Friday, May 24, 2019

वातावरण

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


प्रश्न 1 - रिकाम्या जागा भरा.

1.  नैट्रोजनऑक्सिजन हे वातावरणातील दोन प्रमुख वायू आहेत.
2.  तपांबर (क्षोभावरण)  हा वातावरणातील सर्वात खालचा थर आहे.
3. समुद्र सपाटीला वातावरणातील हवेचा दाब सरासरी 1013.25 मिली बार इतका असतो.
4. पश्चिमी वाऱ्याना प्रतिव्यापारी  असेही म्हणतात.
5. हवेच्या शास्त्रीय अभ्यासाला हवेचे शास्त्र म्हणतात.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. वातावरण म्हणजे काय ?
उत्तर : पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वायू, धुलीकण, आणि बाष्प यांचा पातळ थर म्हणजे वातावरण होय.

2. वातावरणातील विविध स्तरांची नावे लिहा.
उत्तर : वातावरणात एकूण पाच स्तर आहेत.  1.तपांबर 2.स्थितांबर 3.मध्यांबर 4.उष्णांबर (आयनांबर) 5.बाह्यांबर

3. ‘ओझोनच्या थराचे महत्त्व कोणते ?
उत्तर : ओझोनच्या थरातील ओझोन वायू हा सूर्यापासून  येणारे अतिनील किरण (अल्ट्रा व्हायोलेट) शोषून घेतो आणि पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंचे रक्षण करतो. हा थर ढग आणि हवामानाच्या इतर घटकांपासून मुक्त असतो.

4. कमी भाराचा शांत पट्टा म्हणजे काय ? तो कोठे आढळतो ?
उत्तर : विषुववृत्तापासून दोन्ही बाजुला उत्तरेस व दक्षिणेस 50 अक्षांशापर्यंत या भागात वर्षभर लंबरूप सूर्य किरण पडतात. म्हणूनच हवा ही नेहमी उष्ण आणि उबदार असते. त्यामुळे वारे जास्त वाहात नाहीत म्हणून हा प्रदेश अत्यंत शांत असतो. त्यामुळे याला कमी भाराचा शांत पट्टा म्हणतात.

5. नियमित वाऱ्याचे प्रकार कोणकोणते ?
उत्तर : नियमित वाऱ्याचे तीन प्रकार आहेत 1.व्यापारी वारे 2.प्रतिव्यापारी वारे 3.धु्रवीय वारे.

6. स्थानिक वारे म्हणजे काय ? दोन उदाहरणे द्या.
उत्तर : स्थानिक तापमान आणि हवेच्या दाबातील बदलामुळे कमी वेळात जे वारे वेगवेगळ्या दिशांकडून वाहतात त्यांना स्थानिक वारे म्हणतात. हे वारे छोट्या भूप्रदेशापुरते मर्यादित असतात. व अल्पावधीचे वारे असतात. उदा. खारे वारे, मतलई वारे, पर्वतीय वारे, दरीय वारे उष्णवारे (लू), चिनूक (हिमभक्षक) फ्रॉन, मिस्ट्रल, सिरोक्को, ब्रिक, फिल्डर, ब्लिझार्ड.

7. ढगांचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते ?
उत्तर : ढगांना त्यांचे आकार, उंची आणि लक्षणांच्या आधारे चार प्रकारात विभागता येेते. 1.स्तरमेघ 2.पुंजमेघ 3.तंतूमेघ 4. निम्बसमेघ.

8. हवा आणि हवामान यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर : एखाद्या ठिकाणची ठराविक वेळेची अल्पकालीन वातावरणाची स्थिती म्हणजे हवा. हवा ही सतत बदलते. एखाद्या प्रदेशाचे अनेक दिवसांच्या किंवा दीर्घकालीन हवेतील अवस्थेचे सरासरी प्रमाण म्हणजे हवामान होय. उदा. विषुववृत्तीय हवामान, टंड्रा हवामान, वाळवंटी हवामान, भूमध्य हवामान वगैरे.

प्रश्न 3 - खालील पदांचा अर्थ सांगा.

1. आयनांबर : उष्णांबरच्या थरामध्ये आपण उंचावर जाऊ तसे तापमान वाढते म्हणून हवेच्या अणुंचे आयनामध्ये परिवर्तन होते म्हणूनच याला आयनांबर असेही म्हणतात.
2. नित्य तापमान घट : भूपृष्ठावरून जसे उंचीवर जावे तसे तापमान कमी कमी होत जाते याला नित्य तापमान घट म्हणतात. दर एक हजार मीटर उंचीवर (एक कि.मी.) 6.40 सेंटिग्रेड तापमान असते.
3. उष्ण कटिबंध : हा पृथ्वीच्या तापमानाचा एक विभाग आहे. हा सर्वात जास्त उष्णतेचा पट्टा. या विभागात वर्षभर सूर्यप्रकाश लंबरूपाने पडत असल्याने तापमान जास्त असते. हा विभाग 00 अक्षांश म्हणजेच विषुववृत्तापासून 231/2 उत्तर अक्षांशापर्यंत म्हणजेच कर्कवृत्तापर्यंत तसेच 231/2 दक्षिण अक्षांश म्हणजेच मकरवृत्तापर्यंत पसरला आहे.
4. अश्व अक्षांश : उप उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याचा एक भाग म्हणजे दक्षिण उप उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्टा (300 दक्षिण ते 400दक्षिण) हा प्रदेश अश्व अक्षांश या नावाने लोकप्रिय आहे.
5. प्रतिरोध पर्जन्य : हा पावसाचा एक प्रकार आहे. या पावसाला पर्वतीय पाऊस सुद्धा म्हणतात. जेव्हा बाष्पयुक्त वारे मार्गात येणाèया उंच पर्वतरांगामुळे अडवले जातात तेव्हा पर्वताला अनुसरून ते वरवर जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. डोंगर किंवा उंचवट्याच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून अशा प्रकारे पडणाèया पावसाला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात.
6. हवामान शास्त्र : हवामानाच्या शास्त्रीय अभ्यासाला हवामान शास्त्र म्हणतात.


या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024