Friday, May 24, 2019

भारताची भौगालिक वैशिष्ट्ये व प्राचीन भारत


प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. भौगोलिक दृष्टया भारत द्वीपकल्प आहे.
2. राखेचे अंश कर्नुल या गुहेत आढळले आहेत.
3. मध्य पाषाण युगातील शस्त्रांना नाजूक दगडी शस्त्रे म्हटले जात असे.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर : भारत हे द्वीपकल्प असून त्याच्या तिन्ही बाजूला पाणी व एका बाजूला भूभाग आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा, गंगेची मैदाने, दख्खनचे पठार आणि किनारपट्ट्यांचा समावेश आहे.
2. कोणत्या खिंडीतून भारतावर आक्रमणे झाली आहेत ?
उत्तर : भारतावर वायव्येकडील बोलन आणि खैबर खिंडीतून आक्रमणे झाले आहेत.
3. इतिहासपूर्व काल म्हणजे काय ?
उत्तर : लेखनकलेच्या शोधापूर्वीचा जो काळ आहे त्याला इतिहासपूर्व काल असे म्हणतात.
4. पशुपालन आणि दुग्धोत्पादनाची कशी सुरुवात झाली ?
उत्तर : पृथ्वीवर गवताळ कुरणे वाढल्यानंतर त्यातील ज्या प्राण्यांची शिकार तो करीत असे त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये, खाण्यापिण्याच्या सवयी, उत्पत्ती यांचे निरीक्षण करून मनुष्याने त्या प्राण्यांना पकडून माणसाळवले अशा प्रकारे पशुपालन आणि दुग्धोत्पादनाची कशी सुरुवात झाली.
5. इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडाला पुरातत्त्व संशोधकांनी वेगवेगळी नावे दिली आहेत. ती कोणती ?
उत्तर : इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडाला पुरातत्त्व संशोधकांनी दिलेली वेगवेगळी नावे पुढीलप्रमाणे -    1. प्राचीन पाषाण युग (दोन अब्ज वर्षापूर्वीचा कालखंड) त्याची पुन्हा तीन गटात विभागणी होते. ती म्हणजे अ) आरंभीचा प्राचीन पाषाण युग. ब) प्राचीन पाषाण युग क) नवे अश्मयुग. 2. मध्य पाषाण युग (बारा हजार ते दहा हजार वर्षापर्यंतचा कालावधी) 3. नवीन पाषाण युग (दहा हजार वर्षानंतरचा काळ)

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024