रुपया असा येतो रुपया असा जातो |
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. सरकार सार्वजनिक उत्पन्नाची व्यवस्था ........... द्वारे करते.2. अंदाज पत्रकामध्ये सरकारचे उत्पन्न खचपिक्षा जास्त असल्यास त्याला ........... अंदाजपत्रक म्हणतात.
3. ........... हे लोकसभेत केंद्र सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक सादर करतात.
4. जीएसटी ........... या वर्षापासून अंमलात आले.
उत्तरे : 1. महसूला 2. शिल्लकी 3. अर्थमंत्री 4. 1 जुलै 2017
2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा:
1. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय?उत्तर : सरकारी उपक्रम राबविण्यासाठी वापरले जाणारे उत्पन्न म्हणजेच ‘सार्वजनिक उत्पन्न’ होय.
2. अंदाजपत्रक म्हणजे काय?
उत्तर :‘सरकारच्या एका वर्षातील एकूण उत्पन्न व खर्चाच्या तपशीलालाच अंदाजपत्रक असे म्हणतात.’
3. तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय?
उत्तर : एकूण उत्पन्न व एकूण खर्च यांच्यातील फरक म्हणजे ‘तुटीचे अंदाजपत्रक’ होय. त्याचे सूत्र खालील प्रमाणे
तुटीचे अंदाजपत्रक = एकूण उत्पन्न - एकूण खर्च
4. प्रत्यक्ष करांची नावे लिहा.
उत्तर : प्रत्यक्ष कराची उदाहरणे म्हणजे -उत्पन्नाचा कर, संपत्तीचा कर, स्टँप ड्यूटी, कंपनी कर वगैरे.
5. आर्थिक तूट मोजण्याचे सूत्र लिहा.
उत्तर : आर्थिक तूट = (महसूली उत्पन्न + कर्जेतर भांडवली उत्पन्न) - एकूण खर्च
3. खालील प्रश्नांची उत्तरे 5-6 वाक्यात लिहा.
1. सार्वजनिक खर्च वाढीची कारणे स्पष्ट करा.उत्तर : 1. 20 व्या शतकातील कल्याणकारी राज्याच्या उदयाने सरकारचे कार्यक्षेत्र व भूमिका यांचा विस्तार होऊन सार्वजनिक खर्च वाढला आहे. 2. भारतात केंद्र व राज्यसरकार आपापल्या खर्चाच्या बाबी स्वतंत्रपणे सांभाळतात. 3. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, तसेच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, सार्वजनिक खर्च करावा लागतो. सरकार गुंतवणुकीसाठी पोषक वातावरणाची निर्मिती करते. 4. सरकार लोकांना बचत, गुंतवणूक आणि नवीन उपक्रम राबविण्यास सतत प्रोत्साहन देते. 5. आर्थिक विकासाची गती वाढवून आर्थिक स्थैर्याची हमी देते.
2. सरकार कोणकोणत्या प्रकारचे कर आकारते?
उत्तर : केंद्र सरकार दोन प्रकारचे कर आकारते
अ) प्रत्यक्षकर आ) अप्रत्यक्षकर
अ) प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्स) :
ज्या व्यक्तीवर कर आकारलेला आहे, त्यानेच कर भरला तर त्याला ‘प्रत्यक्षकर’ असे म्हणतात. हा कर हस्तांतरित करता येत नाही. उदा.-उत्पन्नाचा कर, संपत्तीचा कर, स्टँप ड्यूटी, कंपनी कर वगैरे.
आ) अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट टॅक्स) :
सरकारने आकारलेला कर दुसèयांना हस्तांतरित करता येत असेल तर त्याला ‘अप्रत्यक्ष कर’ असे म्हणतात. सामान्यतः अप्रत्यक्षकर वस्तू व सेवांवर आकारले जातात. उदा. सरकार वस्तू व सेवांची निर्मिती करताना उत्पादकांवर कर आकारते. उत्पादक हा कर व्यापाèयांवर आकारतात. व्यापारी हा कर ग्राहकांवर आकारतात. म्हणजे सरकारने उत्पादकांवर कर आकारला, परंतु तो कर ग्राहकांकडूनच भरला जातो.
3. केंद्र सरकारच्या करेतर उत्पन्नाचे स्त्रोत कोणते?
उत्तर : करेतर उत्पन्नाचे स्त्रोत -
1) भारतीय रिझर्व बँकेकडून मिळणारा निव्वळ नफा 2) भारतीय रेल्वेकडून मिळणारा निव्वळनफा 3) पोस्ट व दूरसंचार खात्याकडून मिळणारा महसूल 4) सार्वजनिक उद्योग क्षेत्रांकडून मिळणारा महसूल
5) टांकसाळीद्वारे मिळणारा महसूल 6) विविध प्रकारची फी व दंडाची वसूल केलेली रक्कम
4. तूट म्हणजे काय? तुटीचे चार प्रकार लिहा.
उत्तर : उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर त्याला तूट असे म्हणतात.
भारतात तुटीचे चार प्रकार आहेत. ते खालील प्रमाणे
1) आर्थिक तूट 2) प्राथमिक तूट 3) महसूली तूट 4) तुटीचे अंदाजपत्रक.
5. सार्वजनिक खर्चाचे प्रमुख उद्देश कोणते ?
उत्तर : खालील प्रमाणे 1) आर्थिक विकासाची गती वाढविणे 2) उद्योग, व्यवसाय व व्यापार यांना प्रोत्साहन देणे. 3) शेती व ग्रामीण विकासासाठी प्रोत्साहन देणे. 4) प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे 5) सामाजिक, आर्थिक, मूलभूत सुविधा पुरविणे (उदा रस्ते, रेल्वे, वीज इ) 6) सामूहिक गरजा भागविणे व लोककल्याण साधणे 7) सर्वाना रोजगार उपलब्ध करून देणे
6. ‘वैयक्तिकअर्थव्यवस्था’ म्हणजे काय ?
उत्तर : उत्पन्न, खर्च व कर्ज यात समन्वय साधण्याच्या या व्यवस्थेला ‘वैयक्तिक अर्थव्यवस्था’ असे म्हणतात.
7. सार्वजनिक अर्थव्यवस्था’ म्हणजे काय ?
उत्तर : सरकारचे उत्पन्न, खर्च व कर्ज यांच्यात समन्वय साधण्याच्या व्यवस्थेला ‘सार्वजनिक अर्थ व्यवस्था’ असे म्हणतात,
8. डॉल्टन यांच्यामते सार्वजनिक अर्थव्यवस्था’ म्हणजे काय ?
उत्तर : डॉल्टन यांच्या मते सरकारचे उत्पन्न व खर्च आणि त्यातील समन्वय साधण्याची प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक अर्थव्यवस्था’ होय.
9. ‘आर्थिक-धोरण’ असे कशाला म्हणतात ?
उत्तर : आर्थिक विकास व आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी सरकार आपले उत्पन्न व कर्जाशी संबंधित काही धोरणांचा अवलंब करते. या नीतीलाच ‘आर्थिक-धोरण’ असे म्हणतात.
10. ‘वार्षिक अंदाजपत्रक’ म्हणजे काय ?
उत्तर : उत्पन्न व खर्च यांच्यामधील ताळमेळाला ‘वार्षिक अंदाजपत्रक’ म्हणतात.
11. भारतातील आर्थिक वर्षाचा कालावधी कोणता ?
उत्तर : भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होऊन 31 मार्चला संपते.
12. अंदाजपत्रक सर्वप्रथम कोठे मंजूर करून घ्यावे लागते ?
उत्तर : लोकसभेमध्ये.
13. अंदाजपत्रक म्हणजे काय ?
उत्तर : ‘सरकारच्या एका वर्षातील एकूण उत्पन्न व खर्चाच्या तपशीलालाच अंदाजपत्रक असे म्हणतात.’
14. देशाचे अंदाजपत्रक कोण सादर करते ?
उत्तर : केंद्रीय अर्थमंत्री
15. अंदाजपत्रकाच प्रकार कोणते ?
उत्तर : 1.‘शिल्लकी अंदाजपत्रक’ 2.‘तुटीचे अंदाजपत्रक’ 3. ‘संतुलित अंदाजपत्रक’
16. भारतासारख्या विकसनशील देशात कोणते अंदाजपत्रक सादर केले जाते ?
उत्तर : भारतासारख्या विकसनशील देशात विकासासाठी तुटीचे अंदाजपत्रक सादर केले जाते.
17. सार्वजनिक खर्च म्हणजे काय ?
उत्तर : सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारने केलेला खर्च होय.
18. सार्वजनिक उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होतो ?
उत्तर : आर्थिक उपक्रम राबविल्यामुळे जनतेकडून मिळणारी कर रूपातील रक्कम, सरकारी उद्योगधंद्यामधून व जनकल्याण निधी यातून मिळणारी रक्कम या सर्वांचा समावेश सार्वजनिक उत्पन्नामध्ये होतो.
प्रश्नांची संख्या जास्त वाटत असेल तर शेवटचे कितीही प्रश्न काढून टाकू शकता....
No comments:
Post a Comment