Monday, September 10, 2018

साधने

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




प्रश्न १ - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
१. इतिहासाची बांधणी करण्यासाठी महत्वाचे घटक साहित्यिक व पुरातत्त्व साधने.
२. अश्वघोषाचे बुद्धचरित्र हे साहित्यिक साधन आहे.
३. कानडी भाषेत प्रथम आढळून आलेला शिलालेख म्हणजे हाल्मीडी होय.
प्रश्न २ - थोडक्यात उत्तरे लिहा.
१. साधने म्हणजे काय ?
उत्तर ः इतिहासाची मांडणी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार्‍या घटकांना साधने असे म्हणतात. यामुळे भूतकाळातील घटना सहज समजतात.

युरोपियनांचे भारतात आगमन

या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




भारत आणि युरोपियन यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते.  भारतातील जिरे, मिरी, लवंग, दालचिनी, वेलदोडे, सुंठ या  मसाल्याच्या पदार्थांना तेथे प्रचंड मागणी होती.  पूर्व रोमन साम्राज्याची (बायंझंटाईन) राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपलयेथून माल युरोपमध्ये जात. 
कॉन्स्टॅन्टिनोपल हे  युरोपियन व्यापाराचे महाद्वारम्हणून ओळखले जात होते.  आशियातील व्यापारावर अरब लोकांची मक्तेदारी होती; तर युरोपियन व्यापारावर इटलीच्या व्यापार्‍यांची मक्तेदारी होती.  १४५३ मध्ये अॅटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज केले. 

ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म


प्रश्न १ - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
१. येशू ख्रिस्ताचा जन्म ................ येथे झाला.
२. येशू ख्रिस्ताला ................ या टेकडीवर क्रुसावर चढविण्यात आले.
३. ................ च्या राजवटीत ख्रिश्चन धर्म रोमन साम्राज्याचा राज धर्म बनला.
४. मोहम्मद पैगंबराचा जन्म ................ येथे झाला.
५.       इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ ................ होय.
६. मोहम्मद पैगंबरांच्या उत्तराधिकार्‍यांना ................ म्हणतात.
उत्तरे ः १. बेथलहेम २. गोलगोथा ३. कॉन्स्टन्टाईन ४. मक्का ५. कुराण ६. खलिफा

रणजित चौगुले


रणजित चौगुले
(मराठी व समाज विज्ञान विषयाचे मार्गदर्शक)


      श्री.रणजित लक्ष्मण चौगुले बेळगाव येथील सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये गेली ८ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. शिक्षण एम. ए., बी.एड., एम.फील, नेट असे झाले आहे. कर्नाटक विद्यापीठात बी.ए. व एम. ए. ला मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल कृ.ब. निकुम्ब व रावसाहेब गोगटे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. रामनगर (ता.जोयडा जि. कारवार) येथील  सरकारी विद्यालयातून २००३ साली नोकरीस प्रारंभ. बेळगाव जिल्ह्यातील मराठी माध्यमातील कार्यशाळांत समाजविज्ञान व मराठी विषयाचे संपन्मूल व्यत्त*ी म्हणून मार्गदर्शन केले आहे. तंत्रज्ञानाधारीत शिक्षणाला प्राधान्य. मराठी माध्यमाच्या मुलांना मराठीतून तंत्रज्ञानाच्या आधाराने विषय सोपा करून सांगण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. फेसबुकवर मराठी नववीचे नोटस सर्वप्रथम उपलब्ध करून देऊन शिक्षकांची सोय केली होती. व्हॉटस अप सारख्या सोशल मीडियाचा उपयोग करून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओरूपी नोटस तयार केलेत. दहावीच्या परीक्षा मंडळावरही सदस्य म्हणून काम केले आहे. उपक्रमशील शिक्षक म्हणून बेळगावमध्ये परिचित आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध संस्थांच्या एस.एस.एल.सी. व्याख्यानमालांमधून समाजविज्ञान, मराठी व इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करीत असतात. इतर वर्तमानपत्रातून दहावीच्या विद्यार्थ्यांना समाजविज्ञान, मराठी विषयाचे मार्गदर्शन केले आहे. समाजविज्ञान सारखा रूक्ष विषय सोप्या व मनोरंजनात्मक पद्धतीने शिकविण्याच्या पद्धतीमुळे जिल्ह्यातील विविध नामांकित मराठी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष तासिका घेण्यासाठी त्यांना बोलाविण्यात येते. या शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच त्यांना उगारखुर्द येथील पहिला एस.ए. रामतीर्थकर आदर्श शिक्षक पुरस्कार२०१४ साली देण्यात आला होता. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व मानपत्र असे आहे. बेळगावमधील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत सक्रिय सहभाग असतो. स्थानिक ग्रामीण साहित्य संमेलनाशी संबंधित असे व्यत्ति*मत्त्व आहे. विविध मराठी दैनिकातून उपसंपादक म्हणून कार्य. विविध विषयांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत. 



दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024