6. भारताचे
पहिले स्वातंत्र्य युद्ध ( इ.स. 1857) प्रश्न 1. खालील गाळलेल्या जागा योग्य
पदांनी भरा. 1) युरोपियन इतिहासकारांनी 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाला ---------- असे म्हटले आहे. 2) लॉर्ड डलहौसीनी --------------- हे धोरण अमलात आणले. 3) 1857 च्या बंडात ----------- ने ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारले ? 4 ) झाशीच्या राणीने इंग्रजां विरुद्धच्या युद्धात ------------- हे ताब्यात
घेतले उत्तरे : 1. शिपायांचे बंड 2. दत्तक वारसा नामंजूर / खालसा धोरण / डॉक्टरिन ऑफ लॅप्स 3. मंगल पांडे 4. ग्वाल्हेर 5. प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 1)
दत्तक वारसां नामंजूर या तत्त्वाचे परिणाम काय झाले विश्लेषण
करा. उत्तर : इंग्रजांनी आपला राज्य विस्तार वाढवण्यासाठी वेगवेगळ्या
पद्धतींचा अवलंब केला • त्यातीलच एक ' दत्तक वारसा नामजूर पद्धत ' • या पद्धतीमुळे बरेचसे
प्रांत व राज्य इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आली • त्यामुळे भारतीय लोक नाराज
झाले • इंग्रजांच्या या शासन
पद्धतीमुळे असंतोष माजला • यामुळेच 1857 चे बंडही झाले • यालाच खालसा धोरण ' आणि डॉक्टरिन ऑफ लॅप्स ' म्हणतात 2) या काळातील आर्थिक बदल 1857 च्या बंडाला कसे कारणीभूत ठरले
? उत्तर : इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय कुटीर
उद्योगांचा नाश झाला • भारतीय कारागीरबेकार झाले • भारतीय सुती वस्त्रे व लोकरी
वस्तूंची पिछेहाट झाली • सुती वस्रोद्योगाचा -हास
झाला • लाखो विणकर आणि कारागीर
बेकार झाले • सुती वस्त्रांवर
इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात करलादला गेला • इंग्रजांनी व जमीनदारांनी
शेतकऱ्यांची पिळवणूक केली. 3)
1857 च्या युद्धात शिपायांच्या धार्मिक भावना कशा दुखविल्या गेल्या ? उत्तर : भारतीय
शिपायांना समुद्र ओलांडून जाण्याची केलेली सक्ती ही आपणास जातीभ्रष्ट करण्याचा
प्रयत्न आहे अशी सैनिकांची भावना झाली. इंग्रज
सरकारने नवीन लांब पल्ल्याच्या रॉयल इनफिल्ड बंदुका ' वापरण्यास सुरुवात केली. या बंदुकीसाठी वापरण्यात येणारी काडतुसे होती.
त्यांच्या आवरणावर गायीची आणि डुकराची चरबी लावली आहे अशी अफवा पसरली 4)
पहिल्या स्वातंत्र्य युद्धाला कारणीभूत असलेली तत्कालीन कारणे कोणती ? उत्तर : इंग्रज
सरकारने नवीन लांब पल्ल्याच्या रॉयल इनफिल्ड बंदुका ' वापरण्यास सुरुवात केली • या बंदुकीसाठी वापरण्यात
येणारी काडतुसे होती • त्यांच्या आवरणावर गायीची
आणि डुकराची चरबी लावली आहे अशी अफवा पसरली • हिंदूंना गायीची चरबी व
मुस्लिमांना डुकराची चरबी ही धार्मिक बाब होती • इंग्रज अधिकाऱ्यांनी
ज्यावेळी बंदूक चालविण्याची जबरदस्ती केली त्यावेळी मंगल पांडे या शिपायाने
अधिकाऱ्याला गोळी घालून ठार मारले • हेच या बंडावे तात्कालीन
कारण होते. 5)
1857 च्या बंडाच्या अपयशाच्या कारणांची यादी करा. उत्तर : ही
स्वातंत्र्य संग्रामाची चळवळ संपूर्ण भारतात पसरली नाही • ही चळवळ काही ठराविक
लोकांच्या हितापुरती मर्यादित राहिली • इंग्रजी सैन्यांमधील एकी व
भारतीय सैन्यातील असंघटितपणा अपयशाला कारणीभूत ठरला. • बंडखोरांना योग्य नेतृत्व
लाभले नाही • अयोग्य नीती, अकुशलता, बेशिस्तपणात दिशाहीनता ही कारणे असफलते
मागे होती. • बंडखोरांनी लूट, दरोडे घातल्यामुळे जनसामान्यांचा विश्वास गमावला • अनेक संस्थानिक इंग्रजांशी
एकनिष्ठ राहिले 6)
1858 मध्ये ब्रिटनच्या
राणीने जाहीर केलेली आश्वासने कोणती ? उत्तर : ईस्ट इंडिया
कंपनीने स्थानिक संस्थानिकांशी केलेला करार स्वीकारण्यात आला. • महत्त्वाकांक्षी विस्तार
योजनांना आळा बसला • भारतीयांना स्थिर सरकार
देण्याचे आश्वासन दिले • कायद्यांमध्ये समानता ठेवली
गेली • धार्मिक सहिष्णुता असेल
तसेच भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाणार नाही |
No comments:
Post a Comment