9.
जागतिक महायुद्धे आणि भारताची भूमिका I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. १. -------------- या साली पहिले
जागतिक महायुद्ध समाप्त झाले. २. -------------- या साली
व्हर्सेलीसच्या तहावर सह्या झाल्या. ३. फॅसिस्ट हुकूमशहा -------------- हा होता. ४. -------------- हे जर्मनीतील
नाझी पक्षाचे पक्षाचे नेते होते. ५. दुसरे जागतिक महायुद्ध --------------
या साली सुरू झाले. ६. जपानने अमेरिकेच्या -------------- या नाविक तळावर हल्ला केला. ७. म्हैसूर लान्सर्सचे प्रमुख
म्हणून यांना -------------- युद्ध क्षेत्रात पाठविण्यात आले. 8. वंशभेदाचा प्रसार करण्यासाठी
हिटलरने ------------- नावाच्या खास मंत्र्यांची नेमणूक केली होती. 9. हिटलरच्या खाजगी सैन्याचे नाव ------------ असे होते. 10. हिटलरने ----------- नावाचे स्वत:चे कायदे बनविले. 11. मुसोलिनी ---------- या देशाचा पंतप्रधान होता. उत्तरे
: 1. 1918 2. 1919 3. बेनेटो मुसोलिनी 4. अॅडोल्फ हिटलर 5. 1939 6. पर्ल हार्बर 7. बी. चामराज अर्स 8. गोबेल्स 9. ब्राऊन
शर्टस 10. न्यूरेंबर्ग लॉज 11. इटली II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. १. पहिल्या जागतिक महायुद्धाची तात्कालिक कारण
विवरण करा. उत्तर : पहिल्या महायुद्धाचे प्रमुख कारण म्हणजे २८ जुलै १९१४ रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रान्सीस फर्डिनांड याची विेशासघाताने केलेली हत्या विेशासघाताने केलेली हत्या हे होय. या घटनेुळे ऑस्ट्रिया आणि सर्बीया या दोन देशांध्ये ताणतणाव निर्माण झाला. 2. पहिल्या महायुद्धाची कारणे कोणती ? उत्तर
: 1. युरोपीय देशांमध्ये उत्कट
राष्ट्रभक्ती वाढीस लागली. 2. सामाज्यवादी विस्तार प्रवृत्ती बळावली. 3. •
वसाहती नियंत्रित करण्यासाठी स्पर्धा
• युरोपीय देशांमधील सीमा विवाद
देशादेशांत मैत्री करार करण्यात आले. 4. युरोपमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा
वाढीस लागली. 5. वसाहतवाद वाढीस लागला. 6. ऑस्ट्रियाचा युवराज आर्कड्यूक
फ्रान्सिस फर्डिनांड याची हत्या • युरोपमधील युतींची निर्मिती 3.
"नाझी विचारधारेमुळे जर्मनीचा नाश झाला' या विधानाचे समर्थन करा. उत्तर : नाझी
विचारसरणीने जर्मनीमध्ये सत्ता हस्तगत केली आणि अनेक गोष्टींना ते कारणीभूत ठरले
• साम्यवादी आणि समाजवाद्यांना दडपून
टाकले. • कामगार
संघटना व राजकीय
पक्षांवर बंदी घातली. •नाझी हा एकमेव राजकीय पक्ष आहे असे
त्याने घोषित केले • गोबेल्सची नियुक्ती • होलोकॉस्ट नरसंहार • न्यूरेंबर्ग कायदे लागू करणे • कॉन्सन्ट्रेशन शिबिरांची स्थापना • संपूर्ण जग जिंकण्याची
महत्त्वाकांक्षा • आर्य वंशाचे लोकप्रियीकरण • जर्मन लोकच
जगावर राज्य करू शकतात.
• इतर सर्व जमाती फक्त स्वतःवरराज्य करून घेण्यास लायक
आहेत • ज्यु लोक
जर्मनीच्या सर्व समस्यांना जबाबदार आहेत. • साम्यवादी, कॅथॉलिक आणि
समाजवादी लोक जगण्यास असमर्थ आहेत. • दुसऱ्या महायुद्धाचे मुख्य कारण
आणि बळी बनणे. 4. दुसऱ्या जागतिक महायुद्धाची कारणे कोणती? उत्तर : • युरोपीय देशांमध्ये अत्यंत
राष्ट्रवादाचा विकास. • जर्मनी आणि
इटलीमध्ये हुकूमशहांचा उदय. • अपमानास्पद व्हर्साय करार. • लष्करी युतीची निर्मिती. • युरोपमधील शस्त्रास्त्रांची
शर्यत. संपूर्ण जग
जिंकण्याची घातक
महत्वाकांक्षा •1939 मध्ये पोलंडवर जर्मनीचा हल्ला 5. म्हैसूर लान्सर्सच्या कमांडंरची
(सेनाधिकारी) नावे लिहा. उत्तर : म्हैसूर
लान्सर्सचे काही महत्त्वाचे कमांडंट - ए. टी. त्यागराजा, लिंगराज अरस, सुब्बराज अरस, बी.पी.
कृष्ण अरस, मिर तूराब अली, सरदार
बहादुर, रेजिमंटदार
बी. चामराज अरस आणि कर्नल देसीराज अरस. 6. तीन मूर्ती चौक कोठे आहे? उत्तर : नवी दिल्ली येथे आहे. 7. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनने
भारतातील संसाधनांचा उपयोग कसा करून घेतला. उत्तर : • ब्रिटिशांनी भारतीय सैन्य पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये पाठवले होते. • भारताची कृषी उत्पादने इंग्लंडला पाठवली. • औद्योगिक वस्तूही इंग्लंडलाही पाठवण्यात आल्या. • युद्धसामुग्रीच्या निर्मितीसाठी शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांचे अपग्रेडेशन करण्याचे नवीन धोरण स्वीकारले. • त्यामुळे भारतीय लष्कराला युद्धात गुणात्मक आणि परिमाणात्मक युद्धसाहित्याचा वापर करायला मिळाला. • भारतीय सैन्याने लहान युद्ध तंत्र वापरून इटालियनचा पराभव केला. • जर्मन युद्धात भारतीय सैन्यानेही भाग घेतला होता. 8. दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या
पराक्रमाबद्दल माहिती लिहा. वायव्य सरहद्दीत भारतीय सैन्याने युद्धाचे जे तंत्र शिकले होते. ते पूर्व आफ्रिकेतील इटालियन लोकांशी लढतांना वापरले. 2. सखोल प्रशिक्षण आणि एकत्रित शस्त्रास्त्रांच्या तंत्रामुळे भारतीय सैन्याने आयर्विन रोमेलच्या आफ्रिका मार्गे रोखण्यास यशस्वी झाले. 3. जर्मन सैन्याच्या पराभवात भारतीय सैन्याचा सहभाग हा देखील एक प्रमुख घटक होता. 4. 1942 साली जपानी सैन्याकडून भारतीय सैन्याचा पराभव झाला. 5. परंतु 1942-45 च्या ब्रह्मदेश मोहिमेमुळे भारतीय लष्कराला सखोल लष्करी प्रशिक्षण मिळाले. त्यामुळे भारतीय सैन्याला तेथे विजय मिळविता आला. 9. होलोकॉस्ट म्हणजे काय ? उत्तर : हिटलरने केलेल्या जू लोकांच्या सामूहिक हत्याकांडाला होलोकॉस्ट ' म्हणतात. 10. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी
शत्रूराष्ट्र (ॲक्सीस) गटात कोणती राष्ट्रे होती ? उत्तर : दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान शत्रूराष्ट्र (ॲक्सीस) गटात जर्मनी, जपान व इटली ही राष्ट्रे होती. 11. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी
मित्रराष्ट्र (अलाइज) गटात कोणती राष्ट्रे होती ? उत्तर : दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मित्रराष्ट्र (अलाइज) गटात ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि इतर काही देश होते. 12. रशियाने जर्मनीबरोबर कोणता करार केला होता ? उत्तर : २४ ऑगस्ट १९३९ मध्ये रशियाने जर्मनीबरोबर "युद्धबंदीचा अनाक्रमण करार' (नो वॉर पॅक्ट करार). 13. सलोखा करार केलेले देश
कोणते ? उत्तर : ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या तीन देशांनी सलोखा करार केला. 14. मैत्रीचा करार केलेले
देश कोणते ? उत्तर : जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि इटली या तीन देशांनी आपापसात मैत्रीचा करार केला. 15. रशियामध्ये समाजवादी
क्रांती केव्हा झाली ? उत्तर : नोव्हेंबर १९१७ साली रशियामध्ये समाजवादी क्रांती झाली. 16. पहिल्या महायुद्धाचे परिणाम सांगा. उत्तर : 1. मित्रराष्ट्रांना व्हर्सेलिसच्या तहावर सह्या
कराव्या लागल्या. 2. • ऑस्ट्रो-हंगेरी आणि ऑटोमन साम्राज्याने त्यांचे अस्तित्व गमावले. 3. जर्मनीने पराभव स्वीकारला 4. जर्मनीने आपला बराचसा भाग गमावला. 5.
युरोपच्या नकाशात आमूलाग्र बदल झाला. 6. अनेक छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्रे
उदयाला आली. 7. ‘राष्ट्रसंघाची’ (लीग ऑफ नेशन्स) स्थापना 8. शरम आणि मानखंडनेच्या भावनेमुळे पराभूत
राष्ट्रांमध्ये आक्रमक देशभक्ती निर्माण झाली. 9. युद्धामध्ये झालेल्या
नुकसानीची भरपाई आणि जर्मनीवर लादलेल्या
अनेक निर्णयांमुळे जनतेवर विपरित परिणाम झाले. 10. बेरोजगारी, गरिबी आणि आर्थिक मंदीमुळे सर्वत्र असंतोषाचे वातावरण पसरले. 11.
स्वत:च्या फायद्यासाठी जर्मन उद्योजकांकडून शोषण केले जावू लागले. 12. अपरिमित जिवीत हानी, रक्तपात, नागरी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. 13. हिटलर आणि मुसोलिनीसारख्या
हुकूमशहांचा उदय झाला. 17. फॅसिझमची (आक्रमक
राष्ट्रवाद) प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ? उत्तर : 1. प्रखर राष्ट्रवादी वृत्ती 2. शत्रूंचा नायनाट 3. हिंसेचा गौरव 4. वंशश्रेष्ठता 5. साम्राज्यवादी विस्तार, 6. हत्याकांडाना पाठिंबा ही फॅसिझमची प्रमुख वैशिष्ट्ये होती. 18. मुसोलिनीने स्थापन
केलेला पक्ष कोणता ? उत्तर : मुसोलिनी हा राष्ट्रीय फॅसिस्ट पक्षाचा
संस्थापक होता. 19. दुसऱ्या महायुद्धाचा
कालावधी कोणता ? उत्तर : १९३९-१९४५. 20. १९४२ च्या
कोणत्या युद्धामध्ये रशियाने जर्मनीच्या
तुकड्यांचा पराभव केला ? उत्तर : स्टॅलीनग्राड युद्धामध्ये रशियाने जर्मनीचापराभव केला 21. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम सांगा उत्तर : • लाखो लोकांचे प्राण
गेले •मालमत्तेचे
नुकसान • संपूर्ण
जगामध्ये अनेक सामाजिक व राजकीय बदल घडून आले. •संयुक्त
राष्ट्रसंघानची (युनो) ची स्थापना झाली •अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व
फ्रान्स हे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे कायमचे सदस्य बनले. •रशिया
आणि अमेरिका हे देश आक्रमक प्रतिस्पर्धी बनले. • शीतयुद्ध सुरू झाले.
• आशियाई आणि आफ्रिकन
देशांना स्वातंत्र्य प्राप्त झाले. •अमेरिकेने अण्वस्त्रांचा वापर सुरू केला. • सर्व बलाढ्य राष्ट्रे अण्वस्त्र संग्रहासाठी स्पर्धा करू लागली. 22. पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला कसा
पाठिंबा दिला? • अनेक संस्थानिकांनी लष्करी, आर्थिक आणि अन्य उत्पादनाचा पुरवठा
करून मदत केली. • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही इंग्लंडला पाठिंबा दिला. • भारताकडून या युद्धात 15
लाख सैनिकांनी भाग घेतला होता. • म्हैसूर लान्सर्स, जोधपूर लान्सर्स आणि हैदराबाद लान्सर्स सहभागी झाले. • भरपूर कपड्यांचा कच्चा माल आणि
लाकूड पुरवले गेले. • मॅंगनीज, अभ्रक, चहा आणि रबर देखील इंग्लंडला निर्यात केले गेले.
|
Tuesday, January 31, 2023
जागतिक महायुद्धे आणि भारताची भूमिका
स्वातंत्र्योत्तर भारत
8. स्वातंत्र्योत्तर
भारत १. रिकाम्या जागी योग्य
शब्द भरा. १. -------------- हे भारतातील शेवटचे
ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते. २. -------------- हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. ३. -------------- हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ४. -------------- साली पॉंडिचेरी केंद्रशासित बनला. ५. राज्य पुनर्रचना कायदा
-------------- या साली अस्तित्वात आला. उत्तरे : 1. लॉर्ड माऊंटबॅटन 2. सरदार वल्लभभाई पटेल 3. डॉ. बाबु
राजेंद्रप्रसाद 4.इ. स. 1963 5. इ. स. 1956 II. एका वाक्यात उत्तरे लिहा. 5. राज्य पुनर्रचना कायदा
केव्हा लागू करण्यात आला? उत्तर : इ. स. 1956 6. सरदार वल्लभभाई पटेल
यांना ‘भारताचे लोहपुरुष’ का म्हटले जाते? उत्तर : त्यांनी संस्थानांचे विलिनीकरणाचे कठीण काम यशस्वी करून दाखविले. 7. भारतातील भाषेच्या
आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? उत्तर : आंध्र प्रदेश 8. आंध्र प्रदेशच्या
निर्मितीसाठी आमरण उपोषण सत्याग्रह कोणी सुरू केला? उत्तर : पोटी श्रीरामुलू 9. राज्य पुनर्रचना
आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? उत्तर : न्यायमूर्ती फाजल अली 10. म्हैसूर राज्याची
स्थापना केव्हा झाली? उत्तर : १
नोव्हेंबर १९५६ 11. म्हैसूर राज्याचे 'कर्नाटक' असे नामकरण केव्हा करण्यात आले? उत्तर : १
नोव्हेंबर १९७३ 12. भारताचे पहिले
पंतप्रधान कोण होते ? उत्तर : जवाहरलाल नेहरू २. खालील प्रश्नांची
उत्तरे समूह चर्चा करून लिहा. १. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
भारतापुढे कोण कोणत्या समस्या होत्या ? उत्तर : • निर्वासितांची समस्या • जातीय दंगली • सरकारची निर्मिती •
संस्थानांचे विलिनीकरण •अन्न उत्पादन • शेतीचा विकास •उद्योगधंद्याचा विकास २. निर्वासितांच्या समस्या
कशा पद्धतीने सोडविल्या ? उत्तर : देशाने पश्चिम बंगाल, ओरिसा, तामिळनाडू, कर्नाटक
आणि केरळ राज्यांमध्ये निर्वासित छावण्या सुरू करून आणि निर्वासितांना अन्न. वस्त्र, निवारा,
रोजगार, जमीन, शिक्षण
आणि आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता पुरवली. ३. पॉंडिचेरी फ्रेंचांच्या
ताब्यातून कसे मुक्त झाले? उत्तर : •
काँग्रेसने आंदोलन सुरू केले • कम्युनिस्ट आणि इतर संघटनांनी पाँडिचेरीच्या
मुक्तीसाठी आग्रह केला. • शेवटी, फ्रेंच सरकारने
पाँडिचेरी सोडले ४. गोवा पोर्तुगीजांच्या
पासून कसा मुक्त झाला. उत्तर
: • गोव्याच्या विलिनीकरणासाठी जोरदार
चळवळ सुरू झाली. • 1955 मध्ये भारतातील
विविध प्रांतातील लोक एकत्र आले आणि त्या सत्याग्रहींनी गोवा मुक्ती चळवळ सुरू
केली. • पोर्तुगीजांनी आफ्रिका व युरोप येथून ज्यादा सैन्याच्या तुकडया मागवून
चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. • 1961 मध्ये भारतीय सैन्याने गोव्यात घुसून
आपल्या ताब्यात घेतले ५. भाषावार प्रांतरचनेच्या
प्रक्रियेचे वर्णन करा. उत्तर : • राज्यकारभार सुरळीतपणे चालण्यासाठी
भाषावर प्रांतरचनेची मागणी करण्यात आली. •ब्रिटिशांच्या काळात संस्थानाद्वारे
राज्यकारभार चालविण्यासाठी वापरली जाणारी भाषा ही सामान्य माणसाची भाषा नव्हती.
अशा परिस्थितीत भाषावार प्रांत रचना करणे हे गरजेचे होते. •आंध्र महासभेतर्फे
पोट्टी श्रीरामलू यांनी ५८ दिवस उपोषण करून १९५२ मध्ये प्राण त्याग केला. • 1953
मध्ये सरकारने न्यायमूर्ती फाजल अली आयोगाची स्थापना केली. • 1953 मध्ये समितीने
आंध्र प्रदेशच्या निर्मितीची शिफारस केली. • अंतिम अहवाल 1956 मध्ये अंमलात आला.
• 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. 6. जुनागढ संस्थान भारतीय
संघराज्यात कसे सामील झाले? उत्तर : • जुनागढचा नवाब पाकिस्तानात सामील
होण्यास इच्छुक होता • लोकांनी नवाबाच्या निर्णयाविरुद्ध बंड केले. • नवाब
पाकिस्तानात पळून गेला • भारतीय सैन्य
जुनागढ मध्ये घुसले. आणि शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. • भारतीय
संघराज्यात सामील होण्यासाठी जनतेने इच्छा व्यक्त केली. 7. हैदराबाद संस्थान
भारतीय संघराज्यात कसे सामील झाले? उत्तर : • स्वतंत्र राहण्याच्या उद्देशाने निजामाने भारतीय संघराज्यात सामील
होण्यास नकार दिला. • साम्यवादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणातील
शेतकऱ्यांनी निजामाविरुद्ध बंड केले. • लोकांनी रझाकारच्या निजामाच्या क्रूर
सैन्याला विरोध केला. • निजामाने युद्धाची तयारी केली. • भारतीय सैन्याने
निजामाचा युद्धात पराभव केला. • १९४८
मध्ये हैदराबाद भारतीय संघराज्यात सामील झाले. |
स्वातंत्र्याची चळवळ
7. स्वातंत्र्याची चळवळ 1 रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना -------- या साली झाली. 2.
आर्थिक निःसारणाचा सिद्धांत --------यांनी मांडला. 3.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” अशी घोषणा ------- नी केली. ४. अली बंधूनी ........... ही चळवळ सुरू केली. ५. ........... यांनी मुस्लिमांसाठी वेगळ्या
राष्ट्राच्या प्रस्ताव मांडला. ६. १९२९ मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद ........... यांनी
भूषविले. ७. ........... या व्यक्तीने "महाड' आणि काळाराम
देऊळ प्रवेशासाठी चळवळ केली. ८. ........... यांनी भारतीय राष्ट्रीय
सैन्याच्या झाशी या रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. ९. ........... या ठिकाणी गांधीजीनी मिठाचा
सत्याग्रह केला. १०. ........... या साली चले जाव (भारत छोडो) चळवळ झाली. उत्तरे : 1. इ.स. 1885 2. दादाभाई नौरोजी 3. बाळ गंगाधर टिळक 4. खिलाफत 5. मोहम्मद अली जिना 6. पंडित. जवाहरलाल नेहरू 7. बाबासाहेब आंबेडकर 8. कॅप्टन लक्ष्मी सेहगल 9. दांडी 10. 1942 2. खालील पैकी योग्य
पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1. भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसचे संस्थापक अ) महात्मा गांधी ब) ए.ओ. ह्यूम क) बाळ गंगाधर टिळक ड) गोपाळ कृष्ण गोखले 2. ‘मराठा’ या वृत्तपत्राचे प्रकाशक ------------- हे होते.
अ) जवाहरलाल नेहरू ब) रासबिहारी बोस क) बाळ गंगाधर टिळक ड) व्ही. डी. सावरकर 3. स्वराज पार्टीची
स्थापना----------------- या साली झाली. अ) 1924 ब) 1923 क) 1929 ड) 1906 4. भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसच्या हरिपुर मधील सभेचे अध्यक्ष
........... हे होते. अ) सरदार वल्लभभाई पटेल ब) डॉ. बी. आर. आंबेडकर
क) लाल लजपत राय ड) सुभाषचंद्र बोस 5. भारताचे पोलादी पुरुष
........... हे होते. अ) भगत सिंग ब) चंद्रशेखर आझाद क) अबुल कलाम आझाद ड) सरदार वल्लभभाई पटेल उत्तरे : 1. ब) ए.ओ. ह्यूम 2. क) बाळ गंगाधर टिळक 3. ब) 1923 4. ड) सुभाषचंद्र बोस 5. ड) सरदार वल्लभभाई पटेल 3.खालील प्रश्नांची उत्तरे
लिहा. 1. भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी भारतात
कोणत्या संघटना अस्तित्वात होत्या? उत्तर : द हिंदू मेळा, द ईस्ट
इंडियन असोसिएशन, पुणे
सार्वजनिक सभा व द इंडियन असोसिएशन इ. संघटना होत्या. 2. मवाळांनी ब्रिटीशांसमोर
कोणकोणत्या मागण्या मांडल्या? उत्तर : उद्योगधंद्यांची वाढ करणे, संरक्षण
खात्यावरील खर्च कमी करणे, शैक्षणिक
क्षेत्रात विकास साधणे अशा अनेक मागण्या सरकारपुढे मांडून देशातील दारिद्र्यरेषेचा
अंदाज घेण्यास त्यांना भाग पाडले. प्रथमच मवाळांनी भारतातील ब्रिटीशांच्या गैरराज्यकारभाराविषयी विश्लेषण केले. भारतातील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे चाललेला आहे ही आकडेवारी आणि वस्तुस्थिती लोकांच्यासमोर मांडली. 3. आर्थिक निःसारणाच्या सिद्धांताचे विश्लेषण करा. उत्तर :दादाभाई नौरोजींनी भारतीय संपत्तीचा ओघ
इंग्लंडकडे चालला आहे हे सांगितले.
यालाच आर्थिक ‘निःसारणाचा सिद्धांत’
म्हणतात. निर्यात कमी होऊन आयात
वाढल्यामुळे प्रतिकूल रक्कमेच्या शिल्लकीत वाढ झाली आणि भारतातील संपत्तीचा ओघ
इंग्लंडकडे जाऊ लागला. हे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या खजिन्यातून दिला
जाणारा पगार, निवृत्ती
वेतन, ब्रिटीश
अधिकाèयांचे
शासकीय खर्च या मार्गाने भरपूर संपत्तीचा प्रवाह इंग्लंडला गेला. 4. भारतीय स्वातंत्र्य
चळवळीतील प्रमुख क्रांतीकारकांची नावे लिहा. उत्तर :
विनायक दामोदर सावरकर,
अरविंद घोष, अश्विनी
कुमार दत्त, राजनारायण
बोस, राजगुरु, चाफेकर बंधू, शामाजी
कृष्णवर्मा, रासबिहारी
बोस, मादाम
कामा, खुदिराम
बोस, रामप्रसाद
बिस्मिल, अशपाक
उल्लाखान, भगतसिंग, चंद्रशेखर
आझाद, जतीनदास
हे प्रमुख क्रांतीकारक होते. 5. स्वातंत्र्य चळवळी मध्ये
बाळ गंगाधर टिळक यांचे योगदान कोणते? उत्तर : 1) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे
काँग्रेसमधील जहालमतवादी नेते होते. 2) अर्ज व विनंत्या करून ब्रिटिश सरकार
भारताला स्वातंत्र्य देणार नाही या गोष्टीवर टिळकांचा विश्वास होता. 3) स्वातंत्र्याच्याऐवजी
उत्तम प्रशासन हा पर्याय होऊच शकत नाही याचे समर्थन टिळकांनी केले. 4) स्वराज्य
हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून टिळकांनी
स्वतंत्र भारत हे लक्ष्य ठेवले. 5) सामान्य लोकांना स्वातंत्र्य
चळवळीसाठी तयार करून सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सवातून लोकांना एकतेची व
राष्ट्रीयत्वाची प्रेरणा निर्माण केली. 6) तुरूंगातील
वेळेचा सदुपयोग करून टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून स्वातंत्र्य चळवळीस
आक्रमक रूप दिले. 7) टिळकांनी मराठी भाषेत ‘केसरी’ व
इंग्रजीत ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटीशांविरुद्ध चळवळीचे अस्त्र
म्हणून त्यांचा वापर केला. 8) सर्वसामान्य
माणसांना ब्रिटीशांविरुद्ध लढा देण्यास प्रेरित केले. 9) स्वराज्य, स्वदेशी, विदेशी
मालावर बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचा वापर टिळकांनी प्रभावीपणे
केला.10) लाल-बाल-पाल
म्हणजेच लाला लजपतराय,
बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल यांनी बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध
केला. 11) लोकांच्यात
राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी आणि त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केला. 6. बंगालची फाळणी रद्द
होण्याची कारणे कोणती? उत्तर : ब्रिटीशांचे ‘फोडा आणि राज्य करा’ या
धोरणानुसार बंगालची फाळणी झाली. त्याला भारतीय राष्ट्रीय कांगे्रेसने विरोध
केला. परंतु बंगालीभाषेच्या मुस्लीम व हिंदू समुदायांना एकत्र आणण्याचे काम
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने केले. हिंदू व मुस्लीम समुदायात एकात्मता निर्माण
करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. बंगालच्या फाळणी विरुद्ध
संपूर्ण देशभरात जोरदार विरोध झाला. यामध्ये स्वदेशी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची
होती. जहाल मतवांद्यांनी ही चळवळ सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले
स्वदेशी चळवळीने विदेशी वस्तू व त्याची आयात करणाऱ्या संघटनांवर बहिष्कार घातला.
स्वदेशी वस्तू वापराव्यात यासाठी भारतीयांना प्रेरित केले. या स्फोटक
परिस्थितीमुळे 1911
मध्ये ब्रिटीश सरकाने बंगालची फाळणी रद्द केली. 7 मवाळमतवादी नेत्यांची
नावे लिहा.. उत्तर : : मवाळ नेत्यांमध्ये म.गो. रानडे, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी आणि गोपाळकृष्ण गोखले हे प्रमुख होते 8. जहालमतवादी नेत्यांची नावे
लिहा. उत्तर : अरविंदो घोष, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक हे जहाल नेते होत. 9. चौरीचौराच्या घटनांचे वर्णन करा. उत्तर : 1. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हयातील ‘चौरीचौरा’ या ठिकाणी 5 फेब्रुवारी 1922 रोजी ही घटना घडली. 2. 3000 शेतकèयांचा एक मोठा गट पोलीस स्टेशन समोर जमला. 3. दारूच्या दुकानासमोर निदर्शने करणाèया भारतीयांवर लाठीमार करणाèया ब्रिटीश पोलीसांविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी हे शेतकरी जमले होते. 4. ब्रिटीश पोलीसांनी जमलेल्या शेतकèयांवर गोळीबार सुरु केला. 5. शेतकरी संतप्त झाले व त्यांनी पोलीस स्टेशनला आग लावली. 6. पोलीस स्टेशनमध्ये असणारे 22 अधिकारी जिवंत जाळले गेले 10.
मिठाच्या सत्याग्रहाचे वर्णन करा. उत्तर : 1. 1930 मध्ये साबरमती येथील काँग्रेस कार्यकारिणीची सभेनंतर कायदेभंग चळवळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2. गांधींनी 2 मार्च 1930 रोजी 11 मागण्या असलेले पत्र व्हॉईसरॉय आयर्विन यांना लिहिले. 3. ब्रिटीश सरकारने जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नागरी कायदेभंग चळवळ, साराबंदीची चळवळ सुरू करण्यात येईल असे घोषित केले. 4.या मागण्या मान्य न झाल्यामुळे 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी आपल्या अनुयायांबरोबर साबरमती आश्रमापासून गुजराथ मधील दांडी पर्यंत पदयात्रा काढली. 5. 6 एप्रिल रोजी गांधी दांडी येथे पोहोचले व मिठाचे उत्पादन करून मिठाचा कायदा मोडला. 6. मिठाच्या सत्याग‘हानंतर 6 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत राष्ट्रीय आंदोलनाचा सप्ताह साजरा करण्यात आला. 7. या चळवळीत सामील झालेल्या नेत्यांना व हजारो लोकांना अटक करण्यात आली. देशाच्या अनेक भागात ही चळवळ पसरली. 11. स्वातंत्र्य चळवळीत
सुभाषचंद्र बोस यांनी कोणते योगदान दिले? उत्तर : 1. भारतातील क‘ांतीकारकांच्यामधे सुभाषचंद्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे. 2. इंग्रजांची उच्चपदस्थ नोकरी नाकारून स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला.3. ते नेताजी या नावाने प्रसिद्ध होते. 4. परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांना इंग्रजाविरूद्ध लढण्यास सज्ज केले. 5. पं. नेहरू व सुभाषचंद्रांनी 1934 ला ‘काँग्रेस समाजवादी पक्षाची’ स्थापना केली. 6. नेताजीनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. 8. जर्मनीला जाऊन भारताच्या स्वातंत्र्याकरिता जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा पाठिंबा मिळवला. 9. आझाद हिंद रेडिओद्वारे भारतीयांसाठी भाषणे केली. 10.‘इंडियन नॅशनल आर्मीचे नेतृत्व केले. 11. ‘दिल्ली चलो’ ची घोषणा केली. 12. ‘तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’ अशा शब्दात भारतीयांना विनंती केली. 13. महिलांसाठी ‘झांशी रेजिमेंट’ स्थापन केली. 14. रंगून येथून सुभाषजींनी मिलिटरी युद्धकौशल्य वापरून इंग‘जांच्या ताब्यातील दिल्ली हस्तगत करण्याची योजना आखली. 15. बर्मा सीमेवर इंग्रज सैन्यावर सशस्त्र हल्ला केला. 12. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे
कार्य स्पष्ट करा. उत्तर : 1. सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही, असे स्पष्ट मत. 2. जातीभेदाचा अभ्यास करून निर्मूलन करण्याची योजना आखली. 3. अस्पृश्यांसाठी महाड आणि काळाराम मंदिर चळवळ सुरू केली. 4. तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित राहून सल्ले दिले. 5. दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 5. काँगे्रस पक्षात सामील न होता ‘बहिष्कृत हितकर्णी सभा’ आणि ‘स्वतंत्र कार्मिक पार्टी’ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षांची स्थापना केली. 6. ‘प्रबुद्ध भारत’, ‘जनता’, ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ अशी अनेक वृत्तपत्रे प्रसारित केली. 7. शेतमजुरांच्या प्रगतीसाठी काम केले. 8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. 9. अस्पृश्यते विरूद्ध कायदेशीर संरक्षण मिळविले. 10. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे कायदा मंत्री झाले. 11. जातीयतेचा उबग आल्याने हिंदू धर्माशी फारकत घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
13. भारतीय
स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासीच्या बंडाचे वर्णन करा. 14. असहकार चळवळीच्या कार्यक्रमांची यादी करा. 15. चले जाव चळवळीचे वर्णन करा. उत्तर : 1. महात्मा गांधीनी 1942 मध्ये छोडो भारत चळवळ सुरू केली. 2. आपल्या युद्ध प्रयत्नांना भारतीयांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘क्रिप्स मिशन’ भारतात पाठविले. 3. यानुसार भारताला वसाहतीचा दर्जा देणे व मंत्रिमंडळाची स्थापना करणे असे प्रस्ताव मांडले. म्हणून काँग्रेसने ‘चलेजाव चळवळ’ सुरू केली. 4. म. गांधीजीनी ‘करा अथवा मरा’ हा संदेश दिला 5. या संदर्भात गांधीजी, वल्लभभाई पटेल, नेहरू, राजेंद्र प्रसाद, अबुल कलाम आझाद, कस्तुरबा गांधी इ. नेत्यांना अटक झाली. 6. त्यामुळे नवीन नेत्याची तात्काळ गरज असल्याने जयप्रकाश नारायण नेतेपदी आले. 7. मुस्लिम लीग या चळवळीत सामील झाली नाही. 16. पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी कोणती भरीव कामगिरी केली? उत्तर : 1. पंतप्रधान नेहरू हे उद्योगशीलता आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते. 2. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 3. भांडवलशाही आणि समाजवाद या तत्त्वावर आधारलेली ‘मिश्र आर्थिक योजना’ आधुनिक भारताला दिली 4. शीघ‘ औद्योगिकीकरणामुळे विकास शक्य आहे असे त्यांचे मत होते. 5. भारताला पंचवार्षिक योजनेद्वारे विकासांच्या मार्गावर नेण्यात ते अग्रेसर होते. 6. शीतयुद्धापासून लांब राहून अलिप्ततावाद धोरण स्वीकारले. 7. शांती व सुसंवाद या धोरणांचा सतत पाठपुरावा केला. 8. भारतीय लोकशाहीचा पाया भाषावर प्रांतरचनेने मजबूत केला. 17. .
भारत छोडो (चले जाव) आंदोलनाच्या अपयशाची कारणे
कोणती? उत्तर : चळवळीच्या वेळी गांधिजी, नेहरू, राजेंद्र प्रसाद, अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य कृपलानी, कस्तूरबा गांधी आणि अनेक नेत्याना अटक झाली. कॉँग्रेसचे बरेचसे नेते तुरूंगात गेल्यामूळे कॉँग्रेस व्यतिरिक्त इतर संघटना प्रसिद्धिला आल्या. या परिस्थितीमूळे नवीन नेत्याची तत्काळ गरज निर्माण झाली. याचवेळी जयप्रकाश नारायण नेतेपदी आले. 18 . दुसऱ्या गोलमेज परिषदेचे परिणाम कोणते? उत्तर : दुसऱ्या गोलमेज परिषदेत कांहीही निष्पन्न झाले नाही. पण इंग्रजानी
अस्पृशांना वेगळा मतदारसंघ देण्याची कबूली दिली. गांधीजीनी आमरण उपोषण चालू
केले. आंबेडकराना समजावण्याचे प्रयत्न झाले. दरम्यानच्या काळात "पुणे करार' झाला. या
करारानुसार परिशिष्ट वर्गासाठी विभक्त
मतदार संघ रद्द करण्यात आले. या वर्गासाठी राखीव जागा वाढविण्यात आल्या. अशा
जागी दलित नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अस्पृशांचा वेगळा संघ
होण्याची शक्यता वाढली. पण राजकीय विभाजन टाळण्यात आले. |
-
कल्पनाविस्तार कल्पना विस्तार करणे म्हणजे दिलेल्या विषयावर लहानसा निबंधच लिहून दाखविणे होय. यासाठी काही गोष्टी लक्षात ठ...
-
लेखक परिचय : वामन कृष्णा चोरघडे (1914-1994) नागपूर येथे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले. मराठीतील श्रेष्ठ कथाकार. त्यांन...
-
कवी परिचय : गणेश हरी पाटील (1906-1989) बी.ए.,बी.टी.पर्यंत शिक्षण झाले होते. शाळेत शिक्षक, शिक्षणाधिकारी, ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य अश...