1. युरोपियनांचे
भारतात आगमन I)
खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा. 1. 1453 मध्ये अॅटोमन तुर्कांनी __________ शहर
काबीज केले. उत्तर : कॉन्स्टॅटिनोपल
(इस्तंबूल) 2. भारत व युरोपमधील नवीन जलमार्ग __________ याने
शोधून काढला. उत्तर : वास्को
द गामा 3. 1741 मध्ये डचांनी __________ यांच्याशी
युद्धाची घोषणा केली. उत्तर : मार्तंड
वर्मा 4. भारतामधील फ्रेंचांची राजधानी __________ ही होती. उत्तर : वालिकोंडपुरम
(पुदुच्चेरी /पाँडिचेरी ) 5. 1757 मध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने सिराज
उद्दौला बरोबर __________ येथे लढाई केली. उत्तर :
प्लासी 6. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील दिवाणी हक्क __________
याने दिले. उत्तर : दूसरा
शाह आलम 7. बंगालमध्ये __________ याने दुहेरी
राज्यव्यवस्था सुरू केली. उत्तर : रॉबर्ट
क्लाईव्ह II) खालील प्रश्नांची उत्तरे समूहामध्ये
चर्चा करून लिहा. 1. मध्ययुगात भारत व युरोप
यांच्यातील व्यापार कसा चालत असे? उत्तर : 1. मध्ययुगात
अरबी व्यापारी आशियातील विक्रीचा माल पूर्व रोमन साम्राज्याची (बायझेंटीयम)
राजधानी ‘कॉन्स्टॅन्टिनोपल’ येथे पोहोचवत असत. 2. तेथून
इटलीचे (रोमन साम्राज्याचाभाग) व्यापारी तो माल खरेदी करून युरोपियन राष्ट्रांना
विकत असत. अशाप्रकारे कॉन्स्टॅन्टिनोपल हे आंतरराष्ट्रीय वस्तू विनिमयाचे प्रमुख
केंद्र बनले. 2. भारताकडे येणारा नवीन
जलमार्ग का शोधावा लागला याबद्दल चर्चा करा. उत्तर : 1. आशिया आणि युरोपमधील व्यापार कॉन्स्टॅन्टिनोपल शहराच्या माध्यमातून होत असत. 1453 मध्ये अॅटोमन
तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज केले. 2. कॉन्स्टॅन्टिनोपलला
जोडणारे सर्व व्यापारी मार्ग तुर्कांच्या नियंत्रणाखाली आले. 3. या नव्या
संधीचा फायदा घेऊन तुर्कांनी या मार्गावरून नेण्यात येणाऱ्या व्यापारी वस्तूंवर भरमसाठ कर लादण्यास प्रारंभ
केला. 4. परिणामतः व्यापाऱ्यांना या मार्गावरील व्यापार फायदेशीर
वाटेनासा झाला. 5. युरोपियन व्यापारावर इटलीच्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी
होती. ती मोडून काढायची होती. 3. भारतात व्यापारासाठी
आलेल्या युरोपियनांची यादी करा. उत्तर : भारतात व्यापारासाठी आलेले युरोपियन 1.पोर्तुगीज 2.डच 3. इंग्रज 4.फ्रेंच. 4. मार्तंड वर्माने डचाना
कसा शह दिला स्पष्ट करा. उत्तर : सीमा वाढविण्यासाठी पन्नास हजार सैनिकांची
फौज तयार केली. ·
मिरी पिकविणाऱ्या जागा ताब्यात घेतल्या. ·
आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवले. ·
त्या लोकांनाही डचांचा विरोध करण्यास भाग पाडले. ·
डचांनी कायमकुलम, कोची, पुरक्कड आणि वडकुंकुर या प्रांताच्या मदतीने
त्रावणकोरवर हल्ला केला. परंतु राजा मार्तंडने त्यांचा पराभव केला ·
नेदुमंगला व
कोट्टारकर
व्यापारी केंद्रे ताब्यात घेतली. ·
डचांना पत्र लिहून , “कोणत्याही परकीयांसाठी आम्ही मिरीचा व्यापार करण्याचा अधिकार कधीही सोडणार नाही”
असे सांगितले. ·
1741 मध्ये डचांनी त्रावणकोरसह कोट्टारकर प्रांतात
युद्धाची घोषणा केली. परंतु मार्तंड
वर्माने प्रतिकार करीत त्यांना माघारी
पाठविले. ·
डचांनी कोचीनमध्ये सिंहीली सैन्याच्या मदतीने प्रतिकार
केला परंतु ते पराभूत झाले. ·
24 प्रमुख डच अधिकाऱ्यांना कैदी बनविले. यामध्ये डचांचे
मोठे नुकसान झाले. ·
केरळ व तामिळनाडू मध्ये मिरीच्या व्यापाराचा हक्क
प्रस्थापित केला. ·
डचांच्या ताब्यात असलेली बंदरेही परत मिळविली. · 15 ऑगस्ट
1753 रोजी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि डच सैन्याने
आपली सत्ता त्रावणकोर राज्याला सुपूर्द केली. 5. दुसऱ्या कार्नाटिक
युद्धाचे वर्णन करा. उत्तर : दुसरे
कार्नाटिक युद्ध 1749 ते 1754 या
कालावधीत झाले. · फ्रेंचांनी सलाबतजंगला हैद्राबादचा निजाम म्हणून घोषित
केले · त्याच्या रक्षणासाठी
फ्रेंचांनी आपले सैन्य ठेवले आणि कॅ. बुसी याची नेमणूक केली. · फ्रेंचांच्या पाठिंब्याने
चंदासाहेब हा कार्नाटिकचा नबाब झाला. · इंग्रज अधिकारी रॉबर्ट
क्लाईव्हने कार्नाटिकची राजधानी अर्काटवर आक्रमण करून फ्रेंचांचा व चंदासाहेबाचा
पराभव केला. · शेवटी या युद्धात
चंदासाहेबाला अटक करून त्याची हत्या करण्यात आली. · त्याच्या जागी महंम्मद
अली याची नबाब म्हणून नेमणूक केली · पाँडिचेरीचा करार होऊन
दुसऱ्या कार्नाटिक युद्धाचा शेवट झाला. · फ्रेंचांनी डुप्लेला
फ्रान्सला परत बोलावून घेतले. · या युद्धामुळे फ्रेंचांचे
राजकीय वर्चस्व कमी होऊन ब्रिटिशांची प्रतिष्ठा वाढली. 6. प्लासीच्या लढाईची
कारणे व परिणाम लिहा. उत्तर : कारणे : · दस्तकावा गैरवापर विनापरवाना किल्ल्याची दुरुस्ती कृष्णरंध्र
शोकांतिका परिणामः
1. या युद्धामुळे अनैतिकता, भारतीयातील एकतेचा
अभाव, तसेच त्यावेळचे भारतीय व्यापारी लोभीवृत्तीचे होते हे दिसून आले. 2. मीरजाफर बंगालचा नवाब बनला. 3. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील व्यापाराचे
विशेष अधिकार मिळाले. 4. सिराज उद्दौलाने कलकत्त्यावर केलेल्या
आक्रमणाची नुकसानभरपाई म्हणून मीरजाफरने कंपनीला सतरा कोटी सत्तर लाख रुपये
दिले. 7. बक्सारच्या लढाईचे
कोणते परिणाम झाले ? उत्तर : परिणाम
: 1. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधील दिवाणीचे हक्क
(जमीन महसूल गोळा करणे) दुसऱ्या शाह आलमकडून मिळाले. 2. शाह आलमला वार्षिक 26 लाख रू. घेऊन बंगाल वरील
सर्व हक्क सोडून द्यावे लागले. 3. अवधचा नबाब शुजा उद्दौला याला युद्धाची नुकसान
भरपाई म्हणून 50 लाख रू. द्यावे लागले. 4. मीर जाफरचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मुलास
मासिक निवृत्ती वेतन दिले. आणि बंगालचा पूर्ण कारभार कंपनी पाहू लागली. |
Monday, January 30, 2023
युरोपियनांचे भारतात आगमन
Subscribe to:
Post Comments (Atom)
दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024
दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024
-
कल्पनाविस्तार कल्पना विस्तार करणे म्हणजे दिलेल्या विषयावर लहानसा निबंधच लिहून दाखविणे होय. यासाठी काही गोष्टी लक्षात ठ...
-
लेखक परिचय : वामन कृष्णा चोरघडे (1914-1994) नागपूर येथे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले. मराठीतील श्रेष्ठ कथाकार. त्यांन...
-
कवी परिचय : गणेश हरी पाटील (1906-1989) बी.ए.,बी.टी.पर्यंत शिक्षण झाले होते. शाळेत शिक्षक, शिक्षणाधिकारी, ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य अश...
No comments:
Post a Comment