Friday, May 24, 2019

व्यवहार अध्ययनाचे घटक


प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. ग्राहकाला तांत्रिक, वैशिष्ट्यपूर्ण आणि वैयक्तिक सेवा देते त्याला व्यवसाय म्हणतात.
2. प्राचीन काळात वस्तूंच्या होणाèया देवाणघेवाणीला वस्तू विनिमय पद्धत (बार्टर सिस्टीम) असे म्हणतात.
3. कागदी चलनाची जबाबदारी रिझर्व्ह बँकची असते.
4. खेडे आणि जमातीचा उदय कृषीविषयक या टप्प्यात झाला.
5.  नव्या जलमार्गाच्या (अथवा भौगोलिक शोध) शोधामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीस लागला.
6. व्यापार आणि वाणिज्यापासून मिळणाऱ्या  कर आणि जकाती  मुळे देशाच्या आर्थिक विकासास मदत होते.

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.

1. आर्थिक व्यवहार म्हणजे काय ? 
उत्तर : मनुष्याच्या गरजा या अमर्याद आहेत, या गरजा भागविण्यासाठी आपल्याला वस्तू आणि सेवांची गरज आहे. वस्तू, शेती आणि उद्योगधंद्यातून उत्पादित केल्या जातात. माणसांना अनेक सेवांची देखील गरज असते. या सेवा आणि वस्तू ग्राहकांच्यात वाटल्या जातात. वस्तुंचे उत्पादन व सेवांची देवाणघेवाण या क्रिया आर्थिक क्रियांशी निगडित आहेत. यालाच आर्थिक व्यवहार म्हणतात.
2. व्यापार आणि वाणिज्य याचा अर्थ लिहा ?
उत्तर : वस्तूंची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय.  तर वाणिज्य म्हणजे व्यापार आणि व्यापारासाठी लागणाèया इतर सहाय्यक गोष्टी अंतर्भूत होतात.
3. वस्तू विनियम म्हणजे काय ?
उत्तर : कामाच्या विभागणीमुळे वस्तुचे उत्पादन कमी वेळेत होणे शक्य झाले. उत्पादित वस्तुंची देवाण घेवाण वाढली. वस्तूच्या बदल्यात वस्तू किंवा इतर गोष्टींची अदलाबदल म्हणजेच वस्तू विनिमय म्हणून ओळखली जाऊ लागली.
4. व्यवसाय म्हणजे काय ?
उत्तर : व्यवसाय हा विशिष्ट तांत्रिक आणि वैयक्तिक सेवांशी निगडित असतो. उदा. वकील, डॉक्टर्स, चार्टर्ड अकौंटंटस इ.
5. व्यापारासाठी सहाय्यक घटकांची नावे लिहा.
उत्तर : वस्तूंची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. या व्यापारासाठी सहाय्यक ठरणारे घटक म्हणजे वाहतूक, बँका, कोठारे, जाहिरातदार, विमा इ.
6. समाजातील वेगवेगळे कारागीर कोणते ?
उत्तर : सुतार, लोहार, विणकर, गवंडी इ. हे समाजातील कारागीर आहेत.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. उत्पादन आणि देवाण घेवाण यांची आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका आहे कशी ?
उत्तर : वस्तू आणि सेवांच्या देवाण घेवाणीला आपण विनिमय असे म्हणतो.  विनिमय हा उत्पादकांच्या आणि ग्राहकांच्यातील दुवा आहे. उत्पादित झालेला माल ठिकठिकाणच्या ग्राहकापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. उत्पादना दरम्यान उत्पादक बाजारभावाची माहिती वाहतूक, वस्तूंचा साठा, योग्य दर आणि जाहिरात इ. गोष्टी लक्षात घेऊन उत्पादन करतात. या सर्व गोष्टी विनिमयात अंतर्भूत होतात. आज चलन (पैसा) हे वस्तूंच्या आणि सेवांच्या देवाण घेवाणीसाठी उपलब्ध असलेले माध्यम आहे. विनिमय हा धंद्याचा पाया आहे .
2. वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार कोणते ?
उत्तर : आर्थिक व्यवहार तीन प्रकारचे आहेत. 1.धंदा 2.व्यवसाय 3.नोकरी
1. धंदा हा सेवा आणि वस्तूंच्या उत्पादन आणि देवाण घेवाणीशी निगडित असतो. 2. व्यवसाय हा विशिष्ट तांत्रिक आणि वैयक्तिक सेवांशी निगडित असतो. उदा. वकील, डॉक्टर्स, चार्टर्ड अकौंटंट इ. 3.उद्योगदात्यांकडून वेतन अथवा मजुरीवर केले जाणारे काम म्हणजे नोकरी होय. उदा.शेतमजूर, औद्योगिक आस्थापनातील कामगार वर्ग इ.
3. वस्तू विनिमय पद्धतीत येणाऱ्या  अडचणी कोणत्या ? या समस्या पैशाने कशा सोडविता आल्या.
उत्तर : वस्तू विनिमय पद्धतीत येणाèया अडचणी म्हणजे 1.समान गरजांचा अभाव : अनुरूप गरजेनुसार नेहमीच वस्तूंची देवाण घेवाण करता येईल असे नाही. उदा. समूहाकडे भात पीक आहे आणि त्याला गहू पाहिजे बीसमूहाकडे गहू आहे आणि त्यांना ज्वारी पाहिजे म्हणून बी समूह भात घेण्यास तयार नाही. 2.सामान्य माप किंवा किमतीची अनिश्चितता :  एका वस्तूशी तुलनात्मक किंमत किंवा प्रमाण ठरविणे अवघड जाते. उदा. एका गायीच्या  बदल्यात किती मेंढ्या किंवा एक माप गव्हाच्या बदल्यात किती मापे ज्वारी इ.  3.भाग करताना येणाèया अडचणी : या पद्धतीत प्राण्यांना विभागित करणे अवघड जाते. उदा. गाय किती शेळ्यांच्या बदल्यात देऊ शकतो.  4. वस्तूंचा साठा आणि वाहतुकीत येणाèया अडचणी : एका ठिकाणाहून दुसरीकडे वस्तूंची  वाहतूक करणे अवघड जाते. काही वस्तू फार काळ जतन करणे कठीण जाते.
या अडचणीवर मात करण्यासाठी चलन म्हणून अनेक वस्तूंची अदलाबदल केली गेली. नंतर चलन म्हणून धातुचा उपयोग केला गेला परंतु यामध्येही अडथळे आल्याने कागदी नोटा वापरात येऊ लागल्या . कागदी पैसा देशाच्या रिझर्व्ह बँकेतून वितरित केला जातो. ज्याला सरकारची अनुमती असते. अलीकडच्या काळात चेक, ड्राफ्ट, बिल, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड  इ. माध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. त
4. आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या पायऱ्या कोणत्या ? त्यापैकी एका पायरीचे विश्लेषण करा.
उत्तर : आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या पायèया पुढीलप्रमाणे आहेत. 1.शिकार आणि मासेमारी 2.पशुपालन 3.कृषी व्यवसाय 4. हस्तोद्योग 5. वस्तू विनिमय पद्धत 6. अर्थव्यवस्था (पैशाच्या स्वरूपातील व्यवहार) 7. नगरातील अर्थव्यवस्था 8. आंतरराष्ट्रीय व्यापार
1.शिकार आणि मासेमारी : नागरिकतेची ही सुरुवातीची अवस्था होय. या काळात मानव भटका होता. तो टोळ्यांमधून अन्नाच्या शोधार्थ एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी भटकत असे. अन्नासाठी प्राण्यांची शिकार आणि मासेमारी केली जात असे. फळे, मुळे आणि कंदमुळे गोळा केली जात असत. ते झाडाच्या ढोलीत किंवा गुहेत रहात असत. पाने किंवा प्राण्यांच्या कातडीचा उपयोग ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी केला जात असे. या काळात कोणतीही आर्थिक क्रिया दिसून येत नाही.

No comments:

Post a Comment

भारतातील माती