Friday, May 24, 2019

व्यापार आणि उद्योगधंदे


प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. इंट्रेपॉट व्यापाराचे उत्तम उदाहरण सिंगापूर हे आहे.
2. कुटीरोद्योग हे विशेषता ग्रामीण भागात केंद्रीत झाले आहेत.
3. रसायनांचे उत्पादन हे लघुउद्योग प्रकारच्या उद्योगधंद्यात केले जाते.
4. धंद्याचा एकमेव उद्देश म्हणजे उपजीविकेसाठी योग्य नफा मिळविणे.
5. वस्तुंचा दर्जा राखण्यासाठी भारतीय मानक संस्था या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे दोन चार वाक्यात लिहा.

1. फिरत्या दुकानांचे प्रकार सांगा ?
उत्तर : फिरत्या दुकानांचे प्रकार 1.फेरीवाले 2.गाडीवाले 3.रस्त्यांच्या कडेला विक्री करणारे 4.बाजारात विक्री करणारे.
2. घाऊक व्यापारी म्हणजे काय ?
उत्तर : जे व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाèयांना छोट्या प्रमाणात प्रमाणातील मालाची विक्री करतात. विशेषत: एक किंवा दोन प्रकारच्या वस्तूंशी संबंधित असतात. ते व्यापारी किरकोळ व्यापाèयांना त्यांच्या गरजेनुसार थोडा माल तोही उधारीच्या सुविधेसह पुरवितात. त्यांच्या मालाची जाहिरात करतात. ते जास्त कमाई किंवा फायद्याचा विचार करीत नाहीत. उत्पादकांनाही बाजारातील मागणी किंवा जाहिरात गोष्टी ते पाहतात. गोदामांची सुविधा पुरवितात अशा व्यापाèयांना घाऊक व्यापारी म्हणतात.
3. विदेशी व्यापाराचे तीन प्रकार सांगा ?
उत्तर : विदेशी व्यापाराचे तीन प्रकार : 1. आयात 2.निर्यात 3.इंट्रेपोट
4. कुटीरोद्योगातून आणि लघुउद्योगातून उत्पादित केल्या जाणाऱ्या  महत्त्वाच्या वस्तू कोणत्या ?
उत्तर : कुटीरोद्योगातून उत्पादित केल्या जाणाèया वस्तू : चटया किंवा बुट्ट्या विणणे, जमखाने विणणे, कुंभाराने तयार केलेल्या वस्तू, कांबळी तयार करणे, दगडी कलाकुसार व सुतार आणि लोहाराने तयार केलेल्या वस्तू.
लघुउद्योगातून उत्पादित केल्या जाणाèया वस्तू : रसायन उद्योग, अभियांत्रिकी उपकरणे, चप्पल, बूट तयार करणे, सायकल, पंखे, रेडिओ, शिवणयंत्रे, साबण, तयार कपडे इ. चे उत्पादन केले जाते.
5. कोणत्या संघटना व्यापारातील जागेची आणि नुकसानीची अडचण भरून काढण्यास मदत करतात ?
उत्तर : व्यापारातील जागेची अडचण भरून काढण्यास आपणास वाहतूकीची सेवा उपयोगी पडते. यामुळे वेळेचीही यामुळे बचत होते. रस्ते वाहतूक, रेल्वे मार्ग, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक ही वाहतुकीची काही माध्यमे आहेत. जी उत्पादकाकडून माल व्यापाèयांकडे आणि व्यापाèयांकडून ग्राहकास पोहोचविण्यात सहाय्यक ठरतात.
हा माल गोदामात साठवून ठेवला जातो त्यावेळी नुकसानीची अथवा माल खराब होण्याची शक्यता असते यावेळी विमा कंपन्या जबाबदारी घेतात.  आग किंवा पाण्यामुळे होणाèया नुकसानीची जबाबदारी विमा कंपन्या घेऊन व्यापाèयांना सहाय्य करतात.
6. व्यापारात अवाजवी फायदा मिळविण्यासाठी व्यापारी कोणकोणत्या असामाजिक पद्धतींचा अवलंब करतात ?
उत्तर : व्यापारात अवाजवी फायदा मिळविण्यासाठी काही व्यापारी भेसळ, दरवाढ किंवा अवास्तव किमती, अयोग्य वजन आणि मापांचा वापर, मालाचा साठा करून कृत्रीम टंचाई निर्माण करणे आणि काळ्या बाजारात विकणे आदी असामाजिक पद्धतीचा अवलंब करतात.
7. सरकारने व्यापारातील असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी कोणती पाऊले उचलली आहेत ?
उत्तर : सरकारने व्यापारातील असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी काही सुविधा पुरविल्या आहेत त्या म्हणजे 1. भारतीय मानक संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था प्रत्येक वस्तूंच्या वेष्टनावर प्रमाण, उत्पादीत तारीख, उपभोग मर्यादा दिनांक, वस्तूंचे मूल्य इ. सक्तीने छापावयास लावते. 2.आवश्यक वस्तू पुरविणारी शिधा वाटप दुकाने (रेशन दुकाने) सुरू केली आहेत. 3.आवश्यक वस्तूंचा दर्जा राखण्यासाठी सरकारने आय.एस.आय व अ‍ॅगमार्कची सक्ती केली आहे. 4.सरकारने जनता बाजार, ग्राहक सहकारी संस्था इ. सुरू केल्या आहेत ज्यामधून लोकांना  अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. 5. या गोष्टीला आळा घालण्यासाठी कडक कायदाही अंमलात आणला आहे. 6. सार्वजनिक वितरण व्यवस्थाही सुरू केलेली आहे.

प्रश्न 3 - खालील प्रश्नांची उत्तर आठ ते दहा वाक्यात लिहा.

1. व्यापाराची आर्थिक उद्दिष्ट्ये कोणती ?
उत्तर : व्यापाराचे उद्दिष्ट म्हणजे फक्त नफा मिळविणे असे नव्हेतर व्यवसाय म्हणजे उत्पादनाचा खर्च भागवून व्यवस्थित जीवन जगण्यासाठी, उपजीविकेसाठी योग्य नफा मिळविणे. 2. व्यापार वस्तू आणि सेवा पुरवितो आणि ग्राहक निर्माण करतो. 3.व्यवसाय उपलब्ध साधनांतून वस्तू उत्पादित करून ग्राहकांच्या गरजा पुरवितात. 4.व्यवसायातून अशा वस्तू उत्पादित केल्या जातात. ज्या वेळोवेळी गरजेनुसार कालानुरूप बदलतात. त्यासाठी व्यवसायात उत्पादनासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जाते. 5.जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकाला उत्पादनाच्या क्षेत्रात येणाèया नव्या उत्पादनाविषयी माहिती दिली जाते.
2. व्यापाराची सामाजिक उद्दिष्ट्ये कोणती ?
उत्तर : व्यापाराची सामाजिक उद्दिष्ट्ये : 1.व्यवसायाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी सहाय्यभूत वस्तूंचे उत्पादन केले जाते. 2.व्यवसायामुळे रोजगार उपलब्ध होऊन, योग्य वेतन प्राप्त करून त्या त्या क्षेत्रातील नोकरदार वर्गास आपले राहणीमान उंचावण्यास मदत होते. 3.दर, कर किंवा जकातीच्या माध्यमातून व्यवसाय देशाच्या उत्पन्नवाढीस भरीव मदत करतात. 4.व्यवसायामुळे सामाजिक कल्याण साधले जाते. उदा. शाळा, कॉलेजीस, हॉस्पिटल्स आणि सार्वजनिक उद्यानांची निर्मिती आणि देखभाल केली जाते.
3. किरकोळ व्यापाऱ्यांकडून कोणत्या सेवा पुरविल्या जातात ?
उत्तर : 1.किरकोळ व्यापार ज्या ठिकाणी नागरिक राहतात त्या ठिकाणी चालतो. 2.किरकोळ  व्यापारी वेगवेगळ्या उत्पादकांनी तयार केलेला वेगवेगळा माल ग्राहकांना पुरवितात. 3.ते ग्राहकांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा करतात 4.व्यापारात येणाèया नुकसानीची जबाबदारी देखील घेतात. 5.ते मालाचा दर्जा वाढवून, ग्राहकांच्या आवडी निवडीनुसार पुरवठा करतात.
4. किरकोळ व्यापारी कोण ? प्रत्येकाबद्दल एक ते दोन वाक्यात माहिती लिहा.
उत्तर : किरकोळ व्यापाèयांची दोन प्रमुख गटात विभागणी केलेली आहे. 1.कायमची दुकाने 2.फेरीवाले.
1.कायमची दुकाने : ही एका निश्चित ठिकाणी सुरू करून मालाची विक्री करतात.
2. फेरीवाले : यांच्याकडे विक्री करण्यासाठी निश्चित जागा नसते. यांच्यामध्ये फेरीवाले, गाडीवाले, रस्त्यांच्या कडेला विक्री करणारे, बाजारात विक्री करणारे. इ. समावेश होतो.
अ) फेरीवाले : हे माल डोक्यावरून वाहून नेऊन दारोदारी विक्री करतात. ते फक्त एक किंवा दोन प्रकारच्या वस्तू विकतात. उदा. भाजीवाले, फळे, फुले इ.
आ) गाडीवाले : चाकांच्या गाडीवर माल ठेवून ग्राहकांच्या घरोघरी वस्तू विकतात. ते एक किंवा अनेक प्रकारच्या वस्तू विकतात.
इ) रस्त्यावरील किंवा फूटपाथवरील विक्रेते : ते आपल्या मालाची विक्री वर्दळीच्या रस्त्यावर किंवा फूटपाथवर करतात.
ई) बाजारातील विक्रेते : मोठ्या खेड्यात किंवा शहरातून आठवडी बाजार भरतो. वेगवेगळे विक्रेते या वस्तू बाजारात विकतात. या आठवडी बाजारांचे वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूच्या खेड्यातील लोक आपण उत्पादित केलेल्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू विकतात. उदा. भाजीपाला, अंडी, लोणी, शेतकीअवजारे, चादरी, कांबळी इ.  या वस्तू विकून आपल्या गरजेच्या वस्तू ते खरेदी करतात.
5. उद्योगधंद्याचे दोन प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर : उद्योगधंद्याचे दोन प्रकार आहेत. 1. प्राथमिक उद्योगधंदे 2.दुय्यम उद्योगधंदे.
1. प्राथमिक उद्योगधंद्यामध्ये नैसर्गिक साधनांचा उपयोग करून वस्तूंचे उत्पादन केले जाते. उदा. शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, खाणउद्योग. याचे परत दोन भागात वर्गीकरण होते. 1.जैविक उद्योगधंदे (यामध्ये वेगवेगळी पिके, वनस्पती आणि प्राण्यांचे पुनरुत्पादन केले जाते. ते देशाचे उत्पादन वाढवितात. उदा. बागायत, पशुपालन, कुक्कुटपालन.)2.खाण उद्योग (हे उद्योग कच्च्या मालाचे उत्पादन आणि खाणीतून कच्ची खनिजे काढण्याशी संबंधित आहेत. उदा.खाणीतून खनिजे काढणे व तेलविहिरी खोदणे.
2. दुय्यम उद्योगधंदे हे कामगारांच्यावर आधारित उद्योगधंदे असून ते दोन विभागात विभागले आहे. 1.उत्पादक उद्योगधंदे (हे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याशी निगडित आहेत. ग्राहकाला सुबक मालाचा पुरवठा ते करतात. उदा. कच्च्या लोखंडापासून स्टील, उसापासून साखर इ.) 2.सहाय्यक उद्योगधंदे (हे उद्योगधंदे रस्ते, कालवे, पूल इ. बांधकामाशी संबंधित असतात. वाहतूक आणि दळणवळणासारख्या आर्थिक प्रक्रियेला हे उद्योग जलद मदत पुरवितात.)
6. विदेशी व्यापाराचे महत्त्व काय ?
उत्तर : जगातील कोणताही देश सर्वच बाबतीत स्वावलंबी नाही काही देश नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहेत. या साधनांचा वापर करून ते अनेक वस्तुंची गरजेपुरते आणि गरजेपेक्षाही जास्त उत्पादन करतात. या प्रमाणे काही देशात नैसर्गिक साधन संपत्तीचा तुटवडा आहे. त्यामुळे ते त्यांच्या गरजांसाठी दुसèया देशावर अवलंबून आहेत. यामुळेच विदेशी व्यापार गरजेचा ठरतो. विदेशी व्यापारामुळे देशादेशात मैत्रीचे संबंध निर्माण होण्यास मदत होते.
-------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024