5.
सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळी I. खालील रिकाम्या जागा योग्य
शब्दांनी भरा. 1.
19व्या शतकाला __________________ चा काळ म्हणतात. उत्तर : भारतीय पुनरुज्जीवनाचा कालखंड’ 2.
राजा राम मोहन रॉय यांनी _______________ हे वृत्तपत्र सुरू
केले. उत्तर : संवाद कौमुदी’ 3.
प्रार्थना समाजाचे संस्थापक _______________ होते. उत्तर : आत्माराम पांडुरंग 4. ____________
यांनी स्वातंत्र्य ही
प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज असल्याचा प्रचार केला उत्तर :
महात्मा जोतिबा फुले 5.
स्वामी विवेकानंदांचे गुरू _______________
होते उत्तर :
रामकृष्ण परमहंस II
. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 1. ब्राह्मो समाजाची शिकवण
कोणती ? उत्तर : ब्राह्मोसमाजाची
स्थापनाराजाराम मोहन राय यांनी केली. ·
मूर्तिपूजा व अनेक ईश्वरवादाला विरोध केला. ·
एकेश्वरवादाला प्रोत्साहन दिले. ·
यज्ञ आणि विधी यांच्या कामगिरीचा
निषेध केला. ·
पुरोहित वर्गाला विरोध केला. ·
आधुनिक विज्ञान आणि इंग्रजी शिक्षण
आवश्यक आहे, ·
महिलांच्या शोषणाला विरोध केला. ·
सती प्रथा आणि बालविवाहास विरोध
केला. ·
सतीबंदी कायद्याचे समर्थन केले. ·
पत्रकारितेतून लोकांत विवेकवाद
रुजवण्याचा प्रयत्न केला. ·
इंग्रजी शिक्षणाला महत्त्व दिले 2. “वेदांकडे परत चला”
या दयानंद सरस्वतींच्या विधानाचे
विश्लेषण करा. उत्तर : दयानंद
सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ·
देशभर फिरून व्याख्याने दिली ·
वेद हेच सत्य
आहेत. ·
वेद हेच ज्ञानाचे
स्त्रोत आहेत. ·
या संदर्भात ‘वेदांकडे परत चला’ असा सल्ला दिला. ·
‘सत्यार्थ प्रकाश’ या पुस्तकात आपली शिकवण मांडली ·
त्यांनी मूर्तिपूजा आणि जातिव्यवस्थेचा निषेध केला. ·
जातीचा निर्णय व्यक्तीच्या जन्मावरून नव्हे तर क्षमतेवर
आधारित असावा, असे मत मांडले. ·
पुरोहित वर्गाच्या असंख्य निरर्थक प्रथा आणि वर्चस्व
नाकारले. ·
विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. ·
लोकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले. 3. सत्यशोधक समाजाने
प्रतिपादन केलेल्या सुधारणांचे विवरण
करा. उत्तर : सत्यशोधक
समाजाची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केली. · स्वातंत्र्य ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज आहे आणि
स्वातंत्र्य नसल्यास कोणतीही व्यक्ती आपले विचार व्यक्त करू शकत नाही. ·
दारूबंदीसाठी प्रयत्न केले. · स्त्री-पुरुष असमानता, मानवी हक्क नाकारणे, लोकांचे शोषण आदि गोष्टींना विरोध केला. ·
अस्पृश्यतेच्या प्रथेला कडाडून विरोध केला. ·
मुलींसाठी प्राथमिक शाळा काढली. ·
शूद्र आणि जातिहीन वर्गांवर सक्ती केल्या जात असलेल्या
गुलामगिरीचा निषेध केला ·
अशा गुलामगिरीसाठी जबाबदार असलेल्या लोकांचा निषेध केला. ·
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. ·
शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाच्या अनेक शाखा उघडल्या आणि
त्यांचे कार्य चालू ठेवले ·
‘गुलामगिरी’ या पुस्तकात शोषणाविषयी सविस्तर लिहिले आहे. · फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही सत्यशोधक
समाजाच्या माध्यमातून स्त्री शिक्षणासाठी परिश्रम घेतले. ·
पुढे डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्यावर फुलेंच्या तत्त्वांचा
प्रभाव पडला. 4. अलीगड चळवळीच्या
उद्देशांचे विश्लेषण करा. उत्तर : अलिगढ
चळवळीची सुरुवात व नेतृत्व सर सय्यद अहमद खान यांनी
केले. · मुस्लिमांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,
धार्मिक आणि तात्विक विश्वासांमध्ये परिवर्तन करणे. ·
पौर्वात्य आणि
पाश्चात्य विचारांच्या सुसंवादाला चालना देणे. · मुस्लिम समाजाला आधुनिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने
त्यांनी ‘द अँग्लो-ओरिएंटल कॉलेज’ सुरू केले. · पुढे या महाविद्यालयाचे नामकरण ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठ’ असे करण्यात आले. ·
पाश्चात्य शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण देणे. ·
पाश्चात्य
शिक्षणाद्वारे आधुनिक समाजाची निर्मिती करणे. ·
मुस्लिम समाजाला एकत्र आणणे. ·
त्यांनी स्त्री साक्षरतेचे समर्थन केले. ·
बहुपत्नीत्वाला विरोध केला. ·
विधवाविवाहाच्या
विरोधात असलेल्या कल्पनांचा निषेध केला. 5. रामकृष्ण मिशनची
उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर : रामकृष्ण
परमहंस यांच्या आदर्शांचा, विचारांचा प्रचार करण्यासाठी. ·
सर्व धर्मांच्या समानतेचा संदेश पोहोचवणे आणि ते
प्रत्यक्षात आणणे. ·
प्राचीन, आधुनिक आणि पाश्चात्य विचारवंतांचा संगम साधणे. ·
शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन
करत आहे. 6. स्वामी विवेकानंद हे
तरुणांचे प्रेरणास्थान होते. स्पष्ट करा. उत्तर : स्वामी
विवेकानंद हे एक क्रांतिकारी संन्यासी होते. ·
स्वामी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशनची स्थापना केली ·
रामकृष्ण परमहंसांचे विचार समाजापर्यंत पोहोचविले ·
ज्यांनी जीवनातील प्रेमाचे महत्त्व सांगत भारतीयांना जागृत
केले. ·
त्यांनी व्यक्तीचे महत्त्व, त्याची उपस्थिती आणि क्षमता यावर
जोर दिला. ·
मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना आणि योगाभ्यास याशिवाय
समाजसेवाही आवश्यक आहे. ·
शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन
करत आहे. ·
राष्ट्र आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ·
गांधीजींसह अनेक राष्ट्रीय नेते विवेकानंदांच्या
तत्त्वज्ञानाने प्रेरित झाले होते. ·
शिकागोतील जागतिक धर्म परिषदेत, सर्व धर्मांबद्दल
सहिष्णुतेचा पुरस्कार करून आणि सर्व धर्म सत्य आहेत हे सांगितले. ·
भारताच्या महानतेचे समर्थन केले. ·
भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली. तरुणांसाठी ते
आदर्श होते. 7. अॅनी बेझंटनी कोणत्या
सुधारणा केल्या ? उत्तर : भारतात
थिऑसॉफिकल सोसायटीचे उपक्रम सुरू केले आणि त्याला नवे चैतन्य दिले. ·
आपल्या व्याख्यानातून भारतीय संस्कृतीचा अभिमान जागविला. · समाजात समता, वैश्विक बंधुता आणि एकोपा प्रस्थापित
करण्याचा प्रयत्न केला. ·
भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पूर्ण पाठिंबा दिला. · ‘न्यू इंडिया’ आणि ‘कॉमनविल’ ही वृत्तपत्रे त्यांच्या
कल्पनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सुरू केली. ·
1916 मध्ये तिने होमरूल चळवळ सुरू केली. ·
1917 च्या काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या. ·
भारतीय तत्त्वज्ञान व स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठे
योगदान दिले. |
No comments:
Post a Comment