Friday, May 24, 2019

जलावरण

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. भूखंड मंचाची सरासरी खोली 100 फॅदम इतकी असते.
2. मरियान (गर्ता) हे सागरी गर्त्यामधील सर्वात खोल ठिकाण आहे.
3. महासागरातील क्षारतेचे सरासरी प्रमाण 35/000 झझढ  इतके असते.
4. पौर्णिमेच्या दिवशी दिसून येणारी भरती म्हणजे उधाणाची भरती.
5. एक फॅदम म्हणजे  सहा  फूट.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. जलावरण म्हणजे काय ?
उत्तर : पृथ्वीच्या क्षेत्रफळापैकी सुमारे 71 टक्के भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. यालाच जलावरण म्हणतात.
2. महासागरी तळाच्या भूस्वरूपाचे चार प्रमुख भाग कोणते ?
उत्तर : महासागरी तळाच्या भूस्वरूपाचे चार प्रमुख भाग म्हणजे 1.भूखंड मंच (समुद्रबुड जमीन) 2.भूखंड उतारा 3.सागरी मैदान (अगाध मैदान) 4.सागरी डोह (गर्ता)
3. सागरी प्रवाह आणि भरती ओहोटी यातील फरक सांगा ?
उत्तर : समुद्राचे पाणी समुद्राच्या पृष्ठ भागावरून ठराविक दिशेने सतत वाहत असते त्याला समुद्र प्रवाह/सागरी प्रवाह असे म्हणतात. महासागराच्या किंवा समुद्राच्या पाण्याच्या पातळीत नियमितपणे होणारा चढ उतार म्हणजेच भरती ओहोटी होय. याची कारणे चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती, सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीची केंद्रोत्सारी प्रेरणा.
4. महासागरांचे संरक्षण आम्ही कसे केले पाहिजे ?
उत्तर : महासागरांचे संरक्षण करण्याच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत. 1. सागरातून कच्चे तेल बोटीतून नेण्याऐवजी नळ मार्गाचा वापर करावा. 2. अणु इंधनातील टाकावू पदार्थ समुद्रात टाकण्यावर नियंत्रण आणले पाहिजे. 3. किनारपट्टीच्या प्रदेशात असणाèया पेट्रो-केमिकल कारखान्यांनी समुद्र किनारा प्रदूषण मुक्त राहील यासाठी कठोर उपाय योजले पाहिजे. 4. कोणत्याही स्वरूपाच्या टाकावू वस्तू बंदर किंवा धक्क्यावर टाकल्या जातात यावर नियंत्रण हवे. 5. समुद्र काठावर लोह खनिज, मँगनीज यांचे साठे करण्यावर नियंत्रण आणले पाहिजे 6. किनारपट्टीवरील वाळूचे काठ विविध रितीने नष्ट होत आहेत. त्यांचे संरक्षण केले पाहिजे.
5. उधाणाची भरती आणि भांग भरती यामधील फरक लिहा.
उत्तर : पृथ्वी, सूर्य आणि चंद्र हे जेव्हा एकाच सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा ही उधाणाची भरती येते. उदा. अमावास्या, पौर्णिमा, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. या दिवशी उधाणाची भरती येते.
उधाण भरतीच्या नंतर 15 दिवसांनी म्हणजेच कृष्ण पक्ष व शुक्ल पक्षातल्या अष्टमीच्या दिवशी चंद्र व सूर्य यांनी पृथ्वीशी काटकोन केलेला असतो. यामुळे सूर्य व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीत समतोल राहून भरतीचे प्रमाण अत्यंत कमी असते याला भांग भरती म्हणतात. यामध्ये ओहोटीचे प्रमाणसुद्धा कमी असते.


या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




प्रश्न 3 - जोड्या जुळवा (उत्तरासह)

                                                     
            1. फॅदम                        महासागराची खोली
            2. ओयॅसिवो                 शीतप्रवाह
            3. गल्फ स्ट्रिम               अमेरिकेचा पूर्व किनारा
            4. सागरी पर्वत              खोल सागरी मैदान       
            5. अगुल्हास प्रवाह         हिंदी महासागर

प्रश्न 3 - खालील पदांचा अर्थ लिहा.

1. भूखंड मंच : महासागर किंवा समुद्राच्या किनाèयाजवळ असलेल्या समुद्रात बुडालेल्या उथळ भागास भूखंड मंच म्हणतात. याच्या एकाबाजूला समुद्र किनारा तर दुसèया बाजूस भूखंड उताराचा भाग असतो.
2. क्षारता : महासागर किंवा समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या क्षारांच्या प्रमाणास क्षारत किंवा लवणता म्हणतात.
3. उष्ण आणि शीतप्रवाह : उष्ण प्रवाह हे विषुववृत्तीय प्रदेशात उगम पावून ध्रुवप्रदेशाकडे वाहतात.
शीतप्रवाह हे शीतकटिबंधाकडून विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहतात. हे दक्षिण पॅसिफिक सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात.
4. जास्त भरती आणि कमी भरती : महासागर किंवा समुद्राचे पाणी दर 12 तास 26 मिनिटांनी किनाèयाच्या दिशेने चढते किंवा कमाल उंची गाठते यालाच मोठी भरती किंवा प्रवाहाची भरती म्हणतात.
याच प्रकारे दर 12 तास 26 मिनिटांनी एकदा भरतीच्या प्रमाणाइतकीच पाण्याची पातळी खालीउतरते म्हणजेच सागराचे पाणी किनाèयापासून दूर जाताना दिसते यालाच ओहोटी म्हणतात.
5. बेंग्वुला प्रवाह : अटलांटिक महासागरातील दक्षिण अटलांटिक सागरी प्रवाहात दोन प्रवाह दिसून येतात. 1. उष्ण प्रवाह 2.शीत प्रवाह. यातील शीत प्रवाह म्हणजे बेंग्वुला प्रवाह होय.
6. भरती ओहोटी : महासागराच्या किंवा समुद्राच्या पाण्याच्या पातळीत नियमितपणे होणारा चढउतार म्हणजेच भरती ओहोटी होय. याची मुख्य कारणे म्हणजे  चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती, सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीची केंद्रोत्सारी प्रेरणा.
--------------------------------------------------------------------------------------------------


या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा




1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024