Monday, January 30, 2023

ब्रिटीश सत्तेचा विस्तार

 

2. ब्रिटीश सत्तेचा विस्तार

 

I) खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाच्या शेवटी ब्रिटिश व मराठ्यांमध्ये _______ _ हा करार  झाला.

उत्तर : सालबाईचा करार

2. ‘सहाय्यक सैन्य पद्धती’ _____________ यांने अंमलात आणली.

उत्तर : लॉर्ड वेलस्ली

3. ‘खालसा धोरण’ (दत्तक वारसा नामंजूर) _____________ या साली अंमलात आणले गेले.

उत्तर : 1848

4. ‘खालसा धोरण’ (दत्तक वारसा नामंजूर) _____________ यांने अवलंबिले.

उत्तर : लॉर्ड डलहौसी

 

II)  खालील प्रश्रांची उत्तरे लिहा.

1. पहिल्या अँग्लो - मराठा युद्धाची कारणे द्या.

उत्तर : पहिले अँग्लो - मराठा युद्ध (1775-1782) :

·        दुसऱ्या शाह आलमशी मराठ्यांनी हातमिळवणी केली आणि त्याला दिल्लीच्या तख्तावर बसविले .

·        इंग्रजांच्या ताब्यातील  कोरा आणि अलाहाबाद हे प्रांत शाह आलमने मराठ्यांना दिले

·        यामुळे इंग्रज व मराठ्यांमध्ये वैर निर्माण झाले

·        दरम्यान माधवराव पेशवे या शूर व बलाढय योद्ध्याच्या मृत्यूने मराठ्याला जबरदस्त फटका बसला

·        नंतर त्यांचे बंधू नारायणराव सत्तेवर आले.

·        परंतु त्यांचे काका राघोबानी त्यांनी हत्या केली .

·        त्यामुळे पेशवे पदासाठी त्याच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू झाले

·        मराठा सरदारांच्या गटाने  राघोबादादांऐवजी नारायणरावांचा मुलगा दुसरा माधवराव याला पेशवेपद दिले.

·        यामुळे निराश झालेला राघोबा ब्रिटिशांच्या आश्रयाला गेला.

·        या संधीचा फायदा घेत ब्रिटिशांनी मराठ्यांवर आक्रमण केले

 

·        1775 ते 1782 दरम्यान मराठे व ब्रिटिशांच्यात प्रदीर्घ युद्ध झाले .

·        ब्रिटिशांपुढे मराठ्यांचा टिकाव लागला नाही .  सालबाईच्या कराराने हे युद्ध संपुष्टात आले .

·        दुसऱ्या माधवरावाला ‘पेशवा’ म्हणून घोषित करण्यात आले.  

 

2. सहाय्यक सैन्यपद्धतीमधील अटी सविस्तरपणे लिहा.

उत्तर : भारतातील राज्यांना स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली याने ‘सहाय्यक सैन्य पद्धती’ अंमलात आणली हा भारत व ईस्ट इंडिया कंपनी यामधील एक लष्करी करार होता.

सहाय्यक सैन्य पद्धतीतील अटी

1. सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणाऱ्या भारतीय राजांना ब्रिटिश सैन्य त्यांच्या राज्यात ठेवावे लागले.

 2. सैन्याची देखभाल आणि सैनिकांच्या वेतनाचा खर्च संबंधित राजाने करावा किंवा जमिनीवरील ठराविक महसूल  द्यावा.

3. राजाला त्याच्या दरबारात ब्रिटिशांचा वकील ठेवणे आवश्यक होते.

4.  ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय राजाला इतर कोणत्याही युरोपियनांची नेमणूक करता येणार नाही.

5. राज्यकर्त्यांनी इतर राज्यांशी तसेच इतर संस्थानांशी स्वतंत्र करार करावयाचे नाहीत. त्यासाठी त्यांना गव्हर्नरची परवानगी घेणे बंधनकारक होते.

6. वरील सर्व सेवांच्या बदल्यात त्या राजाला ईस्ट इंडिया कंपनी कडून अंतर्गत किंवा बाह्य आक्रमणापासून संपूर्ण संरक्षण मिळेल.

 

3. तिसऱ्या अँग्लो - मराठा युद्धाचे वर्णन करा.

उत्तर : तिसरे अँग्लो - मराठा युद्ध  (1817-18)

·        स्वतःची पत व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मराठा घराण्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

·        ईस्ट इंडिया कंपनीच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी पेशव्यांनीसुद्धा आटोकाट प्रयत्न केले.

·        1817 साली पेशव्यांनी पुण्यातील इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला चढविला

·        नागपूरच्या आप्पासाहेबांनी व मल्हारराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले व ते पराभूत झाले.

·        दुसऱ्या  बाजीराव पेशव्यांने ब्रिटिशांविरुद्ध कोरेगांव व आष्टी येथे 1818 मध्ये युद्ध केले आणि तो  ब्रिटिशांना शरण आला.

·        ब्रिटिशांनी पेशवा हे पद रद्द करून बाजीरावला निवृत्तीवेतन दिले.

·        इंग्रजांनी प्रतापसिंह याला साताऱ्याच्या गादीवर बसविले आणि मराठ्यांचा वारसदार म्हणून घोषित केले

·        अशा रीतीने त्यांनी मराठ्यांचा विरोध पूर्णपणे दडपून टाकला.  

 

4. खालसा धोरण (दत्तकवारसा नामंजूर) भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्ताराला कसे पूरक ठरले?

उत्तर : गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने 1848 मध्ये खालसा धोरण (दत्तक वारसा नामंजूर)  राबविले.

·        भारतातील सर्व संस्थाने ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करून घेण्याच्या  प्रयत्नाचा हा भाग होता.

·        ज्याद्वारे दत्तक घेतलेल्या राजांच्या मुलांना वारसा हक्क नाकारण्यात आला.  

·        ‘खालसा धोरण’ म्हणजेच ‘यानुसार जर एखाद्या निपुत्रिक राजाचा मृत्यू झाला तर त्याच्या दत्तक पुत्रांना गादीवर बसण्याचा कायदेशीर हक्क नव्हता आणि असे राज्य आपोआपच ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केले जात असे.

·        या धोरणा अंतर्गत सातारा, नागपूर, संबळपूर, उदयपूर, झाशी, जयपूर इ.संस्थाने खालसा करण्यात आली.

·        गव्हर्नर जनरलचा या धोरणाबद्दल सखोल अभ्यास असल्याने  याचा वापर   राजकीय अस्त्राप्रमाणे केला.

·        हे धोरण काटेकोरपणे तसेच अत्यंत कठोरपणे राबविण्यात आले.  

 

5. खालसा धोरणांतर्गत कोणकोणती संस्थाने विलीन झाली?

उत्तर : या धोरणा अंतर्गत सातारा, नागपूर, संबळपूर, उदयपूर, झाशी, जयपूर यासारखी अनेक संस्थाने खालसा करण्यात आली.

 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024