प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. नंदी हे थंड
हवेचे ठिकाण ............... या जिल्ह्यात आहे.
2. अब्बी धबधबा
............... या शहराजवळ आहे.
3. कर्नाटकचा
नायगारा असे ............... धबधब्याला म्हणतात.
4. गोकर्णजवळ
............... हा बीच आहे.
5. राजवाड्यांचे शहर
असे ............... ला म्हणतात.
उत्तरे : 1. चिक्कबळ्ळापूर 2. मडकेरी 3. गोकाक 4. ओम 5. म्हैसूर
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. प्रवास
करण्यामागचे विविध उद्देश कोणते ?
उत्तर : 1. देश पहा आणि कोश वाचा या अर्थाची कन्नड भाषेमध्ये एक
म्हण आहे. लोक आपल्या व्यापारासाठी, कुतुहलापोटी, धार्मिक कृत्यांसाठी, मन:शांतीसाठी, विहारासाठी, सुंदर नयनरम्य ठिकाणे पाहण्यासाठी, आनंद
मिळविण्यासाठी, आरोग्यवृद्धीसाठी प्रवास करतात. 2. आधुनिक जगात प्रवास करणे ही गोष्ट मानवी जीवनाचा
अविभाज्य भाग बनली आहे. प्रवासामुळे आपले राज्य, तेथील संस्कृती, नागरिकत्व, राहणीमानाची पद्धत हे समजून घेण्यास मदत होते. असे प्रवास करण्यामागचे विविध उद्देश असतात.
2. पर्यटनस्थळी
कोणकोणत्या मूलभूत सोयी आवश्यक आहेत ?
उत्तर : पर्यटनस्थळी यात्री निवास, प्रवासी गृह, उपहार गृह आदी
गोष्टी आवश्यक आहेत.
3. कुद्रेमुख येथील
थंड हवेच्या ठिकाणाबद्दल माहिती लिहा ?
उत्तर : कर्नाटकात अनेक थंड हवेची ठिकाणे दिसून
येतात. त्यापैकी चिक्कमंगळूर जिल्ह्यातील कुद्रेमुख हे मुख्य थंड हवेचे ठिकाण आहे.
त्याच्या भोवती हिरव्या वनश्रीने नटलेली घनदाट अरण्ये, टेकड्या, कॉफीचे मळे, धबधबे असल्यामुळे
हे रमणीय ठिकाण बनले आहे.
4. कर्नाटकातील
अभयारण्यांची नावे लिहा.
उत्तर : जंगली प्राण्यांना त्यांच्याच नैसर्गिक मूल
स्थानामध्ये संरक्षणासाठी 18 वन्यजीव धाम शोधून काढले आहेत. त्यामधील प्रमुख
म्हणजे मुत्रोडी, बंडीपूर, नागरहोळे, दांडेली, भद्रा वन्य जीवधाम, रंगनतिट्टू पक्षीधाम, काक्करे बेळ्ळूर, मंडगद्दे, गुडवी पक्षीधाम वगैरे.
5. कर्नाटकातील
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची नावे सांगा.
उत्तर : कर्नाटकातील राज्यकर्ते कदंब, होयसळ, चालुक्य, विजयनगरचे राजे
यांनी आपल्या स्मृती शिल्पसौंदर्याच्या सुंदर स्थापत्य कलेच्या रूपात मागे ठेवल्या
आहेत. त्याम्हणजे हंपी, बेलूर, हळेबीड, सोमनाथपूर, बदामी, ऐहोळे, विजापूरचा गोलघुमट, लक्कुंडी, बनवासी, बसराळू, बळ्ळीगाळे, म्हैसूर, श्रीरंगपट्टण, विजापूर वगैरे यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
ख्याती लाभली आहे.
प्रश्न 3 - जोड्या जुळवा
अ ब
1. बिळगिरी रंगन बेट्ट अ)
उत्तर कन्नड जिल्हा
2. जोगी टेकड्या ब) चामराज
नगर
3. याण क)
पक्षी धाम
4. अणशी ड)
चित्रदुर्ग
5. रंगनतिट्टू इ)
राष्ट्रीय उद्यान
फ) मयूरधाम
उत्तरे : 1. चामराजनगर 2. चित्रदुर्ग 3. उत्तर कन्नड जिल्हा 4. राष्ट्रीय उद्यान 5. पक्षीधाम
--------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment