबीज केले.

उत्तर : कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल)

2. भारत व युरोपमधील नवीन जलमार्ग __________ याने शोधून काढला.

उत्तर : वास्को द गामा

3. 1741 मध्ये डचांनी __________ यांच्याशी युद्धाची घोषणा केली.

उत्तर : मार्तंड वर्मा

4. भारतामधील फ्रेंचांची राजधानी __________  ही होती.

उत्तर : वालिकोंडपुरम (पुदुच्चेरी /पाँडिचेरी )

5. 1757 मध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने सिराज उद्दौला बरोबर __________ येथे लढाई केली.

उत्तर : प्लासी

6. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील दिवाणी हक्क __________ याने दिले.

उत्तर : दूसरा शाह आलम

7. बंगालमध्ये __________ याने दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली.

उत्तर : रॉबर्ट क्लाईव्ह

 

II) खालील प्रश्नांची उत्तरे समूहामध्ये चर्चा करून लिहा.

1. मध्ययुगात भारत व युरोप यांच्यातील व्यापार कसा चालत असे?

उत्तर : 1. मध्ययुगात अरबी व्यापारी आशियातील विक्रीचा माल पूर्व रोमन साम्राज्याची (बायझेंटीयम) राजधानी ‘कॉन्स्टॅन्टिनोपल’ येथे पोहोचवत असत. 2. तेथून इटलीचे (रोमन साम्राज्याचाभाग) व्यापारी तो माल खरेदी करून युरोपियन राष्ट्रांना विकत असत. अशाप्रकारे कॉन्स्टॅन्टिनोपल हे आंतरराष्ट्रीय वस्तू विनिमयाचे प्रमुख केंद्र बनले.


2. भारताकडे येणारा नवीन जलमार्ग का शोधावा लागला याबद्दल चर्चा करा.

उत्तर : 1. आशिया आणि युरोपमधील व्यापार कॉन्स्टॅन्टिनोपल   शहराच्या माध्यमातून होत असत. 1453 मध्ये अ‍ॅटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज केले. 2. कॉन्स्टॅन्टिनोपलला जोडणारे सर्व व्यापारी मार्ग तुर्कांच्या नियंत्रणाखाली आले. 3. या नव्या संधीचा फायदा घेऊन तुर्कांनी या मार्गावरून नेण्यात येणाऱ्या  व्यापारी वस्तूंवर भरमसाठ कर लादण्यास प्रारंभ केला. 4. परिणामतः व्यापाऱ्यांना या मार्गावरील व्यापार फायदेशीर वाटेनासा झाला. 5. युरोपियन व्यापारावर इटलीच्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती. ती मोडून काढायची होती.  


3. भारतात व्यापारासाठी आलेल्या युरोपियनांची यादी करा.

उत्तर : भारतात व्यापारासाठी आलेले युरोपियन 1.पोर्तुगीज  2.डच 3. इंग्रज 4.फ्रेंच. 


4. मार्तंड वर्माने डचाना कसा शह  दिला स्पष्ट करा.

उत्तर :  सीमा वाढविण्यासाठी पन्नास हजार सैनिकांची फौज तयार केली.

·     मिरी पिकविणाऱ्या जागा ताब्यात घेतल्या. 

·     आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवले.

·     त्या लोकांनाही डचांचा  विरोध करण्यास भाग पाडले.

·     डचांनी कायमकुलम, कोची, पुरक्कड आणि वडकुंकुर या प्रांताच्या  मदतीने त्रावणकोरवर हल्ला केला. परंतु राजा मार्तंडने त्यांचा पराभव केला

·     नेदुमंगला व  कोट्टारकर  व्यापारी केंद्रे ताब्यात घेतली.

·     डचांना पत्र लिहून , “कोणत्याही परकीयांसाठी आम्ही मिरीचा  व्यापार करण्याचा अधिकार कधीही सोडणार नाही” असे सांगितले.

·     1741 मध्ये डचांनी त्रावणकोरसह कोट्टारकर प्रांतात युद्धाची घोषणा केली.  परंतु मार्तंड वर्माने  प्रतिकार करीत त्यांना माघारी पाठविले. 

·     डचांनी कोचीनमध्ये सिंहीली सैन्याच्या मदतीने प्रतिकार केला परंतु ते पराभूत झाले.

·     24 प्रमुख डच अधिकाऱ्यांना कैदी बनविले. यामध्ये डचांचे मोठे नुकसान झाले.  

·     केरळ व तामिळनाडू मध्ये मिरीच्या व्यापाराचा हक्क प्रस्थापित केला.

·     डचांच्या ताब्यात असलेली बंदरेही  परत मिळविली. 

·     15 ऑगस्ट 1753 रोजी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि डच सैन्याने आपली सत्ता त्रावणकोर राज्याला सुपूर्द केली.  


5. दुसऱ्या कार्नाटिक युद्धाचे वर्णन करा.

उत्तर : दुसरे कार्नाटिक युद्ध  1749 ते 1754 या कालावधीत झाले.

·     फ्रेंचांनी   सलाबतजंगला हैद्राबादचा निजाम म्हणून घोषित केले

·     त्याच्या रक्षणासाठी फ्रेंचांनी आपले सैन्य ठेवले आणि कॅ. बुसी याची नेमणूक केली.

·     फ्रेंचांच्या पाठिंब्याने चंदासाहेब हा कार्नाटिकचा नबाब झाला.

·     इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाईव्हने कार्नाटिकची राजधानी अर्काटवर आक्रमण करून फ्रेंचांचा व चंदासाहेबाचा पराभव केला.

·     शेवटी या युद्धात चंदासाहेबाला अटक करून त्याची हत्या करण्यात आली.

·     त्याच्या जागी महंम्मद अली याची नबाब म्हणून नेमणूक केली

·     पाँडिचेरीचा करार होऊन दुसऱ्या कार्नाटिक युद्धाचा शेवट झाला.

·     फ्रेंचांनी डुप्लेला फ्रान्सला परत बोलावून घेतले.

·     या युद्धामुळे फ्रेंचांचे राजकीय वर्चस्व कमी होऊन ब्रिटिशांची प्रतिष्ठा वाढली.


6. प्लासीच्या लढाईची कारणे व परिणाम लिहा.

उत्तर : कारणे :

·     दस्तकावा गैरवापर 

विनापरवाना किल्ल्याची दुरुस्ती 

कृष्णरंध्र  शोकांतिका

परिणामः  

1. या युद्धामुळे अनैतिकता, भारतीयातील एकतेचा अभाव, तसेच त्यावेळचे भारतीय  व्यापारी लोभीवृत्तीचे होते हे दिसून आले.

2. मीरजाफर बंगालचा नवाब बनला.

3. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील व्यापाराचे विशेष अधिकार मिळाले.

4. सिराज उद्दौलाने कलकत्त्यावर केलेल्या आक्रमणाची नुकसानभरपाई म्हणून मीरजाफरने कंपनीला सतरा कोटी सत्तर लाख रुपये दिले.


7. बक्सारच्या लढाईचे कोणते परिणाम झाले ?

उत्तर : परिणाम :

1. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील दिवाणीचे हक्क (जमीन महसूल गोळा करणे) दुसऱ्या शाह आलमकडून मिळाले.

2. शाह आलमला वार्षिक 26 लाख रू. घेऊन बंगाल वरील सर्व हक्क सोडून द्यावे लागले.

3. अवधचा नबाब शुजा उद्दौला याला युद्धाची नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रू. द्यावे लागले.

4. मीर जाफरचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मुलास मासिक निवृत्ती वेतन दिले. आणि बंगालचा पूर्ण कारभार कंपनी पाहू लागली.  

 


बँकेचे व्यवहार